Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Export Dips: मे महिन्यात भारतातील वस्तूंच्या निर्यातीत मोठी घसरण, व्यापारी तूट विक्रमी पातळीवर

Export

Image Source : www.livemint.com

Export Dips: केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने गुरुवारी निर्यातीची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार मे 2023 या महिन्यात भारतातून एकूण 34.98 बिलियन डॉलर्सची निर्यात झाली आहे. निर्यातीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 10.3% घसरण झाली.

वाढत्या महागाईने पाश्चिमात्य देशांमधील भारतीय वस्तूंची मागणी कमी झाली असून त्याचा फटका निर्यातीला बसला आहे. मे महिन्यात भारतातून होणाऱ्या एकूण निर्यातीत 10.3% घसरण झाली आहे. मे महिन्यात व्यापारी तूट 22 बिलियन डॉलर्सवर गेली आहे. सलग चौथ्या महिन्यात निर्यातीतील घसरणीने भारतात मंदी हातपाय पसरत असल्याचे बोलले जात आहे.

केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने गुरुवारी निर्यातीची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार मे 2023 या महिन्यात भारतातून एकूण 34.98 बिलियन डॉलर्सची निर्यात झाली आहे. निर्यातीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 10.3% घसरण झाली.

गेल्या वर्षी मे 2022 मध्ये 61.13 बिलियन डॉलर्सची निर्यात करण्यात आली होती. मे 2023 मधील निर्यात एप्रिल 2023 इतकीच जवळपास सारखीच होती. एप्रिल 2023 मध्ये 34.66 बिलियन डॉलर्सची निर्यात झाली होती.

दुसऱ्या बाजूला व्यापारी तूट देखील वाढली आहे. मे महिन्यात व्यापारी तुटीचा आकडा 22.12 बिलियन डॉलर इतका वाढला आहे. मागील पाच महिन्यांतील हा उच्चांकी स्तर आहे. व्यापारी तूट वाढल्याने सरकारला ती भरुन काढण्यासाठी तरतूद करावी लागते.

गेल्या महिन्यात पेट्रोलियम प्रोडक्ट्स, जेम्स अॅंड ज्वेलरी, अभियांत्रिकी वस्तू, रेडिमेड गारमेंट्स आणि केमिकल्स या वस्तूंच्या निर्यातीत घसरण झाली आहे. मे महिन्यात अभियांत्रिकी वस्तूंच्या निर्यातीत 4% घसरण झाली. गेल्या महिन्यात 9.30 बिलियन डॉलर्सची निर्यात करण्यात आली होती.

निर्यातीबरोबरच आयातीत देखील घसरण झाली आहे. मे महिन्यात भारतात 57.1 बिलियन डॉलर्सची आयात करण्यात आली. त्यात 6.6% घसरण झाली.

जगातिक पातळीवर मंदीमुळे भारताच्या निर्यातीला फटका बसला असल्याचे कॉमर्स सेक्रटरी सुनील बरथवाल यांनी सांगितले. मात्र सेवा क्षेत्रातील निर्यातीवर तूर्त मंदीचा परिणाम झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

निर्यातीत घसरण होण्याची कारणे

  • भारतासाठी अमेरिका-युरोप ही मोठी बाजारपेठ आहे. मात्र या देशांमधील भारतीय वस्तूंची मागणी कमी झाली आहे.
  • अमेरिका आणि युरोपाला मागील वर्षभरापासून महागाईने त्रस्त केले आहे.
  • रशिया आणि युक्रेन युद्धाने जगभरात वस्तूंचा पुरवठा विस्कळीत झाला होता. याचे पडसाद महागाईच्या रुपात बाजारात उमटले.
  • सलग चौथ्या महिन्यात भारताच्या निर्यातीत घसरण झाली.  मे महिन्यात 10.3% निर्यात घसरली.
  • मे महिन्यात भारतात 57.1 बिलियन डॉलर्सची आयात करण्यात आली. त्यात 6.6% घसरण झाली.
  • एकूण 30 पैकी 17 क्षेत्रातील निर्यातीत घसरण झाल्याचे दिसून आले.