Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

RIL New Energy Business: सोलार ते हायड्रोजन या न्यू एनर्जी बिझनेसमधून रिलायन्स इंडस्ट्रीज मालामाल होणार

Reliance Industries

RIL New Energy Business: स्वच्छ इंधन जसे की सौर ऊर्जा, इलेक्ट्रोलायझर, फ्यूएल सेल्स या उद्योगात रिलायन्स नजीकच्या काळात प्रचंड वृद्धी करण्याची शक्यता आहे. येत्या 2025 पर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीजकडून या क्षेत्रात जवळपास 2 लाख कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली जाणार आहे.

सकाळानुरुप रिलायन्स इंडस्ट्रीजने बिझनेस स्ट्रॅटेजीमध्ये बदल केला आहे. 2030 पर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीज सोलार ते हायड्रोजन या नव्या एनर्जी बिझनेसमधून 10 ते 15 बिलियन डॉलर्सचे उत्पन्न मिळवेल, असे एका अभ्यास अहवालात म्हटले आहे.

स्टॅनफोर्ड सी बर्नस्टेन या संस्थेने रिलायन्सच्या न्यू एनर्जीविषयी अहवाल जाहीर केला आहे. त्यानुसार 2030 पर्यंत रिलायन्स न्यू एनर्जीमधून 10 ते 15 बिलियन डॉलर्सचा महसूल मिळवेल. मात्र यासाठी छोट्या कंपन्यांचे अधिग्रहण, भागीदारी आणि नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा लागेल, असा दावा या अहवालात संस्थेने केला आहे.

स्वच्छ इंधन जसे की सौर ऊर्जा, इलेक्ट्रोलायझर, फ्यूएल सेल्स या उद्योगात रिलायन्स नजीकच्या काळात प्रचंड वृद्धी करण्याची शक्यता आहे. येत्या 2025 पर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीजकडून या क्षेत्रात जवळपास 2 लाख कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली जाणार आहे.

केंद्र सरकारने 2030पर्यंत सौर ऊर्जेची क्षमता 280 गिगावॅट्स आणि ग्रीन हायड्रोजनची क्षमता 5 मिलियन टन इतकी वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. देशात ईलेक्ट्रीक वाहनांची प्रचंड विक्री होत आहे. वर्ष 2030 पर्यंत एकूण प्रवासी आणि कमर्शिअल वाहनांच्या तुलनेत अनुक्रमे 5% आणि 21% पर्यंत वाढेल, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. त्याशिवाय देशातील इलेक्ट्रिक दुचाकींची संख्या 21% पर्यंत वाढेल, असा दावा करण्यात आला आहे.

या क्षेत्रातील संधींचा विचार करुन रिलायन्सने आक्रमकपणे गुंतवणूक सुरु केली आहे. वर्ष 2030 पर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीजकडून 100 गिगावॅट्सचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे. भारताच्या एकूण सौर ऊर्जा निर्मितीमध्ये रिलायन्सचा 35% वाटा असेल. सोलार, बॅटरी आणि हायड्रोजन टीएएम उद्योगात रिलायन्स इंडस्ट्रीजचा वाटा अनुक्रमे 60%, 30% आणि 20% इतका असेल असा, अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

या आधारवर विचार केला तर येत्या 2030 पर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीज न्यू एनर्जी बिझनेसमधून 10 ते 15 बिलियन डॉलर्सचे उत्पन्न मिळवेल, असा दावा करण्यात आला आहे. यात टीएएमचा वाटा 40% असेल, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. ग्रीन एनर्जी सोल्युशन्ससाठी लागणारी सामुग्री पुरवण्यासाठी रिलायन्सकडून केला जात आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचा ताळेबंद मजबूत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून हायड्रोजन निर्मिती आणि इलेक्ट्रोलायझर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाईल. वर्ष 2030 पर्यंत रिलायन्सचा हायड्रोजन मार्केटमध्ये 19% वाटा असेल. इलेक्ट्रोलायझरमध्ये 16 गिगावॅट इतका वाटा असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.