व्यावसायिक संभाषणासाठी (Commercial communication) एसएमएस टेम्पलेटचा वापर केला जातो. मात्र ग्राहकांना स्पॅम (Spam) करण्यासाठी यात बदल करून त्याचा गैरवापर होत असल्याचं निदर्शनास आलंय. त्यामुळे टेलिकॉम कंपन्यांना ट्रायनं (Telecom Regulatory Authority of India) पुढचे 45 दिवस यावर काम करण्यास आणि याचा गैरवापर थांबवण्यास सांगितलंय.
Table of contents [Show]
रजिस्ट्रेशन करणं गरजेचं
टेलिकॉम कंपन्यांकडे नेटवर्क आहे. तर प्रचारात्मक संदेश (Promotional messages) हे डिस्ट्रिब्युटेड लेजर टेक्नॉलॉजी (DLT) प्लॅटफॉर्मवर नोंदणीकृत टेलीमार्केटरद्वारे पाठवले जात असतात. डीएलटी प्लॅटफॉर्म टेलिकॉम ऑपरेटरद्वारे मॅनेज केले जातात. बल्क प्रमोशनल किंवा ट्रान्झॅक्शनल एसएमएससाठी व्यवसायाविषयी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं असतं. यात दूरसंचार ऑपरेटरद्वारे व्यवस्थापित केलेल्या DLT प्लॅटफॉर्मसाठी, मोठ्या प्रमाणात प्रचारात्मक (Promotional) किंवा व्यवहार (Transactional) एसएमएसमध्ये गुंतलेल्या व्यवसायांना प्रेषक आयडी आणि एसएमएस टेम्पलेट्ससह त्यांचे व्यवसाय तपशील सबमिट करून नोंदणी करणे आवश्यक आहे. यात सेंडरचा आयडी आणि एसएमएस टेम्पलेटचाही समावेश आहे.
अॅक्सेस प्रोव्हायडर्सना प्राप्तकर्त्याचं नाव, अमाउंट, तारीख फॉरमॅट या तीन व्हेरिएबल समाविष्ट आहेत, अशा टेम्पलेट्ससाठी स्वतंत्र मंजुरी प्राधिकरण नियुक्त करणं आवश्यक आहे. प्रत्येक व्हेरिएबल भाग ज्या उद्देशानं वापरायचा प्रस्तावित आहे त्यासाठी प्री-टॅग करणंही गरजेचं असल्याचं ट्रायनं निवेदनात म्हटलं आहे.
अनव्हेरिफाइड हेडर्स आणि टेम्पलेट्स ब्लॉक करण्याचे आदेश
सर्व अनव्हेरिफाइड आणि न वापरलेले हेडर्स आणि टेम्पलेट्स ब्लॉक करण्याचे आदेश ट्रायनं टेलिकॉम कंपन्यांना फेब्रुवारीमध्येच दिले होते. अनुक्रमे 30 आणि 60 दिवसांची मुदत त्यासाठी देण्यात आली होती. दरम्यान, काही टेम्पलेट्स खरी आहेत, हे कंपन्यांनी त्यावेळी ट्रायला कळवलं नाही. जसं की, आयआरसीटीसी (IRCTC) तिकीट माहिती, स्टॉक ट्रेडिंग माहिती, ऊस खरेदी आणि सेटलमेंट संदर्भातली माहिती... यांना तीनपेक्षा जास्त व्हेरिएबल्सची आवश्यकता आहे. केवळ तीन व्हेरिएबल्स यासाठी पुरेसे नाहीत.
किमान 30 टक्के मजकूर निश्चित करायला हवा - ट्राय
काही व्हेरिएबल्सना 30पेक्षा जास्त कॅरेक्टर्सची गरज असते. यात नाव, पत्ता यांचा समावेश होतो. सलग दोन व्हेरिएबल्सना परवानगी न दिल्यानं नाव, पत्ता इत्यादी संदर्भात माहिती पूर्णत: मर्यादित होते. नवा नियम सूचित करण्यामागचं कारण काय, हे ट्रायनं दूरसंचार ऑपरेटरना सांगितलंय. ट्रायने दूरसंचार कंपन्यांना पुढे निर्देश दिले, की एसएमएसमधला किमान 30 टक्के मजकूर निश्चित करायला हवा. त्यामुळे त्या एसएमएसचा मूळ हेतू ज्यासाठी कंटेंट टेम्पलेट अप्रुव्ह केला गेला होता, तो कायम राहील आणि मध्यस्थांनी बदलता येणार नाही.
अनौपचारिकपणे अतिरिक्त वेळ
एंड यूझर्सना एसएमएस पाठवण्यासाठी 3 भागधारक समाविष्ट आहेत. एक म्हणजे एंटरप्राइझेस ज्यांना व्हॉइस, एसएमएसच्या स्वरूपात टेम्पलेट पाठवायचं आहे, सी पास प्लेअर्स (CPaaS players) किंवा टेलीमार्केटर जे एंटरप्राइजेसच्या वतीनं मोठ्या प्रमाणात एसएमएस पाठवतात आणि त्यांच्याशी अॅप्लिकेशन एकत्रीकरण प्रदान करतात. तिसरा म्हणजे टेलिकॉम ऑपरेटर जो नेटवर्क आणि डिस्ट्रिब्युटेड लेजर टेक्नॉलॉजी (DLT) प्लॅटफॉर्मचा मालक आहे. कंटेंट टेम्पलेटमध्ये अधिकृत यूआरएल, अॅप, ओटीटी लिंक किंवा कॉलबँक नंबर दिला जाईल, असंही ठरवण्यात आलंय. दरम्यान हेडर आणि मेसेज टेम्प्लेट्सचा गैरवापर रोखण्यासाठी ट्रायनं आधीही निर्देश जारी केले होते. या आधीच्या जारी केलेल्या निर्देशांची अंमलबजावणी करण्यासाठी टेलिकॉम ऑपरेटर आणि प्रमुख संस्थांना अनौपचारिकपणे अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे.