Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Multi cap mutual Funds : सर्वोत्तम मल्टी कॅप म्युच्युअल फंड शोधताय? 'या' 7 स्कीम्सनं दिलाय 26 टक्के परतावा!

Multi cap mutual Funds : सर्वोत्तम मल्टी कॅप म्युच्युअल फंडाच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला काही योजनांची माहिती देत आहोत. मागच्या तीन वर्षांपासून या योजनांमार्फत परतावा चांगला मिळत आहे. एएमएफआयच्या आकडेवारीवरून या जवळपास 7 विविध योजनांनी खूप जास्त परतावा दिल्याचं दिसतं.

Read More

PM Care for Children Scheme 2022: पीएम केअर फॉर चिल्ड्रन योजनेबद्दल माहित करून घ्या

Children's Day 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी 29 मे 2021 रोजी पीएम केअर फॉर चिल्ड्रन योजना जाहीर केली होती, या योजनेच्या माध्यमातून देशातील सर्व बालकांना लाभ मिळणार आहे ज्यांनी कोरोना महामारीच्या काळात आपले आई-वडील गमावले आहेत. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे साधन नाही. अशा अनाथ मुलांची काळजी घेण्यासाठी केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे.

Read More

Small Saving Schemes Interest Rate: सामान्य गुंतवणूकदारांना सरकारचे न्यू ईयर गिफ्ट,अल्प बचत योजनांचे व्याजदर वाढवले

Small Saving Schemes Interest Rate: केंद्र सरकारकडून तिमाही स्तरावर अल्प बचत योजनांच्या व्याजदरांचा आढावा घेतला जातो. शुक्रवारी 30 डिसेंबर 2022 रोजी अल्प बचतीच्या योजनांच्या व्याजदरात वाढ केली. सरकारने व्याजदर वाढवून सामान्य गुंतवणूकदारांना वर्ष 2023 चे न्यू ईयर गिफ्ट दिले.

Read More

World Bank Forecast: 2023 मध्ये बसेल विकसनशील देशांना आर्थिक मंदीचा फटका!

World Bank Forecast: जागतिक बँकेकडून ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट्स अहवाल(Global Economic Prospects report) जाहीर करण्यात आला. त्यानुसार 2023 मध्ये विकसनशील देशांना मंदीचा फटका बसण्याचा अंदाजही यावेळी वर्तण्यात आला आहे.

Read More

Income Tax Return: आयकर रिटर्ननं 9 दिवस आधीच गाठला टप्पा, 11 जुलैपर्यंत किती कर जमा? जाणून घ्या...

Income Tax Return: आयकर भरण्याची सध्या लगबग सुरू आहे. 31 जुलै 2023 ही आयटीआर भरण्याची शेवटची तारीख आहे. प्राप्तिकर विभाग करदात्यांना 31 जुलै 2023 पर्यंत आयटीआर दाखल करण्याची वारंवार आठवण करून देत आहे. त्यात आता यासंबंधीचे आकडे समोर आले आहेत.

Read More

Gold Price Today: सोने महागले, जाणून घ्या आजचा मुंबईतील सोने आणि चांदीचा दर

कोरानाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर मागील आठवडाभरात सोने आणि चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1860 डॉलरवर गेले आहे.

Read More

FD interest : मुदत ठेवींवरच्या व्याजदरात 'या' बँकेनं केली वाढ, ग्राहकांना कमाईची चांगली संधी

FD interest : मुदत ठेवींच्या माध्यमातून कमाई करण्याची चांगली संधी ग्राहकांना उपलब्ध झालीय. मुदत ठेवीत रक्कम ठेवत असताना सर्वप्रथम व्याजाचा दर पाहिला जातो. आता अधिकच्या व्याजदरासोबत एफडी उपलब्ध झालीय. त्यामुळे ग्राहकांचा कल निश्चितच या मुदत ठेवीत पैसे गुंतवण्यासाठी वाढणार आहे.

Read More

Netweb Technologies IPO: कमाईची संधी, येणार 'नेटवेब'चा आयपीओ; जाणून घ्या सविस्तर माहिती...

Netweb Technologies IPO: आयपीओच्या माध्यमातून कमाईचा आणखी एक पर्याय गुंतवणूकदारांसमोर उपलब्ध झाला आहे. नेटवेब टेक्नॉलॉजीज इंडियाचा आयपीओ बाजारात दाखल होणार आहे. कंपनी कॉम्प्यूटिंग सोल्यूशन प्रदान करते. या आयपीओच्या माध्यमातून गुंतवणूकदार कमाई करू शकतात.

Read More

जगभरातील सेंट्रल बँकांनी खरेदी केलं तब्बल 4 लाख किलो सोने, काय आहे यामागचे कारण

Central Bank Gold Purchase : यंदाच्या निर्बंधमुक्त दसरा-दिवाळीत भारतीयांनी सोन्याची प्रचंड खरेदी केली होती. ग्राहकांबरोबरच केंद्रीय बँकांनी आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सोन्याची मोठी खरेदी केली आहे. एका अहवालानुसार जगभरातील सेंट्रल बँकांनी थोडंथोडकं नव्हे तर तब्बल 4 लाख किलो सोनं खरेदी केले.

Read More

Indian railways: जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेची खूशखबर, काय आहे 'खास' घोषणा?

Indian railways: रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेनं जनरलच्या डब्यातून प्रवास करणाऱ्यांसाठी आता विशेष सेवा सुरू केली आहे. त्यासंदर्भातली घोषणादेखील करण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्यापेक्षा आता प्रवास अधिक चांगला होणार आहे.

Read More

'UPI'चे रेकॉर्डब्रेक व्यवहार मात्र कॅशलेस इकॉनॉमीपुढे अडथळ्यांची शर्यत!

रोखीनेच व्यवहार करण्याची सवय बदलून तिला डिजिटल पेमेंटमध्ये बदलण्याचा भारतीयांचा प्रवास थक्क करणारा आहे. नोटबंदीनंतर ऑनलाईन पेमेंटचे प्रमाण हजारो पटीने वाढले आणि याला कारणीभूत ठरली फिनटेक कंपन्यांमधील तंत्रज्ञान क्रांती आणि यूपीआयचे युजर फ्रेंडली पेमेंट मॉडेल. यूपीआयच्या माध्यमातून दरमहा होणाऱ्या व्यवहारांची एकूण उलाढाल केव्हाच 1 ट्रिलियन डॉलर्स अर्थात 80 लाख कोटी रुपयांवर गेली आहे.

Read More

FPO Scheme : सरकार शेतकऱ्यांना देणार 15 लाखांची मदत, तेव्हा 'या' आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करा

PM Kisan FPO Scheme : नवीन कृषी व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देशभऱ्यातील शेतकऱ्यांना 15 लाख रुपये देणार आहे. शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता मिळावी, हा यामगाचा उद्देश आहे.

Read More