Electric Bike Sale In April Month : इलेक्ट्रिक टू व्हीलर किरकोळ विक्री एप्रिल 2023 ची यादी पाहिली तर, विक्रीच्या बाबतीत ओला इलेक्ट्रिक पहिल्या स्थानावर आहे. एप्रिल 2023 मध्ये, ओला इलेक्ट्रिक कंपनीने 21,882 गाड्या विकल्या आहेत. एप्रिल 2022 मध्ये, ओला कंपनीने एकूण 12,708 इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री केली होती. म्हणजे या वर्षातील वाढ ही 72.19 टक्के आहे. मार्च 2023 मध्ये देखील ओला इलेक्ट्रिकला प्रचंड मागणी होती. वर्षभरात ही वाढ 72.19 टक्के होती. या दरम्यान कंपनीने 21,274 मोटारींची विक्री केली होती.
Table of contents [Show]
दुसऱ्या क्रमांकावर TVS
TVS कंपनी इलेक्ट्रिक टू व्हीलर विक्रीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. कारण एप्रिल 2023 मध्ये TVS ने सुमारे 8,726 युनिट्सची विक्री केली आहे. तर एप्रिल 2022 मध्ये TVS ने एकूण 1,498 युनिट्सची विक्री केली आहे. म्हणजेच TVS ने वर्षभरात बऱ्याचपैकी वाढ केली आहे. तर मार्च 2023 मध्ये, TVS ने सुमारे 16,768 युनिट्सची विक्री केली आहे.
तिसऱ्या क्रमांकावर अॅम्पिअर
इलेक्ट्रिक दुचाकी विक्रीच्या बाबतीत अॅम्पिअर कंपनी तिसऱ्या क्रमांकावर आहे. एप्रिल 2023 मध्ये या कंपनीने सुमारे 8318 युनिट्सची विक्री केली. एप्रिल 2022 मध्ये कंपनीने 6540 युनिट्सची विक्री केली होती. मार्च 2023 मध्ये कंपनीने सुमारे 9334 युनिट्सची विक्री केली.
अथर चौथ्या क्रमांकावर
अथर कंपनी इलेक्ट्रिक दुचाकी विक्रीच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर आहे. अथरने एप्रिल 2023 मध्ये एकूण 7746 युनिट्सची विक्री केली आहे. मार्च 2023 मध्ये या कंपनीने एकूण 12,076 युनिट्सची विक्री केली आहे. एप्रिल 2022 मध्ये या कंपनीने एकूण 2,451 युनिट्सची विक्री केली होती. वार्षिक आधारावर 216.03 टक्के वाढ झाली आहे.
बजाज पाचव्या क्रमांकावर
पाचव्या क्रमांकावर ऑटो क्षेत्रातील दिग्गज बजाज कंपनी आहे. बजाजने एप्रिल 2023 मध्ये एकूण 4013 युनिट्स इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री केली आहे. तर एप्रिल 2022 मध्ये या कंपनीने 1222 युनिट्सची विक्री केली आहे. तर मार्च 2023 मध्ये बजाज कंपनीने 4484 युनिट्सची विक्री केली आहे.
हिरो इलेक्ट्रिक
हिरो इलेक्ट्रिक टू व्हीलर कंपनी सहाव्या स्थानावर आहे. या कंपनीने एप्रिल 2023 मध्ये एकूण 3331 युनिट्सची विक्री केली. मार्च 2023 मध्ये या कंपनीने 6652 युनिट्सची विक्री केली होती. म्हणजेच महिनाभरात 3321 युनिट्सची विक्री घटली आहे.
ओकिनावा
ओकिनावा कंपनी सातव्या स्थानावर आहे. या कंपनीने एप्रिल 2023 मध्ये 3216 युनिट्स विकल्या आहेत. आणि मार्च 2023 मध्ये कंपनीने 4507 युनिट्सची विक्री केली होती.
ओकाया आणि कायनेटिक ग्रीन कंपनी
ओकाया कंपनीने एप्रिल 2023 मध्ये एकूण 1562 इलेक्ट्रिक दुचाकी युनिट्सची विक्री केली. मार्च 2023 मध्ये 1762 युनिट्सची विक्री झाली.कायनेटिक ग्रीन कंपनी नवव्या स्थानावर आहे. मार्च 2023 मध्ये कायनेटिक ग्रीन कंपनीने एकूण 848 युनिट्सची विक्री केली. मार्च 2023 मध्ये या कंपनीने 1641 युनिट्सची विक्री केली होती.
रिव्हॉल्ट कंपनी दहाव्या स्थानावर
रिव्हॉल्ट कंपनी दहाव्या स्थानावर आहे. या कंपनीने एप्रिल 2023 मध्ये 523 युनिटची विक्री केली. मार्च महिन्यात 1132 युनिटची विक्री केली. त्यामुळे येथे 53.83 टक्क्यांनी घट दिसून आली.