Career opportunities in agriculture sector : काळानुसार प्रत्येक क्षेत्रात नोकरीच्या संधी भरपूर आहेत. पण, त्यासाठी धडपड खूप करावी लागते त्याचबरोबर माहितीही असावी लागते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे नवीन शक्यता निर्माण झाल्या आहेत. तरुण वर्गाचा कल शेती क्षेत्राकडे वाढला आहे. त्यांनाही यात भरपूर संधी आहेत. त्या कोणत्या जाणून घेऊया.
शेतीविषयक अभ्यासक्रम
- एग्रीकल्चरल फिजिक्स
- एग्रीबिजनेस
- प्लांट पॅथॉलॉजी
- प्लांट ब्रीडिंग एंड जेनेटिक्स
- प्लांटेशन मॅनेजमेंट
हे कोर्स कुठे करू शकता?
- इंडियन एग्रीकल्चरल रिसर्च इंस्टीट्यूट नई दिल्ली
- इंडियन वेटरनरी रिसर्च इंस्टीट्यूट
- नेशनल डेयरी रिसर्च इंस्टीट्यूट
- इंदिरा गांधी कृषि विद्यापीठ
- जवाहरलाल नेहरू कृषि विद्यापीठ
- इंडियन एग्रीकल्चरल रिसर्च इंस्टीट्यूट
कृषी क्षेत्रातील नोकरीच्या संधी
देशातील 70 टक्के लोकं शेती हा व्यवसाय करतात. पण त्यांच्या मुलांना कशात करिअर करायच हे ते स्वतःच ठरवतात. अनेक मुलांना शेती क्षेत्रात करिअर करायचे असते. पण, नेमकं करायच काय हे त्यांना लक्षात येत नाही. तरुणांसाठी दरवर्षी कृषी क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध असतात. शेतीचा अनुभव असलेली व्यक्ती बँकेत फील्ड ऑफिसरच्या नोकरीसाठी चांगली मानली जाते. ICAR भारतीय कृषी संशोधन परिषदेत दरवर्षी नोकरीची संधी उपलब्ध असते. UPSC कृषी तज्ञाच्या नियुक्तीसाठी परीक्षा घेते. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही शेतीशी संबंधित इतर क्षेत्रातील नोकऱ्या शोधू शकता.
Source : www.abplive.com