Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

World Bank Forecast: 2023 मध्ये बसेल विकसनशील देशांना आर्थिक मंदीचा फटका!

World Bank

Image Source : www.brecorder.com

World Bank Forecast: जागतिक बँकेकडून ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट्स अहवाल(Global Economic Prospects report) जाहीर करण्यात आला. त्यानुसार 2023 मध्ये विकसनशील देशांना मंदीचा फटका बसण्याचा अंदाजही यावेळी वर्तण्यात आला आहे.

World Bank Forecast: जागतिक बँकेने 2023 मध्ये जागतिक अर्थव्यवस्था फक्त 1.7 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मंगळवारी दिलेल्या एका अहवालातून 2023 मध्ये विकसनशील देशांना मंदीचा फटका बसण्याचा अंदाजही यावेळी वर्तण्यात आला आहे. जागतिक बँकेने म्हटले आहे की तीक्ष्ण, दीर्घकाळ चालू मंदीचा विकसनशील देशांना मोठा फटका बसण्याची मोठी शक्यता आहे. याबद्दल जाणून घेऊयात.

एकाच दशकात दोन वेळा जागतिक मंदी(Two global recessions in the same decade)

सोमवारी(दि.10 जानेवारी) जागतिक बँकेकडून ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट्स अहवाल(Global Economic Prospects report) जाहीर करण्यात आला. गेल्या सहा महिन्यांपूर्वी जे अंदाज वर्तवले होते त्यापेक्षा हे प्रमाण निम्मे असल्याने विकसनशील देशांवरी मंदीचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता बँकेने वर्तवली आहे. या अहवालानुसार, चीन(China) वगळता नव्याने उदयाला येणाऱ्या बाजारपेठा आणि विकसनशील अर्थव्यवस्थांमधील वाढ 2022 मध्ये 3.8 टक्क्यांवरून 2023 मध्ये 1.7 टक्क्यांपर्यंत घसरण्याची शक्यता वर्तवली आहे. या अहवालामध्ये भारदस्त चलनवाढ, उच्च व्याजदर, कमी झालेली गुंतवणूक आणि रशियाने युक्रेनवर केलेले आक्रमण यांसारख्या निर्माण झालेल्या व्यत्ययांमुळे जागतिक आर्थिक वाढ झपाट्याने कमी होत असल्याचे बँकेचे म्हणणे आहे. एकाच दशकात दोन वेळा जागतिक मंदी आल्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बँकेने म्हटले आहे.

यामागील कारण काय?(What is the reason behind this?)

जागतिक स्तरावर या परिस्थितीचा विचार करता, कोणताही नवीन प्रतिकूल विकास, अपेक्षेपेक्षा जास्त महागाई, व्याजदरात अचानक झालेली वाढ, कोविड-19 या सारख्या रोगाचे परत येणे किंवा वाढणारा भू-राजकीय तणाव हे जागतिक अर्थव्यवस्थेला मंदीच्या दिशेने पुढे ढकलत असल्याचे मत जागतिक बँकेने आपल्या ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट्स अहवालात(Global Economic Prospects report) नमूद केले आहे. या अहवालातील माहितीनुसार, जागतिक अर्थव्यवस्था 2023 मध्ये 1.7 टक्के आणि 2024 मध्ये 2.7 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. जागतिक बँक समुहाचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी सांगितले आहे की, विकासासमोरील संकट तीव्र होत आहे आणि ते उदयास येत आहे. जगभरातील विकसनशील देशांवरील कर्जाचा बोजा वाढत असून या देशांमधील गुंतवणुक कमकुवत होत चालली आहे.