ट्रायनं (Telecom Regulatory Authority of India) देशातल्या दूरसंचार क्षेत्रातल्या सध्याच्या व्यवसाय, ग्राहकसंख्येवर आधारित एक अहवाल दिलाय. सविस्तर आकडेवारी प्रत्येक कंपनीनुसार जाहीर केलीय. काही कंपन्यांनी प्रचंड ग्राहकसंख्या मिळवलीय. तर काही कंपन्यांनी आपल्या सुमार कामगिरीमुळे असलेली ग्राहकसंख्या गमावलीय. नवीन ग्राहक जोडण्यात रिलायन्सच्या जिओनं (Reliance jio) आघाडी घेतलीय. मार्च महिन्याच्या कालावधीत जिओनं 30.5 लाख नवीन मोबाइल ग्राहक जोडले आहेत. जिओची सध्याची ग्राहकसंख्याही इतर सर्वच दूरसंचार ऑपरेटर्सच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे ही एक सर्वात मोठी दूरसंचार कंपनी ठरलीय.
Table of contents [Show]
एअरटेलनं जोडले 12.12 लाख नवे ग्राहक
व्ही म्हणजेच व्होडाफोन-आयडिया (VI) या दूरसंचार कंपनीनं मात्र नवीन ग्राहक न जोडता असलेले ग्राहक गमावलेत. एका महिन्याच्या कालावधीत 12.12 लाख ग्राहक व्हीनं गमावलेत. तर सुनील मित्तल यांच्या नेतृत्वाखालच्या दूरसंचार कंपनी भारती एअरटेलनं (Bharti Airtel) मार्च महिन्यात 10.37 लाख मोबाइल ग्राहक जोडले आहेत. कंपनीचे फेब्रुवारीमध्ये 36.98 कोटी ग्राहक होते. त्यानंतर मार्चमध्ये ही ग्राहकसंख्या 37.09 कोटींवर गेलीय. फेब्रुवारीमध्ये रिलायन्स जिओनं टेलिकॉम कंपन्यांमध्ये सर्वाधिक सुमारे 1 दशलक्ष मोबाइल ग्राहक जोडले. तर एअरटेलनं या कालावधीत 9.82 लाख मोबाइल यूझर्स मिळवलेत.
व्हीनं गमावले 12 लाख ग्राहक
ट्रायने जी आकडेवारी जारी केलीय, त्या मार्चच्या एकूण परिस्थितीवर नजर टाकल्यास असं दिसतं, की मार्चमध्ये 12.12 लाख मोबाइल ग्राहकांनी व्होडाफोन-आयडियाची सेवा सोडली. मार्चमध्ये व्होडाफोन आयडियाच्या मोबाइल ग्राहकांची संख्या 23.79 कोटींवरून घटून 23.67 कोटीपर्यंत कमी झाली आहे. तर ब्रॉडबँड ग्राहकांच्या संख्येत 0.86 टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आलीय.
ब्रॉडबँड शेअरमध्येही जिओ अव्वल
टॉप ब्रॉडबँड प्रोव्हायडर्समध्येही रिलायन्स जिओनं आघाडी घेतलीय. मार्च 2023च्या शेवटी एकूण टेलिफोन ग्राहकांची संख्या वाढून जवळपास 1,172.84 मिलियन म्हणजेच 117.2 कोटींपर्यंत वाढलीय. ही 0.21 टक्के मासिक वाढ नोंदवते. आता प्रत्येक दूरसंचार कंपन्यांच्या ब्रॉडबँड ग्राहकसंख्येवर एक नजर टाकू... (कंपनी आणि ग्राहकसंख्या-कोटींमध्ये)
- रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड - 43.85 कोटी
- भारती एअरटेल - 24.19 कोटी
- व्होडाफोन आयडिया - 12.48 कोटी
ग्राहकवाढ आणि घट - कारणं
- जिओ - रिलायन्स जिओच्या ग्राहकसंख्येत वाढ होण्याचं सर्वात महत्त्वाचं कारणं म्हणजे नेटवर्कची उपलब्धता. जिओनं आपलं नेटवर्क जाळं वेगात पसरवलं आहे. त्या मुळेबहुतांश ठिकाणी नेटवर्क विक असल्याचा मनस्ताप ग्राहकांना होत नाही.
- सध्या इंटरनेटचा सर्वाधिक वापर होतोय. अशावेळी इंटरनेटला स्पीड नसेल तर अशा सेवेला ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे जिओनं हाय-स्पीड नेटवर्क देऊन ग्राहकांना आपल्याकडे खेचलं आहे.
- जिओचे रिचार्ज तुलनेनं स्वस्त आहेत. इतर प्रतिस्पर्धी विशेषत: एअरटेल आणि व्ही (व्होडाफोन आयडिया) यांचे रिचार्ज प्लान जिओपेक्षा काहीसे महाग पडतात. शिवाय इतर अनेक मुद्देही ग्राहक विचाराच घेतात. त्यामुळे सध्यातरी जिओ हीच अव्वल दूरसंचार कंपनी आहे.
व्ही आणि एअरटेल
एअरटेलनं नवे ग्राहक तर जोडले मात्र ही ग्राहकसंख्या टिकवून ठेवणं एअरटेलसाठी आव्हानात्मक आहे. कारण एअरटेल आणि जिओचे रिचार्ज प्लान बहुतांशी सारखे असले तरी नेटवर्कच्या बाबतीत एअरटेलपेक्षा जिओ प्रचंड पुढे चालत आहे. त्यामुळे आगामी काळात कोण अधिक ग्राहकसंख्या गाठतो, हे पाहणं महत्त्वाचं असेल. दुसरीकडे आपल्या सुमार नेटवर्कमुळे व्हीची अवस्था नकारात्मक होताना दिसतेय. दूरसंचार कंपन्यांसाठी नेटवर्क हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो. मात्र यातच व्ही अपयशी ठरलीय. शिवाय इतर सर्वच कंपन्यांपेक्षा व्हीचे रिचार्ज प्लान अत्यंत महागडे आहेत. याचा थेट परिणाम ग्राहकसंख्येवर होतोय. कंपनीनं 99 रुपयांचा प्लान, रोलओव्हर डाटा अशा काही सेवा कंपनीनं ग्राहकसंख्या टिकवण्यासाठी सुरू केल्या. मात्र नेटवर्कची स्थिती अत्यंत बिकट असल्यानं ग्राहक व्हीची साथ सोडत आहेत.