जागतिक पासपोर्ट रॅकिंगमध्ये भारतीय पासपोर्टचा क्रमांक मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी थोडा सुधारला आहे. 2022 मध्ये या वर्ल्ड रॅकिंगमध्ये भारताचा पासपोर्ट 87 व्या क्रमांकावर होता. तो यावर्षी 80 व्या क्रमांकावर आला आहे. या क्रमवारीमुळे भारतीय पासपोर्टधारकांमना 57 देशांमध्ये व्हिसा-फ्री एन्टी मिळणार आहे.
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या हेन्ली पासपोर्ट इंडेक्स रिपोर्टमधून(Henley Passport Index Ranking 2023) ही माहिती कळली आहे. सिंगापूरच्या पासपोर्टने जपानला मागे टाकत तो जगातला सर्वांत पॉवरफुल पासपोर्ट ठरल आहे. यामुळे सिंगापूरचा पासपोर्ट असलेल्यांना जगभरातील 192 देशांमध्ये फिरण्यासाठी व्हिसा फी द्यावी लागणार नाही. भारतासह सेनेगल आणि टोगो हे दोन देशसुद्धा या क्रमवारीत 80 व्या क्रमांकावर आहेत.
जर्मन, इटली आणि स्पेन हे देश या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असून, या देशाचा पासपोर्ट असणाऱ्या प्रवाशांना 190 देशांमध्ये फिरण्यासाठी व्हिसा फी द्यावी लागणार नाही. तर मागच्या वर्षी पहिल्या क्रमांकावर असलेला जपान यावर्षी 3 क्रमांकवर गेला आहे. जपानसह ऑस्ट्रिया, फिनलॅण्ड, फ्रान्स, लक्झेमबर्ग, दक्षिण कोरिया आणि स्वीडन हे देश आहेत. या देशातील पासपोर्टधारकांना 189 देशांमध्ये फिरण्यासाठी व्हिसा फी द्यावी लागणार नाही.
हेन्ली पासपोर्ट इंडेक्स रॅकिंग हे इंटरनॅशनल एअर ट्रान्सफोर्ट असोसिएशन (आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना-IATA)कडून उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे तयार करते. या रॅकिंगमधून असेही दिसून आले आहे की, आपल्या बाजुचा देश पाकिस्तानचा पासपोर्ट हा जगातील सर्वांत वाईट पासपोर्टच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे पाकिस्तानी पासपोर्ट असलेल्यांना फक्त 33 देशांमध्ये व्हिसा फी न भरता फिरण्याची मुभा आहे.
हेन्ली पासपोर्ट इंडेक्स रॅकिंगमध्ये सर्वांत खाली 4 देशांचे पासपोर्ट आहेत. ज्यांना व्हिसा फी भरल्याशिवाय कोठेही फिरता येत नाही. त्यामध्ये अफगाणिस्तान, उत्तर कोरिया, पापुआ न्यू जिनिया आणि तुर्कमेनिस्तान हे 4 देश आहेत.