कमॉडिटी बाजारात आज गुरुवारी 5 जानेवारी रोजी सोन्याच्या किंमतीत वाढ झाली. सलग चौथ्या दिवशी सोन्याचा भाव वाढला आहे. आज सकाळच्या सत्रात मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 55820 रुपये इतका वाढला. त्यात 53 रुपयांची वाढ झाली. सोने तेजीने झळाळून निघाले असले तरी चांदीला मात्र आज नफावसुलीचा फटका बसला. चांदीच्या दरात आज 204 रुपयांची घसरण झाली. (Gold Price Rise while Silver Down in MCX Today)
मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सकाळच्या सत्रात सोन्याचा भाव 55820 रुपये इतका वाढला होता. त्यात बुधवारच्या तुलनेत 53 रुपयांची वाढ झाली. एमसीएक्सवर एक किलो चांदीचा भाव 69114 रुपये इतका असून त्यात 204 रुपयांची घसरण झाली आहे.
जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव वाढला आहे. डॉलरचे मूल्य इतर चलनांच्या तुलनेत कमी झाल्याने सोन्याच्या किंमतींना सपोर्ट मिळाल्याचे कमॉडिटी विश्लेषकांचे म्हणणे आहे. आज वर्ल्ड मार्केटमध्ये सोन्याचा भाव प्रति औंस 1856.11 डॉलर इतका होता. बुधवारी सोन्याचा भाव सात महिन्यांच्या उच्चांकावर गेला होता. यूएस गोल्ड फ्युचर्सचा भाव 1861.20 डॉलर इतका वाढला आहे. डॉलर इंडेक्स 0.1% घसरला.
वर्ष 2023 सोन्याच्या दृष्टीने सकारात्मक राहण्याचा अंदाज अॅक्सिस सिक्युरिटीजचे कमॉडिटी विश्लेषक देवया गगलानी यांनी व्यक्त केला. कॉमेक्स गोल्ड सात महिन्यांच्या उच्चांकावर आहे. जागतिक बाजारातील घडामोडी, कोरोनाचा वाढता प्रभाव आणि महागाई पाहता सोने चालू वर्षात 2000 डॉलरचा स्तर गाठेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
Goodreturns.com या वेबसाईटनुसार आज गुरुवारी मुंबईत 22 कॅरेटचा भाव 51300 रुपये इतका आहे. त्यात 200 रुपयांची वाढ झाली. मुंबईत 24 कॅरेटचा भाव 55960 रुपये इतका आहे. त्यात 210 रुपयांची वाढ झाली. दिल्लीमध्ये 22 कॅरेटचा भाव 51450 रुपये आणि 24 कॅरेटचा भाव 56110 रुपये इतका आहे. त्यात 210 रुपयांची वाढ झाली. कोलकात्यामध्ये 22 कॅरेटचा भाव 51300 रुपये आणि 24 कॅरेटचा भाव 55960 रुपये इतका आहे. चेन्नईमध्ये 22 कॅरेटचा भाव 52280 रुपये आणि 24 कॅरेटचा भाव 57030 रुपये इतका आहे.