• 08 Jun, 2023 00:16

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Job Openings: रिअल इस्टेट आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील नोकरीच्या संधी वाढल्या, नोकरी जॉबस्पीकचा अहवाल

Job Openings, Naukri JobSpeak

Image Source : Source: www.orfonline.org

Job Openings: नोकरी जॉबस्पीक इंडेक्स या भारतातील प्रमुख जॉब इंडेक्सने एप्रिल 2023 मध्ये वरिष्ठ आणि व्यवस्थापन पातळीवरील उच्च पदस्थ नोकऱ्यांचा अहवाल (व्हाइट-कॉलर हायरिंग) जाहीर केला.रिअल इस्टेट क्षेत्राने नोकर भरतीत 21% वाढ झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. 16 वर्षांपेक्षा अधिक अनुभव असलेल्या वरिष्ठ उमेदवारांची मागणी वाढल्याचे या अहवालात म्हटले आहे.

रिअल इस्टेट, वित्तीय सेवा क्षेत्रासह  ऑइल अँड गॅस, विमा आदी क्षेत्रांमध्ये एप्रिल महिन्यात  नोकर भरतीत चांगली वाढ झाल्याचा दावा नोकरी जॉबस्पीक इंडेक्समध्ये करण्यात आला आहे. रिअल इस्टेट व बीएफएसआय यांसारख्या नॉन-टेक क्षेत्रांमधील सक्रिय भरतीने आयटी क्षेत्रातील नोकरभरतीमधील घट कमी केली. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या एप्रिलमध्ये वरिष्ठ पातळीवरील नोकरीच्या संधीमध्ये मात्र 5% घट झाली.

नोकरी जॉबस्पीक इंडेक्स या भारतातील प्रमुख जॉब इंडेक्सने एप्रिल 2023 मध्ये वरिष्ठ आणि व्यवस्थापन पातळीवरील उच्च पदस्थ नोकऱ्यांचा अहवाल (व्हाइट-कॉलर हायरिंग) जाहीर केला.रिअल इस्टेट क्षेत्राने नोकर भरतीत 21% वाढ झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. याव्यतिरिक्त नोकरभरतीच्या कामात अधिक वाढ असलेल्या क्षेत्रांमध्ये ऑईल अ‍ॅंड गॅस (तेल व वायू) क्षेत्राने 20%, विमा क्षेत्राने 13% आणि बँकिंग क्षेत्राने 11% वाढ नोंदवली आहे. ऑटो क्षेत्र आणि फार्मा क्षेत्रातील नोकरभरती अनुक्रमे 4% आणि 3% वाढली.

16 वर्षांपेक्षा अधिक अनुभव असलेल्या वरिष्ठ उमेदवारांची मागणी गेल्या वर्षीच्या एप्रिलच्या तुलनेत 30% वाढली, तर 13 ते 16 वर्षांचा अनुभव असलेल्या वरिष्ठ उमेदवारांची 20% वाढली. नवीन पदवीधर आणि 4 ते 7 वर्षांचा अनुभव असलेल्या उमेदवारांच्या मागणीत गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत घट झाली आहे. ‘एप्रिलमध्ये नियुक्‍ती प्रक्रियेत वाढीमध्ये रिअल इस्टेट, बीएफएसआय आणि ऑईल अ‍ॅण्ड गॅस यांसारख्या काही प्रमुख क्षेत्रांचे वर्चस्व होते. आयटी-केंद्रित महानगरांनी सावधपणे नियुक्ती करण्याची भावना दाखवली असताना अहमदाबाद आणि वडोदरासारखी उदयोन्मुख शहरात जॉब ओपनिंग वाढल्याचे नोकरीडॉटकॉमचे प्रमुख व्यवसाय अधिकारी पवन गोयल यांनी सांगितले.

रिअल इस्टेटमधील जॉब ओपनिंग वाढल्या 

रिअल इस्टेट क्षेत्र नॉन-टेक्नॉलॉजी उद्योगांमध्ये अग्रस्थानी होते, गेल्या वर्षाच्या याच महिन्याच्या तुलनेत नोकरभरतीमध्ये 21% टक्के वाढ नोंदवली गेली. ही वाढ प्रामुख्याने महानगरीय क्षेत्रांमध्ये निवासी आणि व्यावसायिक मालमत्तांच्या नवीन लाँचमध्ये वाढ झाल्यामुळे झाली, ज्यामुळे टेंडर मॅनेरजर (निविदा व्यवस्थापक), कन्स्ट्रक्शन इंजिनिअर (बांधकाम अभियंता) आणि स्थापत्य अभियंता यासारख्या महत्त्वाच्या पदांकरिता मागील महिन्यात भरती झाली. मोठ्या महानगरांपैकी कोलकाता, पुणे आणि हैदराबादने रिअल इस्टेट क्षेत्रासाठी नियुक्तीमध्ये अनुक्रमे 28%, 22% व 19% नोकरभरती मध्ये वाढ नोंदवली गेली. 16 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्या वरिष्ठ उमेदवारांची या क्षेत्रात मागणी सर्वाधिक होती.

आयटी सेक्टरवर मंदीचे सावट

आयटी क्षेत्रातील नियुक्तीने गेल्या वर्षाच्या एप्रिलच्या तुलनेत नोकरभरतीत 27% घट झाली. आयटी क्षेत्रातल्या मोठ मोठ्या कंपन्या, स्टार्टअप्स आणि युनिकॉर्न स्टार्टअप्स या सर्वांना सध्याच्या जागतिक मंदीचा परिणाम जाणवला आहे. बेंगळुरू, हैदराबाद आणि पुणे यासारख्या आयटी-केंद्रित कंपन्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती असलेल्या शहरांना सर्वाधिक फटका बसला. आयटी व्यतिरिक्‍त बीपीओ, एडटेक व रिटेल अशा क्षेत्रांमध्ये अनुक्रमे 18%, 21% व 13% टक्के घसरण नोंदवली गेली.

नॉन-मेट्रो शहरांमध्ये नियुक्तीत वाढ:

नॉन-मेट्रो शहरांमध्ये अहमदाबाद नवीन रोजगार निर्मितीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 28% वाढीसह नोकरभरती ट्रेण्ड्समध्ये आघाडीवर आहे, त्यानंतर नवीन रोजगार निर्मितीमध्ये 14% व 9% वाढीसह अनुक्रमे वडोदरा व जयपूर यांचा क्रमांक आहे. बँकिंग, ऑटो आणि इन्शुरन्स क्षेत्रांनी नॉन-मेट्रो शहरांमध्ये निदर्शनास आलेल्या नोकरभरती मध्ये प्रामुख्याने योगदान दिले.