Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SEBI penalty on 3 Entities : 'या' कंपन्यांमध्ये तुमचे शेअर्स आहेत का? सेबीनं ठोठावला 41 लाखांचा दंड, वाचा...

SEBI penalty on 3 Entities : 'या' कंपन्यांमध्ये तुमचे शेअर्स आहेत का? सेबीनं ठोठावला 41 लाखांचा दंड, वाचा...

SEBI penalty on 3 Entities : भांडवली बाजार नियामक सेबीनं गैरव्यवहार प्रकरणी तीन संस्थांवर कारवाई केलीय. या तीन संस्थांना मिळून 41 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. नियमांचं उल्लंघन केल्याचं सेबीनं आपल्या आदेशात म्हटलंय.

सेबीनं (Securities and Exchange Board of India) एकूण 3 संस्थावर दंडात्मक कारवाई केलीय. यासंबंधीच्या आदेशात सेबीनं म्हटलं, की आल्प्स मोटर फायनान्स लिमिटेडनं (Alps Motor Finance Ltd-AMFL) नियमाचं उल्लघंन केलंय. याशिवाय ब्रिजकिशोर सबरवाल आणि हिमांशू अग्रवाल यांनादेखील दंड ठोठावण्यात आलाय. नियमाच्या उल्लंघनप्रकरणी ब्रिजकिशोर सबरवाल यांना 20 लाख, हिमांशू अग्रवाल यांना 15 लाख रुपये  तर आल्प्स मोटर फायनान्स लिमिटेडला 6 लाख रुपयांचा दंड करण्यात आलाय. एकूण 41 लाख रुपयांच्या दंडाची आकारणी सेबीतर्फे करण्यात आलीय. झी बिझनेसनं हे वृत्त दिलंय.

जून-ऑगस्ट 2013मधले व्यवहार

प्रेफेन्शिअल अलॉटमेंट्सच्या प्रक्रियेचा संभाव्य गैरवापर झाला होता. या प्रकरणाचा तपास सेबीनं केला. पूर्ण तपास आणि चौकशीअंती सेबीनं यासंदर्भातला निर्णय दिलाय. आल्प्स मोटर फायनान्स लिमिटेडनं जून-ऑगस्ट 2013मध्ये 6 प्रेफेन्शिअल अलॉटमेंट्स केले होते. त्याच कालावधीसाठी सेबीनं त्यांची तपासणी केली.

चौकशीदरम्यान आढळला गैरकारभार

सेबीचे अधिकारी अमित कपूर यांना चौकशीदरम्यान काही बाबी आढळल्या. त्यानंतर त्यांनी आपल्या आदेशात म्हटलं, की ज्यावेळी कंपनीनं कर्जाचे प्राधान्य वाटप आणि वितरण प्रक्रिया केली होती, त्यावेळी सबरवाल आणि अग्रवाल हे कंपनीचे संचालक होते. तसंच बँक खात्यावर स्वाक्षरीही करणारे होते. वाटपाची रक्कम प्राप्त झाली आणि ज्यातून कर्ज वितरित केले गेले. त्यावर ते स्वाक्षरी करणार होते.

भागधारकांना कंपनीच्या नफ्याविषयी माहिती नाही

आल्प्स मोटर फायनान्स, सबरवाल आणि अग्रवाल हे पीएफयूटीपी (Prohibition of Fraudulent and Unfair Trade Practices) नियमांसाठी जबाबदार असल्याचं सेबीनं म्हटलंय. पुढे एएमएफएल (AMFL) त्रैमासिक आधारावर एक्स्चेंजला स्टेटमेंट सादर करण्यात त्यांना अपयश आलं होतं, ज्यामध्ये हे सांगण्यात आलं होते, की ज्या पद्धतीनं प्रेफेन्शिअल इश्यूची रक्कम वितरित करण्यात आली होती त्यामुळे नुकसान सोसावं लागलं होतं. याच कारणामुळे कंपनीच्या भागधारकांना कंपनीच्या नफ्याविषयी महत्त्वाची माहितीदेखील मिळू शकली नागी.

एएमएफएलवर आरोप

एसीआरए (Securities Contracts Regulations Act) अंतर्गत लिस्टिंग अ‍ॅग्रिमेंटच्या तरतुदींचं पालन करण्यात त्यांना अपयश आलंय. एसीआरएअंतर्गत लिस्टिंग अ‍ॅग्रिमेंट आता सेबी LORD (Listing Obligations and Disclosure Requirements) या नियमांतर्गत येतं. दरम्यान, नियमाचा भंग केल्याप्रकरणी ही कारवाई झाल्यानंतर या कंपन्यांमध्ये शेअर्स असणाऱ्यांनी अधिक सावधानता बाळगण्याचं सेबीनं सांगितलंय.

सेबीचा कारवाईचा धडाका

सेबीनं याआधीही विविध संस्थांवर नियमाचा भंग केल्याप्रकरणी कारवाई केली होती. याच महिन्यात मागच्या आठवड्यात जवळपास 11 संस्थांवर कारवाई करून 55 लाखांचा दंड ठोठावला होता. त्याआधी चुकीचा व्यवहार करणाऱ्या 5 संस्थांना दंड ठोठावला होता. त्यातल्या एका संस्थेवर 6 महिन्यांची बंदीही घातली होती. मे महिन्याच्या सुरुवातीला 7 कंपन्या ज्या चुकीचं ट्रेडिंग करत होत्या, त्यांना 35 लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता. त्यामुळे आता येणाऱ्या काळातही सेबी नियमभंग करणाऱ्या संस्थांवर लक्ष ठेवून असणार आहे.