Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Paytm Promotor: पेटीएममधील चिनी कंपनीचे वर्चस्व संपुष्टात; विजय शेखर शर्मांकडे सर्वाधिक मालकी हक्क

Paytm shareholding

Image Source : www.businesstoday.in

पेटीएममधील चिनी कंपनीचा प्रभाव संपुष्टात आला आहे. कंपनीचे मालक विजय शेखर शर्मा यांच्याकडे सर्वाधिक मालकी हक्क आले आहेत. अँटफिन शेअर होल्डिंग या चिनी कंपनीच्या ताब्यातील 10.3% हिस्सा शर्मा यांनी खरेदी केला आहे.

Paytm Shares: भारतातील एक प्रमुख फिनटेक कंपनी पेटीएमची सर्वाधिक मालकी प्रमोटर विजय शेखर शर्मा यांच्याकडे आली आहे. अँटफिन शेअर होल्डिंग या चिनी कंपनीचा 9.90 टक्के हिस्सा विजय शेखर शर्मा यांनी खरेदी केला. शेअर्स खरेदीनंतर शर्मा यांचा पेटीएममधील हिस्सा 19.42 टक्के झाला आहे.

चिनी कंपनीचा प्रभाव कमी होणार?

अँटफिन ही चिनी गुंतवणूक कंपनी आहे. पेटीएम कंपनीतील हिस्सेदारी कमी झाल्याने कंपनीचा निर्णय प्रक्रियेतील प्रभावही कमी होऊ शकतो. चिनी गुंतवणूकदार असल्याने पेटीएमचा शेअर्स म्हणावी तशी प्रगती करत नव्हता. मात्र, आता पेटीएमचा शेअर्स वर प्रगती करू शकतो, असा बाजार विश्लेषकांचा अंदाज आहे.

SBO म्हणजे काय?

ज्या व्यक्तीचे कंपनीमध्ये 10 टक्क्यांपेक्षा जास्त प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या हिस्सा असेल त्यास SBO म्हणजे सोल बेनिफियल ओनर असे म्हणतात. कॉर्पोरेट मंत्रालयाने 2019 साली SBO नियमांमध्ये बदल केला. (Chinese firm Antfin shareholding reduced in Paytm) बेकायदेशीर व्यवहार रोखण्यासाठी सोल बेनिफिशियल ओनरचे नाव कंपनी नोंदणी कार्यालयाला द्यावे लागते. याद्वारे सरकारी संस्थांना कंपनीचा खरा मालक कोण आहे हे समजते?

विजय शेखर शर्मांकडे 19% मालकी 

विजय शेखर शर्मा हे पेटीएमचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांच्या परदेशातील रेझिलियंट अॅसेट मॅनेजमेंट या कंपनीने पेटीएममधील 10.3% शेअर्स खरेदी केले. अँटफिन शेअर होल्डिंग या गुंतवणूक कंपनीचे 23.79 टक्के शेअर्स पेटीएम कंपनीमध्ये होते. मात्र, आता कंपनी कंपनीचा वाटा फक्त 9.90% राहिला आहे. शेअर्स खरेदीनंतर शर्मा यांचा पेटीएममधील हिस्सा 19.42 टक्के झाला आहे. 

विजय शेखर शर्मा यांच्या One97 कम्युनिकेशन लिमिटेड (OCL) कंपनीकडे पेटीएमची मालकी आहे. पेटीएमबाबत सर्व निर्णय विजय शेखर शर्मा यांना घेता येतील. तसेच सर्व कायदेशीर अधिकारही त्यांच्याकडे येतील. शेअर्स विक्री केल्यानंतर मालकी हक्क आणि फायदे Antfin कंपनीला मिळणार नाहीत, असे माहिती पेटीएमने भांडवली बाजार नियामक संस्था सेबीला दिली. 

दरम्यान, संस्थात्मक गुंतवणुकदारांचे 3.6 टक्के शेअर्स विजय शेखर शर्मा यांच्या कंपनीने ब्लॉक डीलमध्ये खरेदी केले. (Chinese firm Antfin investment in Paytm) भारतीय कायद्यानुसार शर्मा यांना कंपनीतून सर्वाधिक फायदा मिळणार असला तरी कंपनीचे ते पूर्णत: मालक होऊ शकत नाहीत. कंपनीची पूर्णपणे मालकी येण्यासाठी 25% पेक्षा जास्त शेअर्सची मालकी हवी.