EV incentives to Employee: इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी कॉर्पोरेट कंपन्या कर्मचार्यांना आर्थिक आणि इतरही प्रकारे मदत करण्याचा ट्रेंड वाढत आहे. (Incentives for ev purchases to employees) त्यामुळे आता कर्मचार्यांचा ओढाही EV गाड्यांकडे वाढू शकतो. लार्सन अँड टुब्रो, मेक माय ट्रिप आणि वेदांता या तीन कंपन्या असे धोरण आखण्यात आघाडीवर आहेत.
कर्मचाऱ्यांसाठी इको फ्रेंडली पॉलिसी
जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी इव्ही गाड्या खरेदी कराव्यात यासाठी कॉर्पोरेट कंपन्या नव्याने पॉलिसी बनवत आहेत. कंपनी आवारात चार्जिंग स्टेशन, ट्रान्सपोर्टेशनसाठी इलेक्ट्रिक गाड्या या सुविधांसोबतच कर्मचार्याला जर स्वत:ची दुचाकी किंवा चारचाकी गाडी खरेदी करायची असेल तर कंपनीकडून आर्थिक मदत मिळत आहे. सध्या जरी हे प्रमाण कमी असले तरी भविष्यात अनेक कॉर्पोरेट कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांसंदर्भात पॉलिसी तयार करतील, असे जाणकारांचे मत आहे.
डेलॉइट इंडिया या रिसर्च संस्थेने याबाबत एक अभ्यास केला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, बड्या कॉर्पोरेट कंपन्या ज्यांची धोरणे पर्यावरणपूरक आणि सामाजिक जाणिवेतून 2070 पर्यंत झिरो एमिशन हे धोरण भारताने आखले आहे. म्हणजे 2070 पर्यंत उत्सर्जन शून्य टक्के झालेले असेल. इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी प्रोत्साहन आणि मदत करणाऱ्या कंपन्यांची संख्या सध्या फक्त 15% आहे. मात्र, भविष्यात ही संख्या वाढू शकते.
वेदांता कंपनी इव्ही पॉलिसी
वेदांता ही भारतातील खनिज आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील मोठी कंपनी आहे. या कंपनीने कर्मचार्यांना गाडी खरेदीसाठी 30 ते 50% पर्यंत आर्थिक मदत करण्यास सुरुवात केली आहे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदी करताना ही बेनिफिट कर्मचार्यांना मिळतील.
एल अँड टी कंपनीने कार्बन न्युट्रल होण्याचे ध्येय 2040 पर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. ऑफिसेस, प्रोजेक्ट साइट आणि ट्रान्सपोर्टेशनसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्यात येणार आहे. त्यामध्ये कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी मदत करण्याच्या धोरणाचाही समावेश आहे. तसेच सर्व ऑफिसच्या ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यासही सुरुवात केली आहे.
मेक माय ट्रिप इव्ही पॉलिसी
मेक माय ट्रिप कंपनीकडूनही कर्मचार्यांना इव्ही वाहन खरेदीसाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. तसेच पहिल्या वर्षाच्या वाहन विम्याचा 1 लाखापर्यंतचा खर्च माघारी दिला जात आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नावे आम्ही पाच झाडे लावत असून त्याचे प्रमाणपत्र कर्मचार्याला देतो. या प्रमाणपत्रावर कोणत्या प्रकारचे झाड लावले याची माहितीही दिली जाते, असे मेक माय ट्रिपचे एचआर विभागाचे प्रमुख युवराज श्रीवास्तव यांनी म्हटले.