Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Adani Group: गौतम अदानींचे दोन व्यवसाय विक्रीला; बेन कॅपिटल खरेदी करणार 90% समभाग

Adani Group

अदानी कॅपिटल आणि अदानी हाऊसिंगमध्ये बेन कॅपिटल ही कंपनी 90% गुंतवणूक करणार आहे. या व्यवहारामुळे गौतम अदानी यांची दोन्ही कंपन्यांतील कौटुंबिक मालकी संपुष्टात येईल. या व्यवहाराला मंजूरी मिळाली असून चालू वर्षाच्या शेवटपर्यंत पूर्ण होईल.

Adani group Bain Capital deal: गौतम अदानी ग्रुपचे दोन व्यवसाय विक्रीला असून बेन कॅपिटल ही गुंतवणूक संस्था अदानींच्या दोन कंपन्यांचे 90% शेअर्स खरेदी करणार आहे. बेन कॅपिटल ही अमेरिकेतील बलाढ्य गुंतवणूक संस्था असून अदानी कॅपिटल आणि अदानी हाऊसिंग या दोन कंपन्यांतील शेअर्स खरेदी करणार आहे.

अदानी ग्रुपमधील परकीय गुंतवणूक वाढली

या दोन कंपन्यांतील अदानी कुटुंबाची गुंतवणूक बेन कॅपिटल खरेदी करणार आहे. हा व्यवहार निश्चित झाला असून विक्रीची प्रक्रिया सुरू झाली आहे.  चालू वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत हा व्यवहार पूर्ण होईल, अशी माहिती समोर आली आहे. गौतम अदानी ग्रूपमध्ये परकीय गुंतवणूक वाढत आहे. काही दिवसांपूर्वी GQG या गुंतवणूक कंपनीने अदानी ग्रुपमधील गुंतवणूक 10 टक्क्यांनी वाढवली. त्यानंतर हा आता मोठा व्यवहार झाला आहे.

गौरव गुप्ता हे अदानी कॅपिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. कंपनीच्या विक्रीनंतरही ते सीइओपदी राहणार आहेत. (Adani group Bain Capital deal) गौरव गुप्ता यांची अदानी कॅपिटलमध्ये 10 टक्के गुंतवणूक आहे. बेन कॅपिटल ही संस्था अदानी कॅपिटलमध्ये 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. भविष्यात कंपनीची वेगाने प्रगती होईल, असे गौरव गुप्ता यांनी व्यवहाराला मंजूरी मिळाल्यानंतर म्हटले.

2017 साली अदानी कॅपिटल कंपनी सुरू झाली. ही एक बिगर बँक वित्त संस्था आहे. उद्योग, व्यवसाय आणि किरकोळ कर्ज पुरवठा अदानी कॅपिटलकडून केला जातो. " बेन कॅपिटल संस्थेने अदानी ग्रूपमध्ये गुंतवणूक केल्यामुळे मी आनंदी आहे. या निर्णयामुळे कंपनी भविष्यात अनेक पटींनी वाढेल, असे गौतम अदानी यांनी म्हटले.

हिंडेनबर्ग रिपोर्टमुळे अदानी ग्रुपचं नुकसान

अमेरिकेतील गुंतवणूक रिसर्च फर्म हिंडेनबर्गने अदानी ग्रुपवर भ्रष्टाचाराचे आणि गैरव्यवहाराचे आरोप केले होते. हिंडेनबर्ग अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर अदानी ग्रुपचे शेअर्स कोसळले होते. त्यानंतर आता अदानी ग्रुपचे शेअर्स वर येत आहेत. मात्र, पूर्णपणे स्थिरावले नाहीत. 150 बिलियन डॉलरने अदानी ग्रुपचे मूल्य खाली आले होते. 50 बिलियन डॉलरचे मूल्य आतापर्यंत पुन्हा मिळवले आहे.