Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इंडस्ट्री

AI Impact on IT: AI मुळे आयटी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार; कोणत्या विभागावर सर्वाधिक परिणाम होईल?

भारतामध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्राने 90 च्या दशकात पाय रोवले. तेव्हापासून या क्षेत्राची वाढ होतच आहे. आता AI तंत्रज्ञानाचा सगळीकडे बोलबाला सुरू आहे. पुढील तीन ते पाच वर्षात आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांवर AI टुल्समुळे परिणाम होईल, असे अभ्यासातून समोर आले आहे. असे असले तरी नव्या जॉबच्या संधीही निर्माण होतील.

Read More

RIL New Energy Business: सोलार ते हायड्रोजन या न्यू एनर्जी बिझनेसमधून रिलायन्स इंडस्ट्रीज मालामाल होणार

RIL New Energy Business: स्वच्छ इंधन जसे की सौर ऊर्जा, इलेक्ट्रोलायझर, फ्यूएल सेल्स या उद्योगात रिलायन्स नजीकच्या काळात प्रचंड वृद्धी करण्याची शक्यता आहे. येत्या 2025 पर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीजकडून या क्षेत्रात जवळपास 2 लाख कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली जाणार आहे.

Read More

Business Idea: ईशा अंबानी सारख्या दिग्गज लोकांना का खुणावतोय खेळण्यांचा बिझनेस, तुम्ही कसा कराल हा व्यवसाय सुरु?

Toy Business: भारतातील खेळणी उद्योग हा 2022 पर्यंत दुसऱ्या देशावर निर्भर होता. परंतु मेक इन इंडियाच्या माध्यमातून या व्यवसायाचे चित्र पालटले. खेळणी उद्योगाला पोषक वातावरणाबरोबर निधी उपलब्ध करुन देण्यात आल्याने, मागील वर्षात खेळणी निर्यातीचा आकडा 61 टक्क्यांनी वाढला होता. तर आयात 70 टक्क्यांनी घटली होती.

Read More

Export Dips: मे महिन्यात भारतातील वस्तूंच्या निर्यातीत मोठी घसरण, व्यापारी तूट विक्रमी पातळीवर

Export Dips: केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने गुरुवारी निर्यातीची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार मे 2023 या महिन्यात भारतातून एकूण 34.98 बिलियन डॉलर्सची निर्यात झाली आहे. निर्यातीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 10.3% घसरण झाली.

Read More

Go First: गो फर्स्ट पुन्हा भरारी घेण्यास सज्ज, 'डीजीसीए'कडे मागितली परवानगी

Go First: गो फर्स्टने डीजीसीएकडे नोव्हेंबरपर्यंत पूर्ण क्षमतेने विमान सेवा सुरु करण्याचा आराखडा सादर केला आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात 22 विमानांसह सेवा सुरु करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी कंपनीने केली आहे.

Read More

FDI in India: परदेशी थेट गुंतवणुकीचे अनेक अर्ज प्रलंबित; शेजारी देशांच्या गुंतवणुकीसाठी वेगळे नियम कोणते?

भारताशेजारील देशांचे 40-50 परेदशी थेट गुंतवणुकीचे अर्ज प्रलंबित आहेत, असे वृत्त पीटीआय या वृत्तवाहिनीने दिले आहे. चीन, बांगलादेश, पाकिस्तान, भूतान, नेपाळ, म्यानमार आणि अफगाणिस्तान या देशांना जर भारतामध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्यांना आधी सरकारची मान्यता घ्यावी लागते. त्याशिवाय भारतात थेट गुंतवणूक करता येत नाही.

Read More

Go First Airline: 'गो फर्स्ट'पुढे नवं संकट! पायलट्स आणि 'केबिन क्रू'चे राजीनामे रोखण्यासाठी कंपनीची बोनसची ऑफर

Go First Airline: गो फर्स्टने याच महिन्याच्या सुरुवातीला 2 मे 2023 रोजी राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे दिवाळखोरीची याचिका दाखल केली होती. कंपनीची विमान सेवा तात्पुरती खंडीत करण्यात आली आहे. मात्र आर्थिक संकट दूर झाले आणि नादुरुस्त इंजिनाऐवजी नवीन इंजिन्स मिळाली तर ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये सेवा पुन्हा सुरु होईल, असा आशावाद गो फर्स्टच्या व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.

Read More

Personal Computers च्या मागणीत 30% घट, जाणून घ्या काय आहेत कारणे

इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशन जगभरातील संगणक उपकरणांचा त्रैमासिक अहवाल सादर करत असते. डेस्कटॉप, नोटबुक आणि वर्कस्टेशन हे संगणक पर्सनल कॉम्पुटर या वर्गवारीत येतात. गेल्या काही वर्षांपासून या सर्व प्रकारच्या संगणकाच्या विक्रीत वाढ मंदावलेली दिसते आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक वापरासाठी खरेदीसाठी असलेल्या संगणकांना पहिल्यासारखी मागणी नसल्याचे देखील अहवालात म्हटले आहे.

Read More

What is E-waste: भारतात दरवर्षी किती टन इ-कचरा तयार होतो? इ-वेस्ट व्यवसाय कसा चालतो?

चीन, अमेरिकेनंतर इ-कचरा निर्मिती करण्यात भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही आणि इतर इलेक्ट्रिक उपकरणे इ-कचऱ्यामध्ये येतात. भारतात दरवर्षी 30 लाख टनपेक्षा जास्त इलेक्ट्रिक कचरा जमा होतो. या कचऱ्याचे व्यवस्थापन करणे हे मोठे आव्हान आहे. आता नव्याने इ वेस्ट धोरण सरकारकडून आखण्यात येत आहे.

Read More

EV incentives to Employee: इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी 'या' कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना मिळतेय आर्थिक मदत

कॉर्पोरेट कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे. एल अँड टी, वेदांता आणि मेक माय ट्रीप या कंपन्यांनी अशा पर्यावरण पूरक धोरणांची अंमलबजावणी सुरू केली आहे. भविष्यात आणखी कंपन्या कर्मचाऱ्यांना इव्ही खरेदीसाठी इंसेंटिव्ह देतील, असे डेलॉइट या कंपनीने केलेल्या रिसर्चमध्ये म्हटले आहे.

Read More

Vodafone Layoff: वोडाफोन तब्बल 11 हजार कर्मचारी कपात करण्याच्या तयारीत…

व्यवसायात साधेपणा आणण्यासाठी वोडाफोनच्या मुख्यालयातील आणि देशोविदेशातील स्थानिक बाजारपेठेत विस्तारलेल्या वोडाफोनच्या कार्यालयातील सुमारे 11,000 नोकऱ्या कमी करण्याचे नियोजन कंपनीने केले आहे. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीची कामगिरी फारशी चांगली नव्हती असे सांगत कंपनीने कर्मचारी कपात करण्याचे जाहीर केले आहे.

Read More

Alliance Air: आर्थिक संकटात सापडलेल्या अलायन्स एअरला संजीवनी, केंद्र सरकार 300 कोटींची मदत करणार

Alliance Air: एअर इंडियाची टाटा ग्रुपला विक्री केल्यानंतर केंद्र सरकारकडे अलायन्स एअर ही विमान कंपनी आहे. मात्र ही कंपनी देखील प्रचंड तोट्यात आहे. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये अलायन्स एअरला 447.76 कोटींचा तोटा झाला होता. मागील काही महिन्यांपासून अलायन्स एअरला आर्थिक चणचण सोसावी लागत आहे.

Read More