Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Top 5 scooters: कॉलेजला जाणाऱ्या मुलामुलींसाठी बेस्ट स्कूटी; 'ही' आहेत ट्रेंडिंग मॉडेल्स

Top 5 scooters

बस, रेल्वेची गर्दी टाळण्यासाठी स्कूटी घेण्याचा आग्रह अनेक विद्यार्थी पालकांकडे धरतात. कॉलेजच्या तरुणांना अशी स्कूटी पाहिजे असते जी त्यांच्या खिशाला परवडेल आणि मित्रमैत्रिणींसमोर स्टाइलही करता येईल. पाहूया बाजारात सध्या कोणत्या ट्रेंडिग स्कूटी आहेत, ज्यामुळे तुमची कॉलेज लाइफ आणखी कूल बनेल.

Top 5 scooters for college students: पुढील महिन्यापासून नवं शैक्षणिक वर्ष सुरू होईल. कॉलेजला जाण्याची पूर्वतयारी तरुणाईकडून एव्हाना सुरू झालीच आहे. नुकतेच बारावी पास होऊन कॉलेजात पहिल्यांदाच जाणाऱ्या मुलामुलींना स्वत: ची स्कूटी पाहिजे असते. आता तर इलेक्ट्रिक स्कूटीची कॉलेजच्या मुलामुलींमध्ये क्रेझ वाढत आहे. 

बस, रेल्वेची गर्दी टाळण्यासाठी स्कूटी घेण्याचा आग्रह अनेक विद्यार्थी पालकांकडे धरतात. तरुणांना अशी स्कूटी पाहिजे असते जी त्यांच्या खिशाला परवडेल आणि मित्रमैत्रिणींसमोर स्टाइलही करता येईल. पाहूया बाजारात सध्या कोणत्या ट्रेंडिग स्कूटी आहेत, ज्यामुळे तुमची कॉलेज लाइफ आणखी कूल बनेल.

(टीव्हीएस एनटॉर्क) TVS Ntorq

किंमत 84,386 रुपयांपासून पुढे

TVS Ntorq 125 ही स्कूटी तरुणांमध्ये चांगलीच लोकप्रिय होत आहे. स्पोर्टी लूकमधील ही स्कूटी स्टायलिश दिसते. या गाडीला 124.8cc सीसीचे सिंगल सिलिंडर एअर कूल्ड इंजिन आहे. यातून  9.2 bhp आणि 10.5 Nm पावर जनरेट होते. या गाडीची एक्स शोरुम किंमत 84,386 हजारांपासून पुढे असून टॉप मॉडेल एक लाखांच्याही पुढे आहे.

tvs-ntorq.jpg

ww.bikedekho.com

हिरो झूम (Hero Xoom)

किंमत 69,099 रुपये पासून पुढे

मागील काही महिन्यांपूर्वीच हिरोची ही नवी गाडी मार्केटमध्ये लाँच झाली आहे. 110cc सीसीचे इंजिन असून स्कूटीचे वजनही कमी आहे. मुलींची पसंती लाइटवेट स्कूटीला असते. त्यामुळे या मॉडेलचा विचार करू शकता. 110.9cc सिंगल सिलिंडर एअर कुल्ड इंजिन असून यातून 8.05 bhp आणि  8.70 Nm पावर जनरेट होते. या गाडीची एक्स शोरुम किंमत 69,099 ते 77,199 च्या दरम्यान आहे.

hero-xoom.jpg

www.zigwheels.com

Ather 450X (एथर 450X)

किंमत 98,183 पासून पुढे

जर तुम्ही लेटेस्ट टेक्नॉलॉजी पसंत करत असाल तर एथर 450X या इलेक्ट्रिक स्कूटीचा विचार करू शकता. ही स्टाइलिश असून यात हायटेक फिचर्स आहेत. या गाडीला 3.7 kWh lithium-ion बॅटरी आणि 6 kW इलेक्ट्रिक मोटार आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ही गाडी 146 किलोमीटरपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे कॉलेज संपल्यावर मित्रमैत्रिणींसोबत फिरायला जायचा प्लॅन करत असाल तरी चार्जिंग संपण्याची चिंता नाही. या गाडीची एक्स शोरुम किंमत 98,183 ते 1.28 लाखा दरम्यान आहे.

ather-450x.jpg

www.bikewale.com

सुझुकी बर्गमॅन (Suzuki Burgman)

किंमत 93,000 रुपयांपासून पुढे

सुझुकी बर्गमॅन ही 125cc ची फॅन्सी स्कूटी आहे. या स्कूटीला अनेक अत्याधुनिक फिचर्स देण्यात आली आहेत. या गाडीला सिंगल सिलिंडर एअर कूल्ड इंजिन असून यातून 8.5 bhp आणि 10 Nm पावर जनरेट होतो. या गाडीची एक्स शोरुम किंमत 93,000 हजार ते 1.12 लाखांच्या दरम्यान आहे.

suzuki-burgman.jpg

www.zigwheels.com

होंडा अॅक्टिवा (Honda Activa)

किंमत 75,347 रुपयांपासून पुढे

होंडा अॅक्टिवा तर भारतीयांच्या पसंतीची गाडी आहे. या स्कूटीचा सर्वाधिक खप होतो. मागील काही वर्षात या गाडीच्या डिझाइनमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. या गाडीला 109.51cc चे सिंगल सिलिंडर एअर कूल्ड इंडिन असून यातून 7.73 bhp आणि 8.90 Nm पॉवर जनरेट होते. या गाडीची एक्स शोरुम किंमत 75,347 ते 81,348 च्या दरम्यान आहे. 

honda-activa.jpg www.zigwheels.com