Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Unique ID For Doctors: वैद्यकीय प्रॅक्टिस करण्यासाठी डॉक्टरांना Unique ID; नागरिकही पाहू शकतात डॉक्टरांची माहिती

Unique ID For Doctors

मेडिकल प्रॅक्टिस करायची असल्यास भारतातील सर्व डॉक्टरांना आता सरकारकडून Unique ID घ्यावा लागणार आहे. National Medical Commission च्या नव्या निर्णयानुसार, देशभरातील डॉक्टरांचे कॉमन नॅशनल मेडिकल रजिस्टर तयार करण्यात येणार आहे. ही माहिती सर्वसामान्य नागरिकांनाही पाहायला मिळणार आहे.

Unique ID For Doctors: मेडिकल प्रॅक्टिस करायची असल्यास भारतातील सर्व डॉक्टरांना आता सरकारकडून Unique ID घ्यावा लागणार आहे. त्याशिवाय वैद्यकीय प्रॅक्टिस करता येणार नाही. नॅशनल मेडिकल कमिशनने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. सर्व डॉक्टरांची माहिती एकाच ठिकाणी साठवण्यात येणार आहे. हा सर्व डेटा NMC कडे असेल.

NMC कडे देशभरातील डॉक्टरांची माहिती

NMC च्या नव्या निर्णयानुसार, देशभरातील डॉक्टरांचे कॉमन नॅशनल मेडिकल रजिस्टर तयार करण्यात येईल. वैद्यकीय प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांची सर्व माहिती यामध्ये असेल. ही माहिती NMC च्या Ethics and Medical Registration Board (EMRB) कडेही उपलब्ध असेल. सर्व राज्यांच्या मेडिकल कौन्सिलमधील डॉक्टरांच्या नोंदणीचा डेटा नॅशनल मेडिकल कमिशनकडे पाठवला जाईल. 

युनिक आयडी हा एक प्रकारचा परवानाच असेल. या परवान्याची मुदत पाच वर्षांसाठी असेल. पाच वर्ष पूर्ण होण्याआधी परवाना पुन्हा नूतनीकरण करून घ्यावा लागेल. त्यासाठी तीन महिन्यांचा वेळ देण्यात येईल. प्रॅक्टिसचा परवाना नूतनीकरणाची प्रक्रिया राज्य वैद्यकीय परिषदेकडे पूर्ण करावी लागेल.

डॉक्टरचे शिक्षण, अनुभव, डिग्रीची नोंदणी

नॅशनल मेडिकल रजिस्टरमध्ये डॉक्टरची स्पेशालिटी, शिक्षण पूर्ण झाल्याचे वर्ष, विद्यापीठ आणि शिक्षण संस्थेचे नाव, ज्या रुग्णालयात काम करत आहे त्याचे नाव अनुभव अशी माहिती या रेकॉर्डमध्ये असेल. www.nmc.org.in या संकेतस्थळावर ही माहिती सर्वांसाठी उपलब्ध असेल. सर्वसामान्य नागरिकही डॉक्टरची माहिती पाहू शकतो. 

डॉक्टरचा नोंदणी किंवा नूतनीकरण अर्ज राज्य वैद्यकीय परिषदेने रद्द ठरवल्यास त्यावर दाद मागण्याची व्यवस्था केली आहे. 30 दिवसांच्या आत Ethics and Medical Regulation Board कडे अपील करता येईल. जर या कमिटीने परवाना वैध ठरवला तर राज्य वैद्यकीय परिषदेवर हा निर्णय बंधनकारक राहील.

Unique ID चा सर्वसामान्य नागरिकांना कसा फायदा होईल?

भारतामध्ये बनावट डॉक्टरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अशा डॉक्टरांना शोधून काढण्याचे काम सरकारी यंत्रणांसाठी जिकिरीचे आहे. आता युनिक आयडीमुळे बनावट डॉक्टरची माहिती सर्वसामान्य नागरिकांनाही समजू शकते. तसेच डॉक्टरची डिग्री, अनुभव याची माहितीही नागरिकांना मिळेल. राज्य वैद्यकीय परिषद आणि नॅशनल मेडिकल कौन्सिल यांच्यात समन्वय राहण्यासही मदत होईल.