Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

G20 Summit मुळे देशातील छोट्या व्यापाऱ्यांना काय होणार फायदा? जाणून घ्या डीटेल्स

भारताने दिलेल्या प्रस्तावात एमएसएमई व्यावसायिकांना जागतिक बाजारपेठ आणि वित्तीय व्यवस्थेची जाणीव करून देण्याबरोबरच त्यांना जागतिक स्तरावरील व्यासपीठ उपलब्ध करून देणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे म्हटले होते. यावर दिल्लीत होणाऱ्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेतला जाऊ शकतो.

Read More

Rice Export : भारताचा तांदूळ सिंगापूरमध्ये होणार निर्यात, सिंगापूरला निर्यातीत सूट

सिंगापूरने भारताला तांदळावरील बंदीतून सूट दिली आहे. या निर्णयाचे स्वागत करत सिंगापूर दुतावासाने भारत सरकारचे आभार मानले आहेत. भारत आणि सिंगापूर या दोन देशांचे मैत्रीसंबंध या निर्णयामुळे अधिक दृढ होतील असा विश्वास सिंगापूरच्या दुतावासाने व्यक्त केला आहे.

Read More

ISRO Aditya L1 Mission: चांद्रयानाच्या यशानंतर आता सूर्यावर स्वारी! इस्त्रोचे आदित्य L1 अवकाशात झेपावले, बजेट जाणून घ्या

ISRO Solar Mission: आदित्य L1 मिशनमध्ये आज यानाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. यानंतर इस्त्रोच्या वैज्ञानिकांनी एकमेकांचे अभिनंदन केले. सूर्य आणि सूर्याभोवती असलेल्या आवरणाचा अभ्यास करण्यासाठी इस्त्रोने आदित्य L1 मोहीम तयार केली आहे.

Read More

RBI Governor : अभिमानास्पद! रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास ठरले जगातील सर्वोत्कृष्ट बँकर

ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्ड मध्ये जागतिक स्तरावर 3 सेंट्रल बँकेच्या गव्हर्नरला A+ रेटिंग देण्यात आले आहे. त्यामध्ये गव्हर्नरच्या यादीत शक्तिकांत दास यांना प्रथमस्थानी आहेत. A+ रेटिंग देण्यात आलेल्या सेंट्रल बँकेच्या गव्हर्नरच्या या यादीत इतर दोन नावांमध्ये स्वित्झर्लंडचे गव्हर्नर थॉमस जे. जॉर्डन आणि व्हिएतनामचे गव्हर्नर गुयेन थी हाँग यांचा समावेश आहे.

Read More

Indian Railway च्या मदतीने Amazon देणार सुपर फास्ट डिलिव्हरी सुविधा

पार्सल वाहतुकीसाठी इंडियन रेल्वेशी असा सामंजस्य करार करणारी अमेझॉन ही पहिली ई-कॉमर्स वेबसाइट ठरली आहे. तसे पाहायला गेले तर इंडियन पोस्ट आणि इंडियन रेल्वे दरम्यान गेली अनेक वर्षे पार्सल ट्रान्सफरचा सामंजस्य करार सुरु आहे. भारतात विस्तीर्ण पसरलेल्या रेल्वेच्या जाळ्याचा उपयोग ग्राहकांना त्यांच्या गरजेचे सामान लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी केला जाणार आहे.

Read More

Electronic Imports Ban नंतर नवे परवाना नियम आणण्याच्या तयारीत केंद्र सरकार

व्यापारांना सुरळीतपणे आयात परवाने देण्यासाठी सरकार सध्या धोरण निश्चिती करत असल्याचे वृत्त आहे. संगणक संबंधी उत्पादनांवर आयात बंदी घटली जाणार असली तरी काही विशेष कारणांसाठी ही आयात बंदी शिथिल केली जाणार असल्याचे वाणिज्य मंत्रालयाने याधीच्या अधिसूचनेत नमूद केले होते.

Read More

OCCRP Report: अदानीनंतर OCCRP चे वेदांता ग्रुपवर गंभीर आरोप; लॉबिंगद्वारे नियमांमध्ये केले बदल

OCCRP Report: ऑर्गनाईज क्राईम अॅण्ड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (OCCRP) या संस्थेने अदानी ग्रुपनंतर आपला मोर्चा अनिल अग्रवाल यांची कंपनी वेदांताकडे वळवला आहे. वेदांता कंपनीने कोविड-19 च्या काळात पर्यावरणाशी संबंधित नियमांची पायमल्ली केल्याचा आरोप या संस्थेने केला.

Read More

Onam Kerala: केरळात ओणम सणाच्या पहिल्या नऊ दिवसांत 665 कोटी रुपयांची मद्यविक्री

केरळमध्ये ओणम सण उत्साहात साजरा करण्यात येत आहे. चालू वर्षी राज्यात पहिल्या नऊ दिवसांत 665 कोटी रुपयांची मद्यविक्री झाली. मद्यविक्रीने मागील सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. ओणमच्या नवव्या दिवशी सर्वाधिक मद्यविक्री झाली.

Read More

Air fares: सणासुदीच्या काळात विमान प्रवास महागणार? इंधनाच्या किंमती 14 टक्क्यांनी वाढल्या

सणासुदीच्या तोंडावर विमान प्रवास महाग होण्याची शक्यता आहे. इंधन कंपन्यांनी जेट फ्युअलच्या किंमती 14 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. मागील तीन महिन्यांपासून 24% दरवाढ झाल्याने तिकीटाचे दर आणखी वाढू शकतात.

Read More

Gas Cyclinder Prices : कमर्शियल गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात, पाहा नवीन दर

सार्वजनिक क्षेत्रातील ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी (OMC) कमर्शियल LPG गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात करुन सामान्यांना सणासुदीत दिलासा दिला आहे. याआधी सरकाने काही दिवसांपूर्वीच LPG गॅस सिलिंडरच्या दरात 200 रुपयांची कपात केली होती. आता कमर्शियल LPG गॅस सिलिंडरच्या दरात किती कपात केली पाहा.

Read More

UPI Transactions: ऑगस्ट महिन्यात रेकॉर्ड ब्रेक UPI पेमेंट्स; 1 हजार कोटींचा टप्पा पहिल्यांदाच ओलांडला

भारतात सध्या डिजिटल पेमेंट्सची चलती आहे. किराणा दुकानातून अंडी, ब्रेड घेण्यापासून ते मोठे व्यावसायिक पेमेंट करण्यासाठी UPI चा वापर वाढत आहे. ऑगस्ट महिन्यात UPI पेमेंट्सच्या व्यवहारांनी नवा उच्चांक गाठला. एक महिन्यात किती कोटी व्यवहार झाले वाचा.

Read More

GDP Growth: आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत GDP ची वाढ 7.8 टक्के; अपुऱ्या मान्सूनमुळे वाढ खुंटणार का?

चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेने चांगली वाढ नोंदवली आहे. मात्र, अपुऱ्या पावसामुळे भविष्यात विकासदर खुंटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ऑगस्ट महिन्यात 122 वर्षातील सर्वात कमी पाऊस पडल्याचे हवामान विभागाने सांगितले. पहिल्या तिमाहीतील वाढीचा वेग यापुढे राखता येईल का?

Read More