Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

कर

Rent Free Home चा मिळेल फायदा, कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार वाढ!

CBDT च्या या निर्णयामुळे मोठ्या कंपन्यांमध्ये कामा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. कारण ज्या कंपन्यांची आर्थिक उलाढाल अधिक आहे, व्याप्ती अधिक आहे अशाच कंपन्या त्यांच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांना निवासाची सोय उपलब्ध करून देत असतात. तसेच सरकारी विद्यापीठ, कर्मचारी देखील निवास योजनांचा लाभ घेत असतात.

Read More

Insurance Policy: विमा पॉलिसीसाठी 5 लाखांपेक्षा जास्त प्रीमियम भरत असाल तर भरावा लागेल कर

आयकर विभागाने पाच लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक प्रीमियम असलेल्या आयुर्विमा पॉलिसींच्या मुदतपूर्तीच्या रकमेवर कर आकारला जाईल असा नियम केला आहे. या बदललेल्या नियमामुळे जे नागरिक पाच लाखांपेक्षा अधिक वार्षिक प्रीमियम भरत आहेत त्यांना प्रीमियमवर कर भरावा लागणार आहे. याआधी विमा धारकास आयकरातून सूट देण्यात आली होती. यापुढे मात्र अशी सवलत घेता येणार नाहीये.

Read More

Tax Collection: कर संकलनात झाली भरघोस वाढ, चालू वर्षात प्रत्यक्ष करातून सरकारला 5.84 लाख कोटींचे उत्पन्न

Tax Collection: आर्थिक वर्ष 2022-23 साठी आयकर विवरण प्रक्रिया नुकताच पूर्ण झाली. यंदा रिटर्न फाईल करणाऱ्या करदात्यांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. इन्कम टॅक्स विभागाने आयटीआर फायलिंगची प्रक्रिया सोपी आणि सुटसुटीत केल्याने फायदा झाल्याचे बोलले जाते.

Read More

IT Penalties: ITR भरताना घरभाड्याची बनावट पावती जमा केल्यास किती दंड होऊ शकतो?

आयकर विभाग तुम्ही दिलेली सर्व माहिती पडताळून पाहत असते. संशय आल्यास अतिरिक्त माहिती आणि पुरावे सादर करण्यास सांगू शकतात. जर तुम्ही दिलेले पुरावे खरे असतील तर चिंता करण्याची गरज नाही. मात्र, जर तुम्ही बनावट पुरावे सादर केल तर दंड होईल. घरभाड्याच्या बनावट पावत्या दिल्यास किती दंड होऊ शकतो माहितीये का?

Read More

MPL Layoff: ऑनलाइन गेमिंगवरील 28% GST चा परिणाम, ,MPL मध्ये 350 कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

Mobile Premier League ने कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या एका ई-मेलद्वारे 350 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 8 ऑगस्टला पाठवण्यात आलेल्या या मेलमध्ये जीएसटी 28 टक्क्यांपर्यंत वाढवल्यामुळे आमच्यावरील कराचा बोजा 350 ते 400 टक्क्यांनी वाढणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Read More

Moonlighting employees: मूनलाइटिंगमधून कमाई करणाऱ्यांवर आयकर विभागाची नजर; अकराशे कर्मचाऱ्यांना नोटीस

जर तुम्ही मूनलाइटिंगमधून मिळालेले उत्पन्न रिटर्न फाइल करताना दाखवले नसेल तर अजूनही वेळ गेली नाही. कारण, आयकर विभागाने उत्पन्न लपवणाऱ्यांना नोटीस पाठवण्यास सुरुवात केली आहे. Revised ITR फाइल करून तुम्ही हे उत्पन्न अद्यापही दाखवू शकता.

Read More

ITR Filling: इन्कम टॅक्स रिटर्न फायलिंग करण्यात महाराष्ट्र अव्वल, 18 लाख 52 हजार 754 करदात्यांनी सादर केले विवरणपत्र

ITR Filling: केंद्र सरकारने राज्यनिहाय रिटर्न फाईल करणाऱ्यांची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यात महाराष्ट्रातून सर्वाधिक 18 लाख 52 हजार 754 टॅक्सपेअर्सनी रिटर्न फाईल केला आहे. महाराष्ट्रानंतर गुजरातमधून 14 लाख 2 हजार 636 रिटर्न फाईल करण्यात आले.

Read More

Fake ITR refund Alert! इन्कम टॅक्स रिफंडचा मेसेज तुम्हाला आलाय का? फसवणुकीपासून राहा सावधान

ITR रिफंड मंजूर झाल्याचे बनावट मेसेज अनेकांना येत आहे. त्यापासून सावध राहण्याचा इशारा सरकारने दिला आहे. फिशिंग स्कॅमद्वारे करदात्यांची फसवणूक होऊ शकते. काय आहे हा घोटाळा जाणून घ्या.

Read More

Online Gaming GST: ऑनलाइन गेमिंगवर जीएसटी 28 टक्केच! 6 महिन्यानंतर होणार समीक्षा

ऑनलाइन गेमिंग, कॅसिनो आणि घोडेस्वारी या खेळांवर आकारण्यात आलेला वस्तू व सेवा कर कमी न करण्याचा निर्णय GST परिषदेने घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी येत्या 1 ऑक्टोबरपासून केली जाईल असे परिषदेने म्हटले आहे. तसेच सदर कर लागू केल्यानंतर 6 महिन्यानंतर त्याचा आढावा घेतला जाईल आणि त्यानुसार पुढील ध्येय धोरणे ठरवता येतील असे परिषदेने म्हटले आहे.

Read More

GST Collection: केंद्र सरकारला मिळाला जुलै महिन्यात जीएसटीतून 1.65 लाख कोटींचा महसूल

GST Collection: अर्थव्यवस्था वेगाने वाढत असून त्याचा परिणाम कर संकलनावर झाला आहे. जुलै महिन्यात वस्तू आणि सेवा करातून केंद्र सरकारला 1.65 लाखांचा कर महसूल मिळाला आहे.

Read More

ITR Deadline: आतापर्यंत 6.50 कोटी रिटर्न फायलिंग पूर्ण, ITRसाठी मुदतवाढीची मागणी

ITR Deadline: आयकर विभागाकडून मुदतवाढीबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. शेवटचा दिवस असल्याने रिटर्न फायलिंगसाठी नोकरदार वर्गाची धावपळ सुरु आहे. मागील आठवडाभर चार्टर्ड अकाउंटंटच्या कार्यालयात देखील आयटीआर फायलिंगची कामे प्राधान्याने सुरु होती.

Read More

Fiscal Deficit: आर्थिक वर्षाच्या पहिल्याच तिमाहीत सरकारचा खर्च वाढला, वित्तीय तुटीचा आकडा 4.51 लाख कोटींवर

Fiscal Deficit: बजेट सादर करताना अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट 5.9% (जीडीपीच्या तुलनेत) इतकी मर्यादित ठेवण्याचे लक्ष्य ठेवले होते. गेल्या वर्षी वित्तीय तूट 6.4% इतकी होती.

Read More