• 08 Jun, 2023 00:20

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Aadhar Card Scam: तुमच्या आधारकार्डवर किती सिमकार्ड इश्यू आहेत माहितीये तुम्हाला? इथे चेक करा!

How many SIM cards are issued on your Aadhaar card?

Aadhar Card Scam: केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने नागरिकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी व त्यांना अवगत करण्यासाठी TAFCOP पोर्टल लॉन्च केले आहे. या पोर्टलवर सर्वसामान्य नागरिक आधारकार्डवर इश्यू करण्यात आलेल्या सिमकार्डची माहिती मिळवू शकतात. तसेच तुमच्या आधारकार्डवर किती आणि कोणते मोबाईल नंबर इश्यू झाले आहेत हे तपासू शकतात.

Aadhar Card Scam: सध्या आधारकार्ड आणि पॅनकार्ड हे अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा बॅंकेत काही काम असेल, केवायसी करायचे असेल किंवा नवीन सिमकार्ड घ्यायचे असेल तर आधारकार्ड हा महत्त्वाचा पुरावा आहे. अशावेळी आपण सर्रासपणे सर्व ठिकाणी आधारकार्डची झेरॉक्स देतो. पण त्याचा योग्य वापर होतो की नाही, हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे. सरकारने याचा ट्रॅक ठेवण्यासाठी एक वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे. त्याद्वारे आपण एका व्यक्तीच्या आधारकार्डवर किती मोबाईल नंबर रजिस्टर्ड आहेत; हे चेक करू शकतो.

आधारकार्ड अपडेट करण्याच्या नावाने किंवा आधारकार्ड आणि पॅनकार्ड लिंक करण्याच्या बहाण्याने अनेकांची आर्थिक फसवणूक होत असल्याचे आपण पाहत आहोत. या अशा स्कॅमबरोबरच, आपण पुरावा म्हणून आधारकार्डची झेरॉक्स अनेक ठिकाणी सबमिट करत असतो. त्याचाही दुरूपयोग होऊ शकतो. याबाबत आपण सावध आणि जागरूक असणे गरजेचे आहे. कारण आधारकार्डच्या आधारे नवीन सिमकार्ड घेता येते. सध्या अशाप्रकारे इतरांचे आधाराकार्ड सबमिट करून बोगस सिमकार्ड घेण्याचे प्रमाण वाढले आहे. यातून लोकांची आर्थिक फसवणूक तर होऊ शकतेच. पण त्याचबरोबर बोगस सिमकार्डच्या मदतीने समाज विघातक गोष्टीही होऊ शकतात. यासाठी सरकारने एका चेक पोर्टलची निर्मिती केली आहे. या पोर्टलच्या मदतीने नागरिक आपल्या आधारकार्डवर किती सिमकार्ड इश्यू झालेत हे तपासू शकतात आणि ते जर बोगस सिमकार्ड असतील तर त्याबाबत ते लगेच तक्रारही नोंदवू शकता.

TAFCOP Consumer पोर्टल काय आहे?

केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने नागरिकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी व त्यांना लोकांना अवगत करण्यासाठी TAFCOP पोर्टल लॉन्च केले आहे. या पोर्टलवर सर्वसामान्य नागरिक आधारकार्डवर इश्यू करण्यात आलेल्या सिमकार्डची माहिती मिळवू शकतात. तसेच तुमच्या आधारकार्डवर किती आणि कोणते मोबाईल नंबर इश्यू झाले आहेत हे तपासू शकतात.

तुमच्या आधारकार्डवर किती सिमकार्ड इश्यू आहेत?

  • सर्वप्रथम www.sancharsaathi.gov.in ही वेबसाईट ओपन करा
  • होमपेजवर सिटीझन सेंट्रिक सर्व्हिसेसमधून Know your Mobile Connections यावर क्लिक करा.
  • इथे तुमचा मोबाईल क्रमांक टाका. त्यानंतर कॅप्चा टाका. कॅप्चा टाकल्यानंतर ओटीपीद्वारे व्हेरिफाय करा.
  • ओटीपी व्हेरिफाय झाल्यानंतर लॉगिन करा. स्क्रिनवर तुमच्या आधारकार्डवर इश्यू करण्यात आलेले मोबाईल क्रमांक दिसतात.
  • स्क्रिनवर दिसणारे मोबाईल नंबर तुम्ही व्हेरिफाय करून त्याबाबत तक्रार दाखल करू शकता.

TAFCOP साईटच्या अजून काय फायदा आहे?

ट्रायने घालून दिलेल्या नियमानुसार, एक व्यक्ती जास्तीत जास्त त्याच्या नावावर 9 मोबाईल क्रमांक घेऊ शकते. TAFCOP या पोर्टलच्या माध्यमातून मिळणाऱ्या सुविधा पुढीलप्रमाणे आहे.

  • जर तुमच्या नावावर 9 पेक्षा जास्त मोबाईल क्रमांक असतील, तर ते तुम्हाला इथे दिसू शकतात.
  • एका व्यक्तीच्या नावावर 9 पेक्षा जास्त मोबाईल नंबर असतील तर ती व्यक्ती www.tafcop.dgtelecom.gov या वेबसाईटवर तक्रार दाखल करू शकतात.
  • तसेच नको असलेले मोबाईल नंबर तुम्ही इथे बंद करू शकता. ते सिमकार्ड बंद करण्यापूर्वी त्या क्रमांकाबाबतची माहिती एसएमएसद्वारे पुरवली जाते. त्याद्वारे तुम्ही त्या क्रमांकाबाबत निर्णय घेऊ शकता.
  • बऱ्याचवेळा आपण एकाचवेळी अनेक सिमकार्ड घेतो आणि पण ते बंद करताना त्याची प्रक्रिया पूर्ण करत नाही. अशा नंबरसुद्धा या वेबसाईटवरून तुम्ही बंद करू शकता.