Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Student Internship: विद्यार्थ्यांना पेड इंटर्नशिप मिळवून देणाऱ्या 'या' टॉप साइट्स माहियेत का?

जर तुम्ही कॉलेज किंवा कोणताही कोर्स पूर्ण झाल्यानंतर इंटर्नशिपच्या शोधात असाल तर या साइट्स तुम्हाला माहिती हव्याच. गुगल, मायक्रोसॉफ्टसह विविध क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमध्येही इंटर्नशिप मिळू शकते. पेड इंटर्नशिपसोबत कौशल्य आत्मसात करण्याची चांगली संधी मिळवता येईल.

Read More

Sugar Price Hike: साखरेचे दर सहा वर्षांच्या उच्चांकावर; अपुऱ्या पावसामुळे उत्पादन घटण्याची शक्यता

साखरेचे दर मागील पंधरा दिवसांत वाढले आहेत. तसेच अपुऱ्या पावसामुळे साखरेचे उत्पादन घटण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या ऊस उत्पादन राज्यांना कमी पावसाचा जास्त फटका बसला आहे.

Read More

Krishna Janmashtami: कृष्ण जन्माष्टमीच्या पर्वावर सजली बाजारपेठ, विक्रेत्यांची स्पर्धा वाढल्याने मूर्तींचे दर जैसे थे

Krishna Janmashtami Market: कृष्ण जन्माष्टमीचा सण म्हटलं की बालगोपाळांप्रमाणेच मोठ्यांमध्ये सुध्दा आनंदाचे वातावरण असते. कृष्ण जन्माष्टमी निमित्त नागपूर शहरातील संपूर्ण बाजारपेठ धूमधडाक्यात सजली आहे. नागपूर शहरात 300 रुपयांपासुन ते 2500 रुपयांपर्यंत राधाकृष्ण मूर्ती विक्री करिता उपलब्ध आहेत.

Read More

MGL free fuel card घ्या आणि 5 लाखांपर्यंतचा CNG भरा, जाणून घ्या ही भन्नाट ऑफर

या ऑफरमध्ये सीएनजीचा वापर करून गाडी चालवणाऱ्या वाहन चालकांना मोफत सीएनजी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. अर्थात यावर अटी आणि नियम लागू आहेत. MGL च्या निवेदनानुसार MGL free fuel card योजनेत वाहन चालकांना 20 हजार ते 5 लाखांपर्यंत किमतीचा सीएनजी भरता येणार आहे. खासगी आणि व्यावसायिक अशा दोन्ही वाहनांना या योजेनेचा लाभ मिळणार आहे.

Read More

Gadar 2 in 500 Cr Club: 'गदर 2' सिनेमा 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील!

Gadar 2 in 500 Cr Club: प्रदर्शनानंतर चौथ्याच आठवड्यात 500 कोटीच्या क्लबमध्ये प्रवेश करणारा 'गदर 2' हा चित्रपट बाहुबली 2 (हिंदी भाषा) आणि पठाणनंतरचा तिसरा हिंदी चित्रपट ठरला आहे. 'गदर 2' चा आज बॉक्स ऑफिसवरचा 25 वा दिवस आहे.

Read More

ADR Report: आठ राजकीय पक्षांपैकी या पक्षाकडे आहे सर्वाधिक संपत्ती, पाहा कोण आहे टाॅपवर

ADR Report: असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने एक रिपोर्ट जारी केला आहे. त्यानुसार 2021-22 या आर्थिक वर्षात आठ राजकीय पक्षांनी एकूण 8,829.158 कोटी रुपयांपर्यंतची संपत्ती घोषित केली आहे. तर यापैकी सर्वाधिक संपत्ती भारतीय जनता पार्टीच्या नावावर असल्याची माहिती रिपोर्टमधून मिळत आहे.

Read More

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3% टक्क्यांनी वाढणार?

सद्यस्थितीत केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42% इतका महागाई भत्ता मिळत आहे. आता केंद्र सरकारकडून आणखी 3 टक्क्यांनी त्यामध्ये वाढ केली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता हा 45 टक्के होणार आहे. महागाई भत्त्यामध्ये वाढ झाल्यास केंद्रीय कर्मचारी आणि पेंशनधारकांना याचा फायदा जुलै 2023 पासून मिळणार आहे.

Read More

Rasna Insolvency: 71 लाखांच्या थकीत व्यवहारावरून रसना कंपनीवर दिवाळखोरीची वेळ; उच्च न्यायालयाचा दिलासा

रसना कंपनीविरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने (NCLT) दिले होते. मात्र, गुजरात उच्च न्यायालयाने दिवाळखोरीच्या प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. अवघ्या काही लाख रुपयांच्या पेमेंटवरून रसना कंपनी अडचणीत आली आहे.

Read More

Jawan Ticket Sale: किंग खानच्या 'जवान' चे तुफान ॲडव्हान्स बुकिंग, आत्तापर्यंत 'सहा लाख' तिकिटांची विक्री !

शाहरुख खानच्या आगामी बहुचर्चित 'जवान' चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगने जोर धरला असून आत्तापर्यंत सहा लाख तिकिटांचे बुकिंग झाले आहे. चित्रपटाने आगमनापूर्वीच तिकिटांच्या ॲडव्हान्स बुकिंगमधून आत्तापर्यंत 17.50 कोटी रुपयांची कमाई केल्याची समजते.

Read More

YouTube Shorts मुळे युट्युबचा लाँग-फॉर्म व्हिडिओ व्यवसाय संपुष्टात येण्याची चिन्हे? काय आहे प्रकरण, जाणून घ्या

मागच्या वर्षी युट्युबने TikTok आणि Instagram Reels ला पर्याय देण्यासाठी YouTube Shorts ची सुविधा सुरु केली होती. यात युजर्स छोटे-छोटे व्हिडियो बनवू शकतात. मात्र आता युट्युबचे हेच फीचर्स त्यांचा मुख्य व्यवसाय असलेले लाँग-फॉर्म व्हिडिओ व्यवसाय अडचणीत आणताना दिसत आहे.

Read More

Digital Rupee: डिजिटल रुपीचे पेमेंट UPI द्वारे करता येणार; स्टेट बँकेकडून फिचर लाँच

स्टेट बँक ऑफ इंडियाने डिजिटल रुपी आणि UPI पेमेंट प्रणाली एकमेकांना जोडली आहे. त्यामुळे ई-रुपीच्या साह्याने कोणताही क्युआर कोड स्कॅन UPI पेमेंट करता येईल. डिजिटल रुपीचा प्रकल्प सध्या प्रायोगिक तत्वावर सुरू असून लवकरच सर्वांना डिजिटल चलन वापरता येईल.

Read More

Free Trade Agreement : भारताशी मुक्त व्यापार करार सध्या तरी शक्य नाही, ऋषी सुनक यांची माहिती

मुक्त व्यापार करारामुळे भारत आणि ब्रिटन या दोन देशांमध्ये व्यवसाय सुलभ होणार आहे. आयात आणि निर्यातीच्या किचकट अटी आणि तांत्रिक मुद्दे यामुळे निकालात लागणार आहे. तसेच दोन्ही देशांतील लघु आणि मध्यम व्यापाऱ्यांना देखील जागतिक बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.

Read More