JioMart Layoff: जिओ मार्टकडून 1 हजार कर्मचारी कपात; भविष्यात आणखी कामगार काढण्याची शक्यता
ऑनलाइन ग्रोसरी व्यवसायातील तीव्र स्पर्धेचा फटका रिलायन्सच्या जिओ मार्टला बसला आहे. कंपनीने 1 हजार कर्मचारी कपात केली असून येत्या काही दिवसांत विविध विभागातील 15 हजार कर्मचारी कपात करण्याचे नियोजन आखल्याची माहिती समोर आली आहे. जिओ मार्टने नुकतेच जर्मन कंपनी मेट्रो कॅश आणि करी चा भारतातील व्यवसाय विकत घेतला. त्यानंतर कंपनीची पुनर्रचना करण्यास सुरुवात केली आहे.
Read More