• 05 Jun, 2023 20:05

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Unemployment Rate in India: बेरोजगारीच्या बाबतीत भारत टॉप 5 देशांच्या यादीत…

unemployment in India

जागतिक पातळीवर भारतातील बेरोजगारीचा विचार केला तर पहिल्या पाच देशांमध्ये भारताचा नंबर लागतो आहे, तशी आकडेवारी समोर आली आहे. ‘द वर्ल्ड रँकिंग’च्या अहवालानुसार बेरोजगारीच्या बाबतीत भारताचा जगभरात चौथा क्रमांक लागतो. बेरोजगारीची ही समस्या केवळ भारतातच आहे असे नाही. जगभरातील देश या समस्येचा सामना करत आहेत आणि त्यावर उपायोजना करण्यासाठी कार्यरत आहेत...

भारतासह अनेक देश आज महागाईचा आणि बेरोजगारीचा सामना करत आहेत. नुकतेच लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकत भारताने जगात पहिला क्रमांक पटकावला आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत भारतात रोजगाराची उपलब्धता वाढताना मात्र दिसत नाहीये. प्रत्येक विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत बेरोजगारीचा मुद्दा हा कळीचा विषय बनला आहे. गेल्या काही वर्षांपासून बेरोजगारी विषयावर देशभरात मोठमोठी आंदोलने देखील झाली आहेत.

जागतिक पातळीवर भारतातील बेरोजगारीचा विचार केला तर पहिल्या पाच देशांमध्ये भारताचा नंबर लागतो आहे, तशी आकडेवारी समोर आली आहे.

भारतातील बेरोजगारी

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) च्या अलीकडच्या आकडेवारीनुसार, भारतातील बेरोजगारीचा दर मार्च 2023 मध्ये सलग दुसऱ्या महिन्यात 7.8 टक्क्यांवर पोहोचला आहे. CMI च्या आकडेवारीनुसार, भारतातील शहरी भागात बेरोजगारीचा दर 8.51 टक्के इतका नोंदवला गेला आहे. मार्च महिन्यात ग्रामीण भागात हे प्रमाण 7.47 टक्के इतके होते.

सदर आकडेवारीनुसार भारतातील बेरोजगारीची काय अवस्था आहे याची कल्पना येते. बेरोजगारीवर उपाय म्हणून भारत सरकारने तरुणांना उद्यमी बनविण्यासाठी मुद्रा, कौशल्य विकास आदी योजना आणल्या आहेत. परंतु वरील आकडेवारीचा अभ्यास करता, अजूनही बेरोजगारी कमी झाली नाहीये असे म्हणावे लागेल.

बेरोजगारीत भारताचा क्रमांक

‘द वर्ल्ड रँकिंग’च्या अहवालानुसार बेरोजगारीच्या बाबतीत भारताचा जगभरात चौथा क्रमांक लागतो. बेरोजगारीची ही समस्या केवळ भारतातच आहे असे नाही. जगभरातील देश या समस्येचा सामना करत आहेत आणि त्यावर उपायोजना करण्यासाठी कार्यरत आहेत. ‘द वर्ल्ड रँकिंग’च्या अहवालानुसार दक्षिण आफ्रिकेत सध्या जगात सर्वाधिक बेरोजगारी आहे.  

सध्या या देशात बेरोजगारीचा दर 32.7 टक्के इतका आहे.  दुसऱ्या क्रमांकावर स्पेन हा देश असून तिथे 13.26% बेरोजगारी आहे. तिसऱ्या क्रमांकावर  तुर्की हा देश असून इथे बेरोजगारीचा दर 10% नोंदवण्यात आला आहे. 8.8 टक्के बेरोजगारी दरासह ब्राझील हा देश चौथ्या क्रमांकावर आहे, तर 7.8 टक्के बेरोजगारीसाह इटली आणि  भारत देश पाचव्या क्रमांकावर आहे.

दक्षिण आफ्रिकेसह इतर देशांना बेरोजगारीशी लढताना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे. प्रत्येक देशाचे प्रश्न आणि तेथील परिस्थिती वेगवेगळी असली तरी काही समान मुद्दे मात्र या समस्येमागे आहेत.

कुशल कामगारांची वानवा असणे हे बेरोजगारीचे मुख्य कारण आहे. व्यवसायाच्या विकासासाठी आवश्यक कौशल्य कामगारांकडे नसेल तर व्यवसाय देखील वाढत नाही आणि रोजगार निर्मिती देखील होत नाही. या मुद्याकडे भारत सरकार गांभीर्याने लक्ष देत आहे. यासाठी वेगवेगळे कौशल्य विकास कार्यक्रम देखील सरकारमार्फत चालवले जात आहे.

धीम्या गतीने आर्थिक वाढ असणे हे देखील एक मुख्य कारण आहे. जगातील सर्वच विकसनशील देशांनी अलिकडच्या वर्षांत तुलनेने मंद आर्थिक वाढ अनुभवली आहे, ज्यामुळे रोजगार निर्मिती मर्यादित प्रमाणात आहे. राजकीय अस्थिरता, धोरणातील अनिश्चितता आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांसारख्या घटकांमुळे गुंतवणूक आणि आर्थिक विस्तारात अडथळा निर्माण होतो आहे, ज्यामुळे रोजगाराच्या संधी कमी निर्माण होत आहेत.

लोकसंख्या हा देखील बेरोजगारीच्या बाबतीत मुख्य घटक आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत अपुरी संधीची समानता असल्यामुळे सर्वांनाच रोजगार देणे सरकारसाठी अवघड होऊन बसले आहे.

या आव्हानांना तोंड देण्यासाठी सरकारने वेगवगेळ्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. शिक्षण आणि कौशल्य विकास, उद्योजकता आणि लहान व्यवसाय वाढीस प्रोत्साहन देणे, परदेशी गुंतवणुकीनां आकर्षित करणे, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे अत्यंत महत्वाचे आहे.