Toy Business Of India: आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये भारतीय खेळणी उद्योगाची एकूण उलाढाल आणि निर्यात 202 अब्ज डॉलर होती. त्यानंतर केंद्र सरकारने मेक इन इंडियाच्या माध्यमातून खेळणी उद्योगाला बूस्टर डोस दिल्यानंतर केवळ तीन वर्षात खेळणी उद्योगाने भरारी घेतली. त्यानंतर आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये खेळणी उद्योगाची निर्यात 326 अब्ज डॉलरवर पोहचली. म्हणजेच तीन वर्षात या उद्योगाने 61.39 टक्क्यांची वृध्दी नोंदवली.
Table of contents [Show]
खेळणी क्षेत्रात रिलायन्स रिटेलचे पाऊल
भारतातील दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी आणि रिलायन्स रिटेलची प्रमुख ईशा अंबानी देखील खेळणी उद्योगात उतरली आहे. रिलायन्स रिटेलने यासंबंधीत एक घोषणा केली होती. ईशा अंबानीने याकरीता हरियाणास्थित सोनपतची रिटेल कंपनी ई सर्कल सोबत करार केला असल्याची माहिती पुढे आलेली आहे. देशातील घरगुती खेळण्यांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स रिटेल कंपनीने हा निर्णय घेतला असल्याचे समजते. रिलायन्स रिटेलच्या या वाटचालीचा उद्देश ब्रँडेड खेळण्यांच्या बाजारपेठेत मोठा वाटा मिळवणे आणि लहान दुकानांपर्यंतही पोहोचणे हा आहे.
भारतीय खेळणी उद्योग वाढीस लागला
भारतीय खेळणी उद्योग प्रचंड वेगाने वाढला आहे. युरोप, जपान, अमेरिकेतील मुलांकडे भारतीय खेळणी पोहचायला लागली आहे. तुम्ही देखील या क्षेत्रात प्रवेश करुन जोरदार कमाई करु शकता. अतिशय कमी खर्चामध्ये हा उद्योग कसा सुरु करायचा आणि त्यामाध्यमातून चांगला पैसा कसा मिळवायचा, हे आज आपण येथे जाणून घेणार आहोत.
भारताची प्रगतीकडे वाटचाल
तसे पाहता भारतातील खेळणी बाजारपेठेवर चीनचे वर्चस्व आहे. परंतु, सरकारला चीनचा हा दबदबा कमी करण्याबरोबरच अमेरिका आणि युरोपमधील मुलांच्या हातात भारतीय खेळणी मिळावीत, यासाठी भारत प्रयत्नशील आहे. यात भारताला काही प्रमाणात यश मिळालेलं आहे. खेळणी उद्योग हा एक असा उद्योग आहे, ज्यामध्ये प्रचंड मागणी आहे आणि ती कधीही कमी होणार नाही.
थोड्याशा गुंतवणुकीमधून सुरुवात करा
कोणत्याही व्यवसायाची सुरुवात करतांना मोठ्या प्रमाणातून कमी प्रमाणाकडे न जाता, कमी प्रमाणातून-मोठ्या प्रमाणाकडे जाणे कधाही चांगले असते. खेळण्यांचा व्यवसाय सुरु करण्याआधी तुम्ही त्याची संपूर्ण माहिती घ्या. सॉफ्ट टॉईज आणि टेडी बनवण्याचा व्यवसाय तुम्ही घरबसल्या सुरु करु शकता. यासाठी तुम्ही सुरुवातीला 40,000 रुपयांची गुंतवणूक करुन देखील व्यवासायाला सुरुवात करु शकता. 40,000 रुपये गुंतवल्यास तुम्हाला त्यावर सुरुवातीला प्रत्येक महिन्यात 10,000 रुपये नफा मिळू शकतो.
कोणकोणत्या वस्तू गरजेच्या
या व्यवसायातील गुंतवणुकीबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला सगळ्यात आधी दोन मशीन खरेदी कराव्या लागतील. कच्चा माल, कापड कापण्याचे मशीन आणि शिलाई मशीन घ्यावे लागेल. हाताने चालवलेल्या कापड कापण्याच्या यंत्राची किंमत बाजारात सुमारे 4,000 रुपयांपासून सुरू होते. तर शिलाई मशिन 9,000 ते 10,000 रुपयांना मिळतात. तर इतर किरकोळ खर्चासाठी 5000 ते 7000 रुपये खर्च येणार.
नफा किती
सुरुवातीला तुम्ही 15,000 रुपयांच्या कच्च्या मालासह 100 युनिट्स मऊ खेळणी आणि टेडी सहज बनवू शकता. अशा प्रकारे, हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला सुमारे 35,000 रुपये खर्च येईल. सॉफ्ट टॉय किंवा टेडीचे बाजारात 500-600 रुपये सहज मिळतात. म्हणजे 35000 ते 40000 रुपये गुंतवून करुन तुम्ही दरमहा 50,000-60,000 रुपये सहज कमवू शकता.