Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Income Tax Return: आयकर रिटर्ननं 9 दिवस आधीच गाठला टप्पा, 11 जुलैपर्यंत किती कर जमा? जाणून घ्या...

Income Tax Return: आयकर रिटर्ननं 9 दिवस आधीच गाठला टप्पा, 11 जुलैपर्यंत किती कर जमा? जाणून घ्या...

Image Source : www.hdfcsales.com

Income Tax Return: आयकर भरण्याची सध्या लगबग सुरू आहे. 31 जुलै 2023 ही आयटीआर भरण्याची शेवटची तारीख आहे. प्राप्तिकर विभाग करदात्यांना 31 जुलै 2023 पर्यंत आयटीआर दाखल करण्याची वारंवार आठवण करून देत आहे. त्यात आता यासंबंधीचे आकडे समोर आले आहेत.

या वर्षीचे आयटीआर (Income tax return) दाखल करण्याचे आकडे उत्साहवर्धक आहेत. प्राप्तिकर विभागानं याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. प्राप्तिकर विभागानं एका ट्विटद्वारे म्हटलं आहे, की आम्हाला हे कळवण्यात आनंद होत आहे, की आजपर्यंत म्हणजेच 11 जुलै 2023-24च्या मूल्यांकन वर्षासाठी एकूण 2 कोटीहून अधिक आयकर रिटर्न भरला गेला आहे. मागच्या वर्षीची तुलना केल्यास 20 जुलै 2022पर्यंत 2 कोटी आयटीआर दाखल करण्यात आले होते.

आयकर विभागानं मानले आभार

आमच्या करदात्यांनी 9 दिवसांपूर्वी हा 2 कोटींचा टप्पा गाठण्यासाठी आम्हाला मदत केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा चांगला असून आम्ही करदात्यांनी केलेल्या सहकार्याचं कौतुक करतो. आयकर विभागानं पुढे असंही म्हटलं आहे, की ज्यांनी मूल्यांकन वर्ष 2023-24साठी त्यांचा आयटीआर दाखल केला नाही, त्यांना आम्ही ते लवकरात लवकर दाखल करण्याचं आवाहन करत आहोत. म्हणजे शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळता येईल.

कागदपत्रे कोणती?

वार्षिक उत्पन्न मर्यादा विभागानं ठरवल्यापेक्षा अधिक असेल अशा 60 वर्ष वयापेक्षा कमी असलेल्या नागरिकांनी 31 जुलैपूर्वी आयकर भरावा. आयकर रिटर्न भरण्यासाठी बँक खात्याचा तपशील, पॅन कार्ड, फॉर्म 16, आधार कार्ड, गुंतवणूक प्रमाणपत्र, विमा प्रिमियमच्या पावत्या, कर्ज घेतलं असेल तर त्याचे डिटेल्स अशी विविध कागदपत्रेही सादर करावी, असं आवाहन विभागानं केलं आहे.

31 जुलै अंतिम तारीख

प्राप्तिकर विभागानं यापूर्वीही ट्विटद्वारे 1 कोटी आयटीआर फाइल्सची माहिती दिली होती. प्राप्तिकर विभागानं सांगितलं होतं, की 26 जून 2023पर्यंत एक कोटी करदात्यांनी आयकर रिटर्न भरला आहे. शेवटच्या मूल्यांकन वर्ष 2022-23मध्ये, 8 जुलै 2023पर्यंत एक कोटी करदात्यांनी आयकर रिटर्न भरला होता. मूल्यांकन वर्ष 2023-24साठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 आहे. फॉर्म-1द्वारे आयकर भरणाऱ्या बहुतांश करदात्यांच्यासाठी ही शेवटची तारीख अत्यंत महत्त्वाची आहे.