भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिंकात दास (RBI governor Shaktikanta Das) यांचा जागतिक स्तरावर सन्मान झाला आहे. गव्हर्नस शक्तिकांत दास यांचा जगातिक स्तरावरील सर्वोत्कृष्ट बँकर म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. अमेरिकेच्या ग्लोबल फायनान्स (Global Finance magazine) या मासिकाने 2023 साठी ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्ड्समध्ये शक्तिकांत दास यांना"A+" रेटिंग दिले आहे. या संदर्भात आरबीआयने ट्विट करून माहिती दिली आहे. शक्तिकांत दास हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे 25 वे गव्हर्नर आहेत.
शक्तिकांत दास अव्वल स्थानी
ग्लोबल फायनान्स सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्ड मध्ये जागतिक स्तरावर 3 सेंट्र्ल बँकाच्या गव्हर्नरला A+ रेटिंग देण्यात आले आहे. त्यामध्ये गव्हर्नरच्या यादीत शक्तिकांत दास यांना प्रथमस्थानी आहेत. त्यामुळे दास यांच्या या सन्मानाचे जगभरातून कौतुक केले जात आहे. A+ रेटिंग देण्यात आलेल्या सेंट्रल बँकेच्या गव्हर्नरच्या या यादीत इतर दोन नावांमध्ये स्वित्झर्लंडचे गव्हर्नर थॉमस जे. जॉर्डन आणि व्हिएतनामचे गव्हर्नर गुयेन थी हाँग यांचा समावेश आहे.
प्रतिवर्षी प्रसिद्ध केला जातो रिपोर्टकार्ड
1994 पासून ग्लोबल फायनान्सद्वारे दरवर्षी सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्ड्स प्रकाशित केले जाते. यामध्ये जगभरातून 101 देश किंवा केंद्र शासित प्रदेशांसह युरोपियन युनियन, ईस्टर्न कॅरिबियन सेंट्रल बँक, बँक ऑफ सेंट्रल आफ्रिकन स्टेट् आणि सेंट्रल बँक ऑफ वेस्ट अफ्रिकन स्टेट बँकेच्या सेंट्रल बँकेच्या गव्हर्नरला श्रेणी दिल्या जातात. यावर्षी आरबीआयचे गव्हर्नस शक्तिकांत दास हे जगातील सर्वोत्कृष्ट बँकर ठरले आहेत.
अशी ठरते श्रेणी-
ग्लोबल फायनान्स मासिकाने दिलेल्या एका निवेदनानुसार ही श्रेणी ठरवताना संबंधित देशातील महागाई नियंत्रण, अर्थव्यवस्थेच्या वाढीचे लक्ष्य, त्याचबरोबर चलनाची स्थिरता आणि व्याज दराचे व्यवस्थापन याचा विचार केला जातो. यामध्ये यश-अपयश यानुसार ग्रेड A ते ग्रेड F पर्यंतचा स्केल निश्चित केला जातो. त्यामध्ये A म्हणजे संबंधित बँक आणि गव्हर्नरकडून उत्कृष्ट कामगिरी झाल्याचे निश्चित केले जाते.