PM Kisan FPO Scheme : FPO या योजनेअंतर्गत नवीन कृषी व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना 15 लाख रुपये देऊन मदत करणार आहे. भारतातील कृषी व्यवस्था आजही शेतीवर आवलंबुन आहे. ग्रामीण भागात आजही अनेक लोक शेतीवरच उपजीविका करतात. यामध्ये लहान भूधारक शेतकऱ्यांचा समावेश आहे. आणि त्यातही जवळपास 75 टक्के पेक्षा जास्त शेती ही निसर्गावरच अवलंबुन आहे. हे पाहता, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी, सरकार विविध प्रयत्न करीत आहे. आणि पीएम किसान योजनेअंतर्गत नवीन शेती व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देशभऱ्यातील शेतकऱ्यांना 15 लाख रुपयांची आर्थिक मदत करत आहे.
Table of contents [Show]
11 शेतकऱ्यांना मिळून एक संस्था
पीएम किसान एफपीओ योजनेच्या लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. पीएम किसान एफपीओ योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवणे, तसेच दुष्काळ काळात त्यांना आर्थिक संकटातून दिलासा देणे हा आहे. या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी, लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या 11 शेतकऱ्यांना मिळून एक संस्था किंवा कंपनी स्थापन करावी लागेल.
10 हजार एफपीओ तयार करण्याचे ध्येय
आजही अनेक शेतकरी असे आहेत, ज्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन केवळ शेती आहे. मात्र निसर्गावर शेती अवलंबुन असल्यास शेतकऱ्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे एक पुरक व्यवसाय शेतकऱ्याला मिळावा, यासाठी सरकारने ही योजना आणली आहे. पीएम किसान एफपीओ योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांनाच शेतीशी संबंधित उपकरणे, औषधे, खते, बियाणे आदी वस्तु खरेदी करण्यास मदत केली जाते. माहितीनुसार, 2023-24 पर्यंत 10 हजार एफपीओ तयार करण्याचे ध्येय सरकारचे आहे.
यासाठी आवश्यक कागदपत्रे
प्रधानमंत्री किसान उत्पदान संस्था योजना (PM FPO Scheme) साठी अर्ज करण्यासाठी,सर्वप्रथम राष्ट्रीय कृषी बाजाराच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. म्हणजे ई-नाम www.enam.gov.in. मुख्यपृष्ठावरील FPO पर्यायावर क्लिक करा. यानंतर नोंदणी किंवा लॉगिनचा पर्याय येईल.सर्व प्रथम नोंदणीचा पर्याय निवडा. आता होम स्क्रीनवर एक अर्ज उघडेल. त्यात मागितलेली सर्व माहिती भरा. अर्जासोबत मागवलेल्या सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स कॉपी संलग्न करा आणि फॉर्म सबमिट करा. शेतकऱ्याची इच्छा असेल, तर तो या कामात ई-मित्र केंद्र किंवा लोकसेवा केंद्राचीही मदत घेऊ शकतो.
ऑनलाईन अर्ज कसा करायचा (PM Kisan FPO Scheme Apply Online)
- पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी सर्व प्रथम अधिकृत साइटला भेट द्या.
- नोंदणी करण्यासाठी, वरच्या कोपऱ्यातील "नोंदणी" लिंकवर क्लिक करा.
- यानंतर, खाली दर्शविल्याप्रमाणे नोंदणी फॉर्म तुमच्या समोर उघडेल.
- नोंदणी प्रकार विभागातील फॉर्ममध्ये "विक्रेता" पर्याय निवडा.
- आणि नंतर नोंदणी श्रेणी अंतर्गत तुम्ही FPOनिवडू शकता.
- आता फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती भरा जसे तुमचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर इ.
- फॉर्म भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- शेवटी सर्व माहिती तपासल्यानंतर नोंदणी पूर्ण करण्यासाठी "सबमिट" बटणावर क्लिक करा.
- या लॉगिननंतर तुम्हाला एसएमएस किंवा ईमेलद्वारे माहिती पाठवली जाईल.
- त्यानंतर तुम्ही पोर्टलवर लॉग इन करून सुविधांचा लाभ घेऊ शकता.