Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Money Management Tips: पगारातील किती पैसे सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवावेत? 'हा' नियम तुम्हाला बनवेल श्रीमंत

Money Management Tips

Money Management Tips : दरमहा मिळणाऱ्या पगारातून किती रक्कम बचत खात्यात (Savings Account Balance) जमा करावी? पैशांचे योग्य नियोजन करण्यासाठी आणि आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी फायनान्स तज्ज्ञांचा ५०-३०-२० नियम (50 30 20 Rule) नक्की समजून घ्या.

दीर्घकालीन आर्थिक सुरक्षितता आणि स्थैर्य मिळवण्यासाठी वैयक्तिक पैशांचे योग्य व्यवस्थापन करणे ही अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. अनेकदा लोकांच्या मनात एकच प्रश्न असतो की, आपल्या बचत खात्यात नेमके किती पैसे ठेवावेत? खर्च आणि बचत यामध्ये योग्य तो समतोल राखल्यास दैनंदिन गरजा तर पूर्ण होतातच, सोबतीने भविष्यातील आर्थिक उद्दिष्टे गाठणेही सोपे होते. यासाठी आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञ एक सोपा आणि प्रभावी नियम वापरण्याचा सल्ला देतात.

काय आहे बजेटचा ५०/३०/२० नियम?

हा नियम म्हणजे तुमचे मासिक उत्पन्न तीन मुख्य भागांमध्ये विभागण्याची एक सोपी रणनीती आहे. यामुळे पैशांचा अपव्यय टाळता येतो आणि आर्थिक शिस्त लागते. हा नियम खालीलप्रमाणे काम करतो:

५० टक्के रक्कम दैनंदिन गरजांसाठी: तुमच्या एकूण पगारातील अर्धी रक्कम म्हणजेच ५० टक्के भाग हा रोजच्या जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींवर खर्च झाला पाहिजे. यामध्ये घराचे भाडे किंवा होम लोनचा हप्ता, लाईट बिल, किराणा सामान, प्रवासाचा खर्च आणि विम्याचे प्रीमियम यांसारख्या टाळता न येणाऱ्या खर्चांचा समावेश होतो.

३० टक्के रक्कम आवडीनिवडींसाठी: हा भाग तुमच्या जीवनशैलीशी संबंधित खर्चासाठी आहे. जसे की बाहेर हॉटेलमध्ये जेवायला जाणे, मनोरंजनाचे सबस्क्रिप्शन घेणे, शॉपिंग करणे, फिरणे किंवा तुमचे छंद जोपासणे.

२० टक्के रक्कम बचत आणि गुंतवणुकीसाठी: तुमच्या पगारातील उरलेला २० टक्के हिस्सा हा भविष्यासाठी सुरक्षित ठेवला पाहिजे. या पैशांचा वापर आणीबाणीच्या काळासाठी फंड तयार करणे किंवा निवृत्तीनंतरच्या काळासाठी गुंतवणूक करण्यासाठी केला पाहिजे.

उदाहरणाने समजून घ्या गणिते

जर तुमचा महिन्याचा पगार सर्व टॅक्स वजा करून 30,000 रुपये असेल, तर या नियमानुसार दरमहा किमान 6,000 रुपये तुमच्या बचत खात्यात जमा झाले पाहिजेत. सातत्याने अशी बचत केल्यास घर खरेदीसाठी डाऊन पेमेंट किंवा इतर मोठ्या खर्चाची सोय करणे सोपे जाते.

तज्ज्ञांच्या मते, तुमच्या बचत खात्यात नेहमी किमान १ महिन्याच्या खर्चा इतकी रोख रक्कम अगदी सहज उपलब्ध असावी, जेणेकरून अचानक उद्भवणाऱ्या खर्चासाठी तुम्हाला तुमच्या दीर्घकालीन गुंतवणुकीला हात लावावा लागणार नाही.

पैसे वाचवण्यासाठी ३ सोप्या टिप्स

निश्चित ध्येय ठेवा: केवळ पैसे वाचवण्यापेक्षा ते कशासाठी वाचवत आहात हे स्पष्ट असावे. मग ते फिरायला जाण्यासाठी असो वा आपत्कालीन निधीसाठी, ध्येय समोर असल्यास बचत करणे सोपे होते.

बचत ऑटोमॅटिक करा: पगार होताच त्यातील ठराविक रक्कम मुख्य खात्यातून बचत खात्यात किंवा आरडीमध्ये आपोआप ट्रान्सफर होईल अशी सोय करा. यामुळे पैसे खर्च होण्याची भीती राहत नाही.

नियमति आढावा घ्या: दर काही महिन्यांनी तुमच्या बजेटची आणि बँकेकडून मिळणाऱ्या व्याजाची पाहणी करा. जास्त व्याज देणारे सेव्हिंग अकाउंट निवडल्यास तुमचे पैसे अधिक वेगाने वाढू शकतात.