Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Netweb Technologies IPO: कमाईची संधी, येणार 'नेटवेब'चा आयपीओ; जाणून घ्या सविस्तर माहिती...

Netweb Technologies IPO: कमाईची संधी, येणार 'नेटवेब'चा आयपीओ; जाणून घ्या सविस्तर माहिती...

Netweb Technologies IPO: आयपीओच्या माध्यमातून कमाईचा आणखी एक पर्याय गुंतवणूकदारांसमोर उपलब्ध झाला आहे. नेटवेब टेक्नॉलॉजीज इंडियाचा आयपीओ बाजारात दाखल होणार आहे. कंपनी कॉम्प्यूटिंग सोल्यूशन प्रदान करते. या आयपीओच्या माध्यमातून गुंतवणूकदार कमाई करू शकतात.

यापूर्वी अनेक कंपन्यांनी आयपीओ (Initial Public Offering) आणले आहेत. यापैकी काही आयपीओंमध्ये गुंतवणूकदारांनी (Investors) चांगलाच नफा कमावला आहे. आता नेटवेबचा आयपीओ दाखल होणार आहे. सोमवारी (17 जुलै) हा आयपीओ उघडणार असून 19 जुलैपर्यंत सबस्क्राइब करता येणार आहे. या आयपीओच्या अंतर्गत कंपनी 206 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी करणार आहे. विद्यमान प्रवर्तक आणि भागधारक 85 लाख इक्विटी शेअर्स ऑफर करतील. अपर प्राइस बँडद्वारे कंपनी जवळपास 632 कोटी रुपये उभारणार आहे. नवभारत टाइम्सनं हे वृत्त दिलं आहे.

19 जुलैपर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला

नेटवेब टेक्नॉलॉजीज इंडिया आयपीओसाठी 30 शेअर्सचा लॉट आकार आणि 475-500 रुपये प्रति शेअरचा प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांना एकाच लॉटसाठी अर्ज करण्यासाठी किमान 15,000 रुपये गुंतवावे लागणार आहेत. हा आयपीओ 19 जुलैपर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला असणार आहे. शेअर्सचं अलॉटमेंट 24 जुलै रोजी करता येणार आहे.

शेअर्सचं लिस्टिंग 27 जुलैपर्यंत

26 जुलै 2023पर्यंत गुंतवणूकदारांच्या डीमॅट खात्यात शेअर्स जमा केले जाऊ शकतात. कंपनीच्या शेअर्सचं लिस्टिंग 27 जुलैपर्यंत करता येणार आहे. नेटवेब टेक्नॉलॉजीज आयपीओच्या अंतर्गत, पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी 50 टक्के शेअर्स राखीव ठेवण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर 15 टक्के शेअर्स एचएनआयसाठी आणि 35 टक्के रिटेल गुंतवणूकदारांसाठी हे शेअर्स राखीव असणार आहेत.

नेटवेब टेक्नॉलॉजीविषयी...

नेटवेब टेक्नॉलॉजी या कंपनीची स्थापना 1999 मध्ये झाली. आर्थिक वर्ष 2022-23मध्ये कंपनीला 46.94 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीचा एकूण महसूल 445.65 कोटी रुपये होता. कंपनी हाय-एंड कॉम्प्युटिंग सोल्यूशन्स सर्व्हिस ऑफर करते.

(डिसक्लेमर : शेअर बाजार/म्युच्युअल फंड SIPमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्स आणि म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)