Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Go First Airlines ची उड्डाणे 25 जुलै पर्यंत रद्द, आर्थिक अडचणीवर मार्ग निघेना!

Go First Airlines flights canceled

जेव्हापासून कंपनीच्या विरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरु झाली आहे, तेव्हापासून कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना देखील वेळेवर पगार दिलेले नाहीत. या अडचणींचा सामना करत असलेल्या एअरलाइन्सने अनेकांना कामावरून काढून टाकले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सध्या प्रवाशांना पुरेशी सेवा देण्यासाठी देखील कंपनीकडे मनुष्यबळ नाहीये. त्यामुळे कंपनीने 25 जुलैपर्यंत सर्व उड्डाणे रद्द केली आहेत.

GoFirst एअरलाइन्सच्या अडचणी थांबता थांबत नाहीये. कंपनीने त्यांची सर्व उड्डाणे आता  25 जुलैपर्यंत रद्द केली असल्याचे म्हटले आहे.  ऑपरेशनल कारणांमुळे आम्ही सेवा देण्यास असक्षम आहोत असे कंपनीने म्हटले आहे. आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या या एअरलाइन्सच्या विरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरु झाली आहे. कंपनीने 3 मे पासून आपली सर्व उड्डाणे बंद केली आहेत.

जेव्हापासून कंपनीच्या विरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरु झाली आहे, तेव्हापासून कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना देखील वेळेवर पगार दिलेले नाहीत. या अडचणींचा सामना करत असलेल्या एअरलाइन्सने अनेकांना कामावरून काढून टाकले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सध्या प्रवाशांना पुरेशी सेवा देण्यासाठी देखील कंपनीकडे मनुष्यबळ नाहीये. त्यामुळे कंपनीने 25 जुलैपर्यंत सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. ऑपरेशनल कारणांमुळे विमान कंपनीने हा निर्णय घेतला आहे. नव्याने एअरलाइन्सचे बुकिंग केले जात नसून, ज्या प्रवाशांनी आधीच आपले बुकिंग करून ठेवले होते, त्या प्रवाशांना आता ऐनवेळी पर्यायी एअरलाइन्सचा वापर करावा लागणार आहे आणि रिफंडसाठी GoFirst एअरलाइन्सकडे अर्ज करावा लागणार आहे.

एव्हिएशन रेग्युलेटर डीजीसीएने शुक्रवारी गोफर्स्ट एअरलाइनला काही अटींसह विमानाचे ऑपरेशन पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली होती. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) सांगितले होते की त्यांनी काही अटींसह 15 विमाने आणि 114 दैनिक उड्डाणे सुरू करण्याच्या GoFirst च्या योजनेला मान्यता दिली आहे. GoFirst एअरलाइन्सला परवानगी जरी मिळाली असली तरी कंपनी प्रवाशांना आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना सुविधा देण्यास अजूनही सक्षम नसल्याचे चित्र पाहायला मिळते आहे.

GoFirst विरुद्ध दिवाळखोरीची प्रक्रिया

दिल्ली उच्च न्यायालय आणि NCLT (नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल) च्या दिल्ली खंडपीठासमोर प्रलंबित असलेल्या रिट याचिका किंवा अर्जांच्या निकालाच्या अधीन आहे. अशातच एव्हिएशन रेग्युलेटर डीजीसीएने GoFirst ला उड्डाणाची परवानगी दिली आहे. नियामकाने GoFirst ला सर्व लागू नियामक आवश्यकतांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.