गुंतवणूकदार (Investor) नेहमीच चांगला परतावा देणाऱ्या म्युच्युअल फंडाच्या (Mutual Funds) शोधात असतो. मल्टी कॅप म्युच्युअल फंडातून चांगला परतावा हवा असणाऱ्या योजनांच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला 7 योजना सांगत आहोत. मागच्या तीन वर्षांत या योजनांनी जवळपास 26 टक्क्यांहून अधिकचा परतावा (Return) दिलाय. तर या योजनांच्या नियमित योजनांच्या मागच्या तीन वर्षातल्या कामगिरीवर नजर टाकल्यास जवळपास 24 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिलाय. ही सर्व कामगिरी मागच्या तीन वर्षांतली आहे. यावरून भविष्यात अशाप्रकारचा परतावा मिळेलच याची खात्री नाही. त्यामुळे गुंतवणूक करताना कधीही आर्थिक सल्लागाराची मदत घेणं फायद्याचं ठरू शकतं. अशा योजनांमध्ये एसआयपी (Systematic investment plan) सुरू करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
मागच्या तीन वर्षांत 26 टक्क्यांहून अधिक परतावा देणाऱ्या टॉप 7 मल्टी कॅप फंडांची यादी आणि त्यांची एकूण कामगिरी याविषयी थोडक्यात माहिती देत आहोत. ही माहिती एएमएफआय (Association of Mutual Funds of India) या संकेतस्थळावर (19 एप्रिल) उपलब्ध आहे. सर्वात जास्त ते कमी परतावा अशा क्रमानं ही यादी आम्ही आपल्याला देत आहोत.
Table of contents [Show]
क्वांट अॅक्टिव्ह फंड
क्वांट अॅक्टिव्ह फंडात (Quant Active Fund) असलेल्या डायरेक्ट प्लॅनच्या माध्यमातून 41.23 टक्के परतावा देण्यात आलाय. याच्या रेग्युलर प्लॅननं मागच्या तीन वर्षांत 39.02 टक्के परतावा दिलाय. ही स्कीम निफ्टी 500 मल्टीकॅप 50:25:25 टोटल रिटर्न इंडेक्स ट्रॅक करते.
निप्पॉन इंडिया मल्टी कॅप फंड
निप्पॉन इंडिया मल्टी कॅप फंडाच्या (Nippon India Multi Cap Fund) थेट योजनेच्या माध्यमातून 33.61 टक्के परतावा देण्यात आलाय. तर नियमित योजनेनं तीन वर्षांत 32.69 टक्के परतावा दिलाय. ही स्कीम निफ्टी 500 मल्टीकॅप 50:25:25 टोटल रिटर्न इंडेक्स ट्रॅक करते.
महिंद्रा मॅन्युलाइफ मल्टी कॅप फंड
महिंद्रा मॅन्युलाइफ मल्टी कॅप फंडाच्या (Mahindra Manulife Multi Cap Fund) थेट योजनेच्या माध्यमातून 30.38 परतावा देण्यात आला. तर नियमित योजनेद्वारे तीन वर्षांत 28.07 टक्के परतावा दिलाय. ही स्कीम निफ्टी 500 मल्टीकॅप 50:25:25 टोटल रिटर्न इंडेक्स ट्रॅक करते.
बडोदा बीएनपी परिबा मल्टी कॅप फंड
बडोदा बीएनपी परिबा मल्टी कॅप फंडाच्या (Baroda BNP Paribas Multi Cap Fund) थेट योजनेच्या माध्यमातून जवळपास 27.38 परतावा देण्यात आलाय. तर नियमित योजनेद्वारे तीन वर्षांत 26.05 टक्के परतावा दिलाय. ही स्कीम निफ्टी 500 मल्टीकॅप 50:25:25 टोटल रिटर्न इंडेक्स ट्रॅक करते.
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मल्टीकॅप फंड
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मल्टीकॅप फंडाच्या (ICICI Prudential Multicap Fund) थेट योजनेच्या माध्यमातून 26.74 टक्के परतावा देण्यात आलाय तर नियमित योजनेने तीन वर्षांत 25.57 टक्के परतावा दिलाय. योजना निफ्टी 500 मल्टीकॅप 50:25:25 टोटल रिटर्न इंडेक्स ट्रॅक करते.
इन्वेस्को इंडिया मल्टीकॅप फंड
इन्वेस्को इंडिया मल्टीकॅप फंडाच्या (Invesco India Multicap Fund) थेट योजनेच्या माध्यमातून 26.07 टक्के परतावा देण्यात आलाय. तर रेग्युलर प्लाननं तीन वर्षात 24.38 टक्के परतावा दिलाय. ही स्कीम निफ्टी 500 मल्टीकॅप 50:25:25 टोटल रिटर्न इंडेक्स ट्रॅक करते.
सुंदरम मल्टी कॅप फंड
सुंदरम मल्टी कॅप फंड (Sundaram Multi Cap Fund) ही देखील एक चांगला परतावा देणारी स्कीम आहे. याच्या थेट योजनेनं 26.78 टक्के परतावा दिलाय. तर नियमित योजनेनं तीन वर्षांत 25.24 टक्के परतावा दिलाय. ही स्कीम निफ्टी 500 मल्टीकॅप 50:25:25 टोटल रिटर्न इंडेक्स ट्रॅक करते.
(टीप : ही माहिती 19 एप्रिल 2023पर्यंतच्या एएमएफआयच्या संकेतस्थळावरच्या डेटावर आधारित असून माहितीच्या उद्देशानं देण्यात आलीय. म्युच्युअल फंडातली गुंतवणूक जोखमीच्या अधीन आहे. ‘महामनी’ अशा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यापूर्वी त्यांच्या आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)