Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Netflix Password Sharing Ban: नेटफ्लिक्सची पासवर्ड शेअर करण्यावर बंदी!

Netflix Password Sharing Ban

Image Source : www.cnbc.com

Netflix Password Sharing Ban: जगभरातील सर्वांधिक पाहिला जाणारा ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने पासवर्ड शेअरिंग करण्यावर बंदी आणली आहे. नेटफ्लिक्सने पासवर्ड शेअर करण्यावर बंदी घालताना अद्याप याबाबत कोणतीही नियमावली जाहीर केलेली नाही.

Netflix Password Sharing Ban: जगभरातील सर्वांधिक पाहिला जाणारा ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने पासवर्ड शेअरिंग करण्यावर बंदी आणली आहे. पासवर्ड शेअर न करण्याबाबतचा नियम सध्या फक्त युकेमध्ये (United Kingdom) लागू केला आहे. भविष्यात तो इतर देशांसाठीही लागू केला जाऊ शकतो.  

अमेरिकीतील सर्वांत मोठा ओटीटी प्लॅटफॉर्म असलेल्या नेटफ्लिक्स कंपनीने हा निर्णय घेतला असून याची अंमलबजावणी लगेच केली जाणार आहे. एकदा का हा निर्णय लागू झाला की, नेटफ्लिक्सचे वापरकर्ते आपला पासवर्ड इतरांना शेअर करू शकणार नाहीत. नेटफ्लिक्सने याबाबत यापूर्वीच आपल्या सब्स्क्राईबर्सना पासवर्ड पॉलिसीबाबत कळवले होते. दरम्यान, कंपनीने यापूर्वीच पासवर्ड शेअर करण्यासाठी न्यूझिलंड, पोर्तुगाल आणि स्पेनमध्ये पैसे आकारण्यास सुरूवात केली.

नेटफ्लिक्सने पासवर्ड शेअर करण्यावर बंदी घालताना अद्याप कोणतीही नियमावली जाहीर केलेली नाही. सध्या कंपनीने फक्त हा निर्णय घेतला असल्याचे ग्राहकांना कळवले आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात कंपनीने पासवर्ड शेअर करण्याबाबत नवीन प्लॅन आणला जाईल असे म्हटले होते. त्यानुसार कंपनीने सध्या तरी पासवर्ड शेअर करण्यावर बंदी असल्याचे म्हटले आहे आणि सध्या ही बंदी फक्त युनायटेड किंगडममध्ये लागू आहे.

नेटफ्लिक्ससह इतरही ओटीटी प्लॅटफॉर्म सध्या आर्थिक विवंचनेतून जात आहेत. बऱ्याच ओटीटी कंपन्यांचे सब्स्क्राईबर्सची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे मध्यंतरी नेटफ्लिक्सनेही आपल्या कंपनीतून कर्मचाऱ्यांची कपात केली होती. जगभरात सुरू असलेल्या आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी आपल्या खर्चात कपात करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे नेटफ्लिक्समध्येही कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया फ्रीज केली. कंपनीने या वर्षभरात जवळपास 300 मिलिअन डॉलर्स पर्यंत खर्चात कपात करण्याच प्लॅन केल्याचे बोलले जाते.

भारतातही फ्री पासवर्ड शेअरिंग बंद होणार?

नेटफ्लिक्स कंपनीने ग्राहकांकडून पासवर्ड शेअर केले जात असल्यामुळे, पॉलिसी शेअरिंगमध्ये बदल करण्याबाबत फेब्रुवारी महिन्याता भाष्य केले होते. त्यावेळी कंपनीने असेही म्हटले होते की, 2023 च्या पहिल्या तिमाहीत पासवर्ड शेअरिंग बंदी घातली जाईल. त्यानुसार कंपनीने काही देशांमध्ये तशी बंदी घालण्यास सुरूवात केली आहे. पासवर्ड शेअरिंग करण्यावर बंदी घालण्याचा पुढचा निर्णय कदाचित भारतातही लागू होऊ शकतो. नेटफ्लिक्सला भारतात 2023च्या पहिल्या तिमाहीत 8.16 बिलियन डॉलर्सचा महसूल मिळाला आहे; जो कंपनीच्या अपेक्षापेक्षा कमी आहे. दुसऱ्या तिमाहीसाठी कंपनीने 8.2 बिलिअन डॉलर्स महसूल मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.