Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

DMart March Quarter Results : डिमार्टला मार्च तिमाहीत 460 कोटींचा नफा

DMart March Quarter Results

Image Source : www.livemint.com

DMart Q4 Results : सर्व ग्राहकांना परीचित असलेले डिमार्ट हे नाव घरोघरी पोहचले आहे. Avenue Supermarts, DMart नावाने व्यापार करणाऱ्या कंपनीने, शनिवारी, 13 मे रोजी आर्थिक वर्ष 2023 च्या मार्च तिमाहीचे निकाल (DMart March Quarter Results) जाहीर केले. मार्च तिमाहीत डिमार्ट कंपनीचा निव्वळ नफा 8 टक्क्यांनी वाढून 460 कोटी रुपये झाला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 427 कोटी रुपये होता.

460 Crore Profit For Dmart : Avenue Supermarts, DMart नावाने व्यापार करणाऱ्या कंपनीने, शनिवारी, 13 मे रोजी आर्थिक वर्ष 2023 च्या मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले. मार्च तिमाहीत डिमार्ट कंपनीचा निव्वळ नफा 8 टक्क्यांनी वाढून 460 कोटी रुपये झाला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 427 कोटी रुपये होता. तर डिसेंबर तिमाहीमध्ये कंपनीचा निव्वळ नफा 590 कोटी रुपये होता. अव्हेन्यू सुपरमार्ट्सचा एकत्रित महसूल 21 टक्क्यांनी वाढून 10,594 कोटी रुपये झाला आहे. जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 8,786 कोटी रुपये होता. त्याचवेळी डिसेंबर तिमाहीत कंपनीचा महसूल 11,569 कोटी रुपये होता.

40 स्टोअर्स  नेटवर्कमध्ये जोडले 

DMart ने मार्च तिमाहीत 18 नवीन रिटेल चेन उघडल्या आहेत. यासह देशभऱ्यातील एकूण स्टोअरची संख्या आता 324 रुपये झाली आहे. संपूर्ण आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये कंपनीने एकूण 40 स्टोअर्स त्याच्या नेटवर्कमध्ये जोडले आहेत.

महसूलात 38 टक्क्यांनी वाढ 

संपूर्ण आर्थिक वर्षातील आकडेवारीबद्दल बोलायचे झाल्यास, Avenue Supermarts चा निव्वळ नफा 59 टक्क्यांनी वाढून 2,379 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. जो आर्थिक वर्ष 2022 मध्ये 1,493 कोटी रुपये होता. त्याचवेळी कंपनीचा महसूल मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 30,976 कोटी रुपयांच्या तुलनेत 38 टक्क्यांनी वाढून 42,840 कोटी रुपये झाला आहे.

वर्षभरात शेअर्सची किंमत 3.20 टक्क्यांनी घसरली

आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीचा ऑपरेटिंग नफा 46 टक्क्यांनी वाढला आहे. त्याचवेळी त्याचे नफा मार्जिन मागील आर्थिक वर्षातील 8.1 टक्क्यांवरुन 8.5 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर शुक्रवारी 12 मे रोजी डिमार्टचे शेअर्स NSE वर 0.80 टक्क्यांनी कमी होऊन 3,675 रुपयांवर बंद झाले. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये 5.09 टक्क्यांनी वाढ झाली. मात्र, गेल्या वर्षभरात डिमार्टच्या शेअर्सची किंमत केवळ 3.20 टक्क्यांनी घसरली आहे.