भारतीय रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India-RBI) 2004 पासून भारतातील सर्व आर्थिक सेवा देणाऱ्या संस्थांना त्यांच्याशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या सर्व प्रकारच्या ग्राहकांची ओळख आणि पत्त्याची पडताळणी करणं बंधनकारक केलं आहे. यासाठी आरबीआयने पडताळणीची एक सामाईक केवायसी प्रक्रिया (Common Procedure for KYC) सुरू केली.
Table of contents [Show]
केवायसी म्हणजे काय? What is KYC?
KYC या शब्दाचा फुलफॉर्म Know your Customer असा होतो. याचा मराठीत अर्थ सांगायचा झाले तर 'तुमच्या ग्राहकाला जाणून घ्या', असा होतो. केवायसी प्रक्रिया ही एखाद्या आर्थिक सेवा देणाऱ्या संस्थेकडून आपल्या ग्राहकाची पडताळणी करण्याचा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. यासाठी ग्राहकाला वेगवेगळ्या प्रोडक्टसमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्याची ओळख निश्चित होईल अशी सर्व कागदपत्रे सादर करणं आवश्यक आहे. ओळख निश्चित करण्यासाठी जी कागदपत्रे किंवा माहिती लागते, त्याला केवायसी म्हटलं जातं. आरबीआयने देशातील सर्व फायनान्शिअल संस्थाना (Financial Institute) ग्राहकांना कोणतीही आर्थिक व्यवहार करण्याची सेवा देण्यापूर्वी KYC प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक केले. ही प्रक्रिया ऑनलाईन किंवा ऑफलाईन (Online or Offline KYC) अशी दोन्हीप्रकारे पूर्ण करता येते.
केवायसीचे महत्त्व! (Importance of KYC!)
केवायसी (KYC) हे एक असं महत्त्वाचं साधन आहे; जे आर्थिक संस्थांवर आणि त्यांच्या व्यवहारांवर लक्ष व नियंत्रण ठेवते. कारण वैयक्तिक ग्राहकांव्यतिरिक्त अनेक संस्था, ट्रस्ट किंवा इतर इन्स्टिट्यूट शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडसारख्या आर्थिक सेवांचा वापर करत असतात. अशावेळी त्यांच्या व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी या प्रक्रियाचा वापर होतो. बॅंकासुद्धा केवायसीच्या मदतीने वैयक्तिक ग्राहक किंवा एखाद्या संस्थेची स्थिती तपासू शकते. या प्रक्रियेमळे बॅंकेच्या ग्राहकांचे पत्ते व्हेरिफाय करणे आणि ते ज्यांच्याद्वारे वापरले जात आहेत. त्यांची पडताळणी करणे सोपे जाते.
याव्यतिरिक्त, केवायसी प्रक्रियेद्वारे ग्राहकाच्या रोजगाराचे किंवा व्यवसायाचे स्वरूप कळण्यास मदत होते. ज्यामुळे संबंधित व्यक्ती किंवा त्या व्यक्तीच्या कंपनीची पडताळणी करण्यास मदत होते.
केवायसीचे प्रकार (Types of KYC)
केवायसी प्रक्रियेचे दोन प्रकार आहेत. दोन्ही प्रकार योग्य व अधिकृत आहेत. यापैकी केवायसीसाठी कोणता प्रकार निवडायचा हे ग्राहकाने ठरवणे योग्य ठरू शकते. कारण यापैकी कोणता प्रकार सोयीचा आहे; हे पूर्णत: ग्राहकाच्या आवडीनिवडीवर अवलंबून असते. याचे दोन प्रकार खालीलप्रमाणे आहेत.
आधार आधारित केवायसी (Aadhar Based KYC)
आधार कार्डवर आधारित केवायसी प्रक्रिया ऑनलाइन (Online KYC Procedure) केली जाते. जी ब्रॉडबॅण्ड किंवा इंटरनेट कनेक्शन असणाऱ्यांसाठी खूपच सोयीस्कर ठरू शकते. यासाठी ग्राहकाला त्यांच्या मूळ आधार कार्डची कॉपी अपलोड करणे आवश्यक आहे. जर ग्राहकाला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची असेल तर आधार आधारित KYC करता येते. फक्त ही सेवा वर्षाला 50 हजारापर्यंतची गुंतवणूक असेल तरच वापरता येते.
व्यक्तीगत आधारित KYC (In Person based KYC)
एखाद्या ग्राहकाला प्रत्येकवर्षी म्युच्युअल फंडमध्ये अधिक गुंतवणूक करायची असेल, तर त्याला वैयक्तिक KYC करणे आवश्यक आहे; जी ऑफलाईन केली जाते. व्यक्तीगत केवायसी करण्यासाठी संबंधित ग्राहकाला KYC सेंटरला भेट देणं गरजेचं आहे. त्या सेंटरमध्ये आधार बायोमेट्रिक्सचा वापर करून किंवा केवायसी रजिस्ट्रेशन करणाऱ्या संस्थेशी संपर्क साधून करता येऊ शकते.
केवायसी पार पाडण्याचे महत्त्व (Importance of KYC)
ग्राहकाला कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार करायचे असतील तर केवायसी करणं आवश्यक (For Financial Transaction KYC is mandatory) आहे. केवायसी प्रक्रियेद्वारे ग्राहक संबंधित फायनान्शिअल इन्स्टिट्यूटला (Financial Institute) स्वत:ची ओळख, पत्ता आणि आर्थिक व्यवहारांची माहिती देत असतो. या प्रक्रियेद्वारे बँके ग्राहकाने गुंतवणूक करण्यासाठी निवडलेला पैसा कोणत्या हेतूसाठी वापरला जात आहे, याची माहिती कळते.