Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

FD interest : मुदत ठेवींवरच्या व्याजदरात 'या' बँकेनं केली वाढ, ग्राहकांना कमाईची चांगली संधी

FD interest : मुदत ठेवींवरच्या व्याजदरात 'या' बँकेनं केली वाढ, ग्राहकांना कमाईची चांगली संधी

FD interest : मुदत ठेवींच्या माध्यमातून कमाई करण्याची चांगली संधी ग्राहकांना उपलब्ध झालीय. मुदत ठेवीत रक्कम ठेवत असताना सर्वप्रथम व्याजाचा दर पाहिला जातो. आता अधिकच्या व्याजदरासोबत एफडी उपलब्ध झालीय. त्यामुळे ग्राहकांचा कल निश्चितच या मुदत ठेवीत पैसे गुंतवण्यासाठी वाढणार आहे.

मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक (Investment in FD) करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या गरजेची आहे. बाजारात सध्या विविध सरकारी, खासगी संस्था त्याचप्रमाणे बँकांकडून मुदत ठेव ऑफर केली जाते. प्रत्येकाचा व्याजाचा दर वेगवेगळा असतो. ग्राहक आपल्या गरजेनुसार या विविध एफडींमधून आपल्या फायद्याच्या एफडीची निवड करतो. व्याजाचा दर जास्त (High interest rate) असेल अशा एफडींना विशेषकरून ग्राहक प्राधान्य देत असल्याचं आतापर्यंत दिसून आलंय. मात्र सरकारी असो किंवा खासगी, या सर्वच संस्था आपल्या मुदत ठेवींवर सरासरी 7 ते साडे सात टक्क्यांपर्यंत व्याज देत असल्याचं दिसून आलंय. मात्र आता आम्ही तुम्हाला 8 टक्क्यांच्या एफडीबद्दल सांगणार आहोत. किती कालावधीसाठी किती व्याजाचा दर असेल, यातले नियम काय या सर्वांची माहिती पाहू...

अधिकृत संकेतस्थळावर दिली माहिती

विविध बँकांनी अलिकडेच आपल्या मुदत ठेवींवरच्या व्याजदरात वाढ केलीय. त्यामुळे ग्राहकांनादेखील कमाईची थोडी संधी निर्माण झालीय. याच मालिकेत एक नाव जोडलं गेलंय, ते डीसीबी बँकेचं (DCB Bank). तब्बल 2 कोटींहून अधिक मुदत ठेवींवरच्या व्याजदरात त्यांनी वाढ केलीय. आपल्या अधिकृत संकेतस्थळावर बँकेनं यासंदर्भातली माहिती दिलीय. या मुदत ठेवीमध्ये नियमित, एनआरई (NRE) आणि एनआरओ (NRO) बचत बँक खात्यांचा समावेश असणार आहे. आपल्या ग्राहकांना ठेवींवर बँक जवळपास 8 टक्क्यांपर्यंत परतावा देतेय. नुकतंच म्हणजेच 8 मे 2023पासून बँकेनं व्याजाचे हे नवे दर लागू केले आहेत.

कालावधी किती?

डीसीबी बँक (DCB) आपल्या ग्राहकांना विविध रकमेवर व्याजाचा दर भिन्न देते. 1 लाखांपेक्षा कमी ठेवींवर 2 टक्के इतका परतावा दिला जातो. त्याचवेळी 1 लाख आणि 2 लाख किंवा त्यापेक्षा कमी ठेवींवर 3.75 टक्के परतावा देण्यात येत आहे. बँक आपल्या ग्राहकांना दोन वर्षांच्या मुदत ठेवींवरदेखील उत्कृष्ट असा परतावा देत आहे. 700 दिवस किंवा साधारणपणे 24 महिन्यांच्या एफडीवर बँक आपल्या ग्राहकांना श्रीमंत होण्याचीच संधी देत असल्याचं दिसतं. तब्बल 8 टक्क्यांपर्यंत घसघशीत असा बंपर रिटर्न गॅरंटी बँकेकडून दिसी जातेय. नियमित ग्राहकांना 8 टक्के व्याजाचा लाभ घेता येईल. तर त्याचवेळी बँक ज्येष्ठ नागरिकांना आपल्या मुदत ठेवींवर 8.5 टक्के इतका व्याजाचा दर देत आहे.

किती रक्कम आणि व्याज दर?

  • 1 लाखांपर्यंत - 2 टक्के
  • 1 लाख 2 लाख - 3.75 टक्के
  • 2 लाख 5 लाख - 5.25 टक्के
  • 5 लाख 10 लाख - 6.25 टक्के
  • 10 लाख 50 लाख - 7 टक्के
  • 50 लाख 2 कोटी - 7.25 टक्के
  • 2 कोटी 5 कोटी - 5.50 टक्के
  • 5 कोटी 10 कोटी - 7 टक्के
  • 10 कोटी 50 कोटी - 8 टक्के
  • 50 कोटी 200 कोटी - 8 टक्के
  • 200 कोटी आणि त्याहून अधिक - 5 टक्के

इतर बँकांनीही वाढवलेत व्याज दर

डीसीबी बँकेसह इतर काही बँकांनीही आपल्या मुदत ठेवींवरच्या व्याजदरात वाढ केलीय. यात बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी बँक, आयडीएफसी बँक आणि इंडसइंड बँक यांचादेखील समावेश आहे. या बँकांच्या ग्राहकांना आता मोठी कमाई करण्याची संधी दिली जात आहे.