Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tax Calendar for September 2023: करदात्यांनो सप्टेंबरमधील 'या' महत्त्वाच्या तारखा विसरू नका!

Tax Calendar for September 2023

Tax Calendar for September 2023: सप्टेंबर महिन्यात करदात्यांशी संबंधित काही महत्त्वाच्या तारखा आहेत. ज्या तुम्ही मिस केल्या तर तुम्हाला आर्थिक भुर्दंड पडू शकतो.

सप्टेंबर महिना सुरू झाला आहे. या महिन्यात बऱ्याच महत्त्वाच्या तारखा आहेत. पण हे फक्त सणांच्या तारखांबाबत नाहीये. दहीहंडी, गणेशोत्सवाबरोबरच आणखी काही महत्त्वाच्या तारखा आहेत. त्या टॅक्सशी संबंधित आहेत. तुम्ही जर टॅक्स भरत असाल किंवा आयटीआर फाईल करत असाल. तर या तारखा तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. नाहीतर तुम्हाला दंड भरावा लागेल.

सप्टेंबर महिन्यात करदात्यांशी संबंधित काही महत्त्वाच्या तारखा आहेत. ज्या तुम्ही मिस केल्या तर तुम्हाला आर्थिक भुर्दंड पडू शकतो.

अ‍ॅडव्हान्स टॅक्स (Advance Tax)

इन्कम टॅक्स कायद्यानुसार ज्या स्लॅबनुसार उत्पन्न मिळवता त्यानुसार त्यावर प्रत्येकाला टॅक्स भरावा लागतो. यासाठी प्रत्येकवेळी दरवर्षी 31 जुलैपर्यंत वाट पाहण्याची गरज नाही. त्याऐवजी तुम्ही ते वेळोवेळी भरू शकता. सरकार प्रत्येक 3 महिन्यांनी टॅक्स भरण्यासाठी मुदत देते. त्याला अ‍ॅडव्हान्स टॅक्स म्हटले जाते. हा टॅक्स एका आर्थिक वर्षात 4 भागांमध्ये भरता येतो. 15 जूनपर्यंत 15 टक्के, 15 सप्टेंबरपर्यंत 45 टक्के, 15 डिसेंबरपर्यंत 75 टक्के आणि 100 टक्के 15 मार्चपर्यंत भरता येतो. तर या महिन्यातील 45 टक्के अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर आहे.

तुम्हाला जर पगाराव्यतिरिक्त एफडी किंवा इतर स्त्रोतांमधून उत्पन्न मिळत असेल तर तुम्हाला 15 सप्टेंबरपूर्वी अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरणे गरजेचे आहे. एका आर्थिक वर्षात 10 हजार किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम देय असते, तेव्हा अ‍ॅडव्हान्स टॅक्स लागू होतो.

टॅक्स ऑडिट रिपोर्ट (Tax Audit Report)

ज्यांचे उत्पन्न 50 लाखापेक्षा अधिक आहे; त्यांना टॅक्स ऑडिट रिपोर्ट करून घ्यावा लागतो. टॅक्स ऑडिट रिपोर्ट फाईल करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर आहे. या तारखेच्या आत खात्याचे ऑडिट करून घेतले नाही. तर त्यावर दंड आकारला जातो. हा दंड एकूण उत्पन्नाच्या 0.5 टक्के किंवा 1.50 लाख यापेक्षा जो कमी असेल. तेवढा आकारला जातो.

टीडीएस/टीसीएस भरणे (Deposit TDS/TCS)

जर तुम्हाला टीडीएस आणि टीसीएस लागू होत असेल तर ऑगस्ट महिन्याचा टीडीएस भरण्याची अंतिम तारीख 7 सप्टेंबर आहे. जेव्हा पेमेंट मिळते तेव्हा टीडीएस कापला जातो जेव्हा पेमेंट केले जाते तेव्हा टीसीएस कापला जातो.  

या व्यतिरिक्त प्रत्येक महिन्याचा आणि तीन महिन्यांचा जीएसटी भरण्याची अंतिम तारीख 11 सप्टेंबर आहे. टीडीएस सर्टिफिकेट इश्यू करण्याची अंतिम तारीख 14 सप्टेंबर आहे. ऑगस्ट महिन्याचा पीएफ/ईएसआय पेमेंट करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर आहे. त्यामुळे करदाते आणि जे नियमित टॅक्स भरतात. त्यांच्यासाठी सप्टेंबर महिन्यातील तारखा विसरणे महागात पडू शकते.