गेल्या काही महिन्यांपासून महागाईचा सामना करणाऱ्या जनतेसाठी एक महत्वाची बातमी आली आहे. एप्रिल महिन्यात किरकोळ महागाई दरात घट झालेली पाहायला मिळते आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार एप्रिलमध्ये किरकोळ महागाई दर 4.70 टक्क्यांवर आला आहे. मार्च 2023 नंतर अलग दुसऱ्या महिन्यात म्हणजे एप्रिल 2023 मध्ये महागाई दरात घट झाल्याचे पाहायला मिळते आहे. किरकोळ महागाईचा हा 18 महिन्यांतील नीचांकी स्तर आहे असे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने म्हटले आहे.
गेल्या महिन्यात, म्हणजेच मार्चमध्ये महागाईचा दर 5.66 टक्के इतका नोंदवला गेला होता. किरकोळ महागाई दर म 2 ते 4 टक्क्यांवर ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया प्रयत्नशील असते. या श्रेणीतील महागाई सामान्य नागरिकांच्या आवाक्यातील आहे असे आरबीआयचे मत आहे. सध्याचा महागाई दर समाधानकारक असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. रिझर्व्ह बँकेने 2023-24 या आर्थिक वर्षात किरकोळ महागाई 5.2 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
With retail inflation sliding to an 18-month low of 4.70% in April 2023, rating agency ICRA foresees the CPI inflation to remain range-bound at 4.7-5.0% in May-June 2023.#Inflation #Reatailinflation #ICRA #CPI
— IANS (@ians_india) May 12, 2023
आतापर्यंतच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, CPI-आधारित किरकोळ चलनवाढ या वर्षी मार्चमध्ये 5.66 टक्के इतकी होती आणि वर्षभरापूर्वी एप्रिल-2022 मध्ये ती 7.79 टक्के इतकी होती. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी महागाई दरात चांगली घट झाल्याचे दिसते आहे. .
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानुसार, एप्रिल-2023 मध्ये खाद्यपदार्थांच्या महागाईचा दर 3.84 टक्के नोंदवला गेला होता, जो मार्च-2023 मध्ये 4.79 टक्के इतका होता. वर्षभरापूर्वी एप्रिल-2022 हे प्रमाण 8.31 टक्के इतके होते. तृणधान्ये, दूध आणि फळे इत्यादींच्या किमती वाढल्यामुळे किरकोळ महागाई डिसेंबर 2022 मध्ये 5.7 टक्क्यांवरून यावर्षी फेब्रुवारीमध्ये 6.4 टक्क्यांवर पोहोचली होती.
औद्योगिक उत्पादनात वाढ
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानुसार देशाचे औद्योगिक उत्पादन मार्चमध्ये 1.1 टक्क्यांनी वाढले आहे,जे वर्षभरापूर्वी याच कालावधीत 2.2 टक्के इतके होते.राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मार्च 2023 मध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांक (IIP) 1.1 टक्क्यांनी वाढला. या काळात उत्पादन क्षेत्राचे उत्पादन केवळ 0.5 टक्क्यांनी वाढले आहे.
2022-23 या आर्थिक वर्षात खाण उत्पादनात 6.8 टक्क्यांनी वाढ झाली, तर वीज उत्पादनात 1.6 टक्क्यांनी घट झाली असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. संपूर्ण आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये औद्योगिक उत्पादनाच्या निर्देशांकात 5.1 टक्के वाढ नोंदवली गेली, तर 2021-22 या आर्थिक वर्षात 11.4 टक्के वाढ झाली असल्याचे अहवालात म्हटले आहे.
स्वस्त कर्जाची अपेक्षा
किरकोळ महागाई दर RBI च्या सहनशीलतेच्या कक्षेत (Tolerance Band) सध्या आहे. RBI ने महागाई दराची कमाल पातळी 6 टक्क्यांवर आणली आहे आणि किमान पातळी 4 टक्के निर्धारित केली आहे. आरबीआयची पतधोरण बैठक येत्या जून महिन्यात होणार आहे.महागाईच्या आघाडीवर सर्व काही ठीक असेल तर आरबीआयकडून स्वस्त कर्जाची अपेक्षा केली जाऊ शकते.