गेल्या अनेक दिवसांपासून टाटा समूहाच्या विस्तारा आणि एयर इंडिया या दोन विमान कंपन्यांच्या विलीनीकरणाची चर्चा सुरु होती. अखेर यासाठी आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या असून भारतीय प्रतिस्पर्धा आयोग म्हणजेच Competition Commission of India ने या विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे. आता एयर इंडिया डोमेस्टिक सेवा देणारी देशातील दुसऱ्या क्रमाकांची सर्वात मोठी कंपनी ठरणार आहे. पहिल्या क्रमांकावर अजूनही इंडिगो एयरलाईन्स कायम आहे. तसेच अंतरराष्ट्रीय सेवा पुरविणारी भारतातील पहिल्या क्रमांकाची एयरलाईन्स म्हणून एयर इंडिया नावारूपाला येणार आहे.
याबाबतची अधिकृत माहिती स्वतः भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाने त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून दिली आहे. नियम व शर्थीच्या अधीन राहून टाटा समूहाला ही परवानगी दिली असल्याचे CCI ने म्हटले आहे.
टाटा सन्स आणि सिंगापूर एयरलाईन्स भागीदारीत विस्तारा एयरलाईन्स चालवतात. विस्तारा मध्ये सिंगापूर एयरलाईन्सचे एकूण 49% शेयर्स आहेत. त्यामुळे या विलनिकरणाच्या प्रक्रियेला वेळ लागला असे म्हटले जात आहे. तसेच CCI ने सिंगापूर एयरलाईन्सला एयर इंडियातील काही शेयर्स खरेदी करण्याची देखील अनुमती दिली आहे.
Air India-Vistara merger gets go-ahead from India's antitrust body@eriknjoka gets you the story
— WION (@WIONews) September 2, 2023
For more videos, visit: https://t.co/AXC5qRugeb pic.twitter.com/SlRpf7XtKE
या विलनिकरणामुळे भारताच्या एयरलाईन्स क्षेत्रात कुठलाही नकारात्मक परिणाम होणार नाही असे CCI ने म्हटले आहे. तसेच CCI ने विलनिकरणाला मंजुरी देताना सांगितलेल्या नियम व अटींचे पालन करणे टाटा सन्सला बंधनकारक असल्याचे देखील CCI ने स्पष्ट केले आहे.
काय म्हणाले सीसीआय?
CCI ने टाटा SIA एअरलाइन्सचे एअर इंडियामध्ये विलीनीकरण करण्यास आणि सिंगापूर एअरलाइन्स (SIA) द्वारे एअर इंडियामध्ये काही शेअरहोल्डिंग संपादन करण्यास मान्यता दिली आहे, प्रस्तावित स्वैच्छिक वचनबद्धतेच्या अनुपालनाच्या अधीन आहे." च्या अंतर्गत आहे. तसेच सविस्तर माहिती नंतर दिली जाईल असेही सांगितले.
टाटा सन्सची हिस्सेदारी किती असेल?
विलीनीकरणाच्या करारानुसार, सिंगापूर एयरलाईन्स 25.1% भागभांडवल विकत घेऊन एअर इंडियाच्या विस्तारित भाग भांडवलात रु. 2,059 कोटी योगदान देणार आहे. त्यानंतर टाटा सन्सचा एयर इंडिया कंपनीत हिस्सा 74.9 टक्के असेल. दोन्ही कंपन्यांना लवकरात लवकर या निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे, त्यांनतरच विलनिकरणाची प्रक्रिया अंतिम मानली जाणार आहे.