CIL Employees Salary Increment By 25 Percent : कोल इंडिया या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने, 2.8 लाख गैर-कार्यकारी कर्मचार्यांसह वेतन सुधारणा करार केला आहे. या करारानंतर कंपनी कर्मचाऱ्यांच्या पगारात प्रचंड वाढ होणार असल्याचे, कोल इंडियाच्या वतीने सांगण्यात आले आहे. यामध्ये 1 जुलै 2021 पासून वेतनावरील 19 टक्के किमान हमी लाभ आणि गैर-कार्यकारी कामगारांना भत्त्यांमध्ये 25 टक्के वाढ मंजूर करण्यात आली आहे.
भत्त्यांमध्ये 25 टक्के वाढ मंजूर
सरकारी खाण कामगार, कोल इंडिया लिमिटेड (सीआयएल) ने सोमवारी सांगितले की, मजुरी सुधारण्याबाबत त्यांनी आपल्या 2.38 लाख गैर-कार्यकारी कामगारांशी (Strong Non-Executive Workers) करार केला आहे. झालेल्या करारानुसार, 1 जुलै 2021 पासून वेतनावर (मूलभूत, VDA, SDA आणि उपस्थिती बोनस) 19 टक्के किमान हमी लाभ आणि भत्त्यांमध्ये 25 टक्के वाढ मंजूर करण्यात आली आहे, असे कोल इंडियाने म्हटले आहे.
5 वर्षांसाठी वेतन वाढीचा करार
या कराराअंतर्गत, 1 जुलै 2021 पासून मूळ वेतनासह, परिवर्तनशील महागाई भत्ता, विशेष कार्य भत्ता आणि बोनसवर 19 टक्के किमान लाभ देण्यात आला आहे. आणि गैर-कार्यकारी कामगारांच्या भत्त्यांमध्ये 25 टक्क्यांनी वाढ केलेली आहे. तसेच कोळसा उद्योगासाठी संयुक्त समिती (JBCCI)-11 ने राष्ट्रीय कोळसा वेतन सेटलमेंटला पाच वर्षांसाठी मान्यता दिली आहे. कोल इंडियाच्या कर्मचार्यांपैकी 94 टक्के नॉन-एक्झिक्युटिव्ह कामगारांचे वेतन दर पाच वर्षांनी सुधारित केले जाते.
2.81 लाख कर्मचाऱ्यांना फायदा
संयुक्त समिती (JBCCI)-11 मध्ये, CIL व्यवस्थापन, सिंगारेनी कॉलीरीज कंपनी लिमिटेड (SCCL), पाच केंद्रीय कामगार संघटना (BMS, HMS, AITUC, CITU आणि इंडियन नॅशनल माइन वर्कर्स फेडरेशन (INMF) यांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. वेतन सेटलमेंट 1 जुलै 2021 पासून लागू होईल. या कराराचा CIL आणि SCCL च्या सुमारे 2.81 लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.
मात्र 1 जुलै 2021 पासून थकीत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारातील वाढ कधी मिळणार ? आणि थकबाकीसह लागू करण्यात आलेली नविन पगारवाढ कधी मिळणार? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती कंपनीकडून अद्याप देण्यात आलेली नाही. परंतु, कर्मचाऱ्यांना त्यांच्या जूनच्या पगारासह हे पैसे मिळतील, अशी अपेक्षा आहे.