तुम्ही जर सोशल मिडियाचे हेवी युजर्स असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आली आहे. सोशल मिडीयामध्ये सर्वाधिक वापरात असलेल्या फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या सेवेत मेटाने काही महत्वाचे बदल केले आहेत.
यांतील मुख्य बदल म्हणजे यापुढे फेसबुक आणि इन्स्टाग्राम वापरकर्त्यांना ही सेवा घेण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. काय म्हणता? विश्वास बसत नाहीये? मात्र ही बातमी अगदी खरी आहे. आधी इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरील खाते सत्यापित करण्यासाठी मेटाने पैसे आकारण्याचा निर्णय घेतला होता. आता मात्र युजर्सला देखील ही सेवा घेताना पैसे मोजावे लागणार आहेत.
काय घेतला निर्णय?
मेटाने फेसबुक आणि इन्स्टाग्राम युजर्सकडून सोशल मिडीया सेवा वापरण्यासाठी पैसे घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या प्राथमिक स्तरावर युरोपियन देशांमध्ये ही पेड सेवा / सशुल्क सेवा दिली जाणार आहे.
Meta Platforms is reportedly contemplating the introduction of ad-free, paid versions of Facebook and Instagram specifically for users residing in the European Union, a move seen as a response to increasing regulatory scrutiny.
— TECHx (@techxmediauae) September 2, 2023
For More Tech Newshttps://t.co/lfCeahXEb0#tech pic.twitter.com/0fC35XHZl8
गेल्या काही दिवसांपासून मेटा कंपनी आणि युरोपियन युनियन यांच्यामध्ये डेटा सुरक्षिततेबाबत खटके उडाले होते. युरोपियन युनियन जाहिरातीबाबत कंपनीवर दबाव टाकत असल्याचे मेटाने म्हटले होते. त्यानंतर मेटाकडून हा निर्णय घेतला गेला आहे. येणाऱ्या काळात भारतात देखील असा निर्णय घेतला जाईल अशी शक्यता आहे.
मोफत सेवा देखील मिळेल
मेटाने प्राथमिक स्तरावर या सशुल्क सेवेला मान्यता दिली असली तरी पैसे भरणाऱ्या युजर्सला विना जाहिरात सोशल मिडीया वापरता येणार आहे. तसेच त्यांना काही खास फीचर्स आणि सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे. यात नेमक्या कोणकोणत्या सुविधा दिल्या जातील याबाबत मेटाने स्पष्टीकरण दिलेले नाही. तसेच युजर्सकडून किती पैसे आकारले जातील याबाबतही माहिती देण्यात आलेली नाही. येत्या काही दिवसांत याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल असे मेटाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
2019 पासून युजर्सची खासगी माहिती कंपन्यांना पुरवली जात असल्याचा आरोप युरोपियन युनियनकडून मेटावर लावला जात आहे. या संदर्भात मार्क झुकेरबर्ग यांची साक्ष देखील नोंदवली गेली होती.
रील्सचा कालावधी वाढवला
सध्या इन्स्टाग्रामवर कमाल 3 मिनिटांचे रील्स अपलोड करण्याची सुविधा आहे. मात्र आता युजर्सला 10 मिनिटांपर्यंतचे रील्स इन्स्टाग्रामवर अपलोड करता येणार आहे असे मेटाने जाहीर केले आहे. युट्युब व्हिडियोजला पर्याय म्हणून येणाऱ्या काळात इन्स्टाग्राम रील्स लोकप्रिय ठरू शकतात.