Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Google Pay: गुगल पे वर RuPay क्रेडिट कार्ड लिंक करता येणार; क्रेडिट कार्डद्वारे करा UPI पेमेंट

Google Pay

गुगल पे ला आता RuPay क्रेडिट कार्ड लिंक करता येणार आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी ऑनलाइन व्यवहार करणं आणखी सोपं झालं आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियासोबत (NPCI) मिळून गुगल पे ने ही सुविधा सुरू केली आहे. ज्या दुकानांवर क्रेडिट कार्ड स्वीकारले जाते तेथे रुपे क्रेडिट कार्डद्वारे युपीआय पेमेंट करता येईल.

Google Pay: गुगल पे ला आता RuPay क्रेडिट कार्ड लिंक करता येणार आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी ऑनलाइन व्यवहार करणं आणखी सोपं झालं आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियासोबत (NPCI) मिळून गुगल पे ने ही सुविधा सुरू केली आहे. ज्या दुकांनांवर क्रेडिट कार्ड स्वीकारले जाते तेथे रुपे क्रेडिट कार्डद्वारे युपीआय पेमेंट करता येईल.

कोणत्या बँकचे रुपे कार्ड लिंक करता येईल

ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही मोडद्वारे रुपे क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करता येईल. अॅक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, एचडीएफसी बँक, इंडियन बँक, कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया या बँकांचे रुपे क्रेडिट कार्ड गुगल पे शी लिंक करता येईल. भविष्यात इतर बँकांच्या क्रेडिट कार्डला सुद्धा लिंक करता येऊ शकते. मात्र, अद्याप वर नमूद केलेल्या बँकांच्या क्रेडिट कार्डलाच लिंक करता येईल.

या सुविधेमुळे ग्राहकांना पेमेंट करताना जास्त पर्याय तसेच सुलभ रीतीने पेमेंट करता येईल. भारतात डिजिटिल पेमेंटची संख्या वाढण्यास यामुळे मदत होईल, असे गुगल पे प्रॉडक्ट मॅनेजर शरथ बुलुसू यांनी म्हटले.

रुपे क्रेडिट कार्ड गुगल पे वर कसे लिंक कराल?

"RuPay credit card on UPI" या पर्यायावर क्लिक करा.
ज्या बँकेने क्रेडिट कार्ड इश्यू केले आहे त्या बँकेचे नाव सिलेक्ट करा.
कार्डवरील सर्व माहिती अॅड करा. 
त्यानंतर ग्राहकाला कार्डवरील शेवटचे सहा अंक टाकून युनिक UPI PIN सेट करावा लागेल.  
UPI PIN सेट करताना बँकेकडून ओटीपी येईल तो निर्दिष्ट (अॅड) करा.  

युपीआयद्वारे होणाऱ्या व्यवहारांची संख्या वाढली

जून 2022 पासून रुपे क्रेडिट कार्ड युपीआय प्लॅटफॉर्मशी लिंक करता येईल, असा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतला आहे. मागील काही महिन्यांमध्ये देशातील युपीआय द्वारे होणाऱ्या व्यवहारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मार्च महिन्यात साडेआठशे कोटींपेक्षा जास्त व्यवहार युपीआयद्वारे झाले. 

2022 वर्षात विक्रमी व्यवहार 

2022 वर्षात सात हजार चारशे कोटींचे युपीआय व्यवहार पार पडले. या एकूण व्यवहारांची किंमत  125.94 ट्रिलियन रुपये एवढी होती.