खाद्यतेलाचा वापर सर्वत्रच मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र गेल्या काही वर्षांत देशात खाद्यतेलाच्या किंमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. लॅटिन अमेरिकेतली उत्पादनात घट, कोविड आणि युक्रेन युद्धामुळे कामगारांची कमतरता यामुळे वनस्पती तेल उद्योगाच्या अडचणी वाढल्या आहेत. तरीदेखील सर्वत्र खाद्यतेलाच्या किंमती घसरल्या आहेत. भारतात मात्र उलट स्थिती आहे. नवभारत टाइम्सनं हे वृत्त दिलं आहे.
Table of contents [Show]
भारतातला तेलाचा वापर
भारतात 2021-22मध्ये खाद्यतेलाचा वापर 25.8 दशलक्ष टन इतका होता. दशकापूर्वीची तुलना केल्यास तो 6 दशलक्ष टन जास्त आहे. आपल्या गरजेपैकी बहुतांश खाद्यतेल भारत आयात करतो. म्हणजेच त्याची देशातली किंमत आंतरराष्ट्रीय किंमतींशी निगडीत आहे. मे 2022 ते मे 2023 या कालावधीत आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या खाद्यतेलाच्या किंमती प्रचंड घसरल्या. मात्र देशातल्या खाद्यतेलाच्या किंमती या प्रमाणात कमी झाल्याचं दिसलं नाही.
किंमतीत घट
मे 2022 ते जुलै 2023 दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रूड पाम तेल आणि आरबीडी (रिफाइंड) पामोलिनच्या किंमती 45 टक्क्यांनी घसरल्या. मात्र या काळात भारतातील वनस्पती तेलाच्या किंमती 21 टक्क्यांनी आणि पाम तेलाच्या किंमती 29 टक्क्यांनी घसरल्या. सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाचीही अशीच स्थिती पाहायला मिळाली होती.
आयात शुल्कात कपात
कच्च्या पाम तेलावरील आयात शुल्क जानेवारी 2020मध्ये 41.25 टक्के होतं. ते जूनमध्ये 5.5 टक्क्यांवर आलं. जून 2018मध्ये, आरबीडी पामोलिनवर ते 59.4 टक्के होतं. ते आता 13.75 टक्क्यांवर आलं आहे. कच्च्या सोयाबीन आणि सूर्यफुलावरचं आयात शुल्क 2020च्या शेवटी 38.5 टक्के होतं. ते जून 2023मध्ये 5.5 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आलं. रिफाइंड सूर्यफूल आणि सोयाबीन तेलावरच्या शुल्कातही अशीच कपात करण्यात आली आहे.
भारतातून निर्यात
भारतातून खाद्यतेलाच्या निर्यातीवर 2008मध्ये बंदी घालण्यात आली होती. याला अनेकवेळा मुदतवाढ देण्यात आली. एप्रिल 2018पासून खाद्यतेलाच्या निर्यातीला परवानगी देण्यात आली. मात्र मोहरीच्या तेलाच्या निर्यातीवर मर्यादा घालण्यात आली आहे. किमान निर्यात किंमतीवर 5 किलोच्या पॅकमध्ये ते निर्यात करण्यात येवू शकतं. देशात तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे निर्यातीला फारसा वाव नाही. 2022-21मध्ये देशांतर्गत उपलब्धतेच्या एक टक्काही निर्यात होऊ शकली नाही.
रिटेल मार्जिन
शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलावरची किरकोळ मार्जिन खाली आलं आहे. भाजीपाला आणि इतर तेलांवर मात्र त्यात किरकोळ वाढ झाली आहे.
मागणीत वाढ
2012-13मध्ये भारतात खाद्यतेलाची वार्षिक मागणी दरडोई 15.4 किलो होती, तर जगात ती 26.3 किलो होती. जगाच्या तुलनेत भारताची सरासरी अजूनही कमी असली तरी खप सातत्यानं वाढताना दिसत आहे. 2021-22मध्ये ते प्रति व्यक्ती 21 किलोपर्यंत पोहोचलं. त्यामुळे देशांतर्गत किंमतीतली वाढ ही देशातल्या वाढत्या मागणीशी जोडली जाऊ शकते.
आंतरराष्ट्रीय किंमत
लॅटिन अमेरिकेतली उत्पादनात कपात, कोविडमुळे कामगारांची रोडावलेली संख्या आणि युक्रेन युद्ध यामुळे भाजीपाला तेल उद्योगाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर दरात सातत्यानं वाढ होत होती. जसं की, मे 2019मध्ये आरबीडी पामोलिनची किंमत 38,000 रुपये प्रति टन होती. मे 2022मध्ये 137,000 रुपये झाली. मात्र त्यानंतर त्यात कमालीची घट झाली. मे 2022नंतर त्याची किंमत 44 टक्क्यांनी घसरली आहे.