Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Online Fraud Alert: दुकानदारांना मोबाईल नंबर देऊ नका! ऑनलाइन घोटाळे रोखण्यासाठी सरकारने उचलेले ‘हे’ पाऊल

ग्राहकांची इच्छा नसेल तर दुकानदार जबरदस्तीने त्यांचे मोबाईल क्रमांक आणि इतर खासगी माहिती घेऊ शकत नाही असे ग्राहक व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे. मंत्रालयाने CII, FICCI आणि ASSOCHAM ला याबाबत लेखी कळवले असून यापुढे ग्राहकांनी दुकानदारांना मोबाईल क्रमांक देऊ नये असे म्हटले आहे.

Read More

US Debt Crisis: अमेरिकेला कर्जाचा विळखा, भारतावर काय परिणाम होणार

US Debt Crisis: डेब्ट सिलिंग (Debt Ceiling) अर्थात सरकार किती पैसे कर्ज घेऊ शकते याची निश्चित केलेली कमाल मर्यादा आहे. वर्ष 2009 नंतर अमेरिकेवरील कर्ज तीनपटीने वाढले आहे. आजच्या अमेरिकेवर 31.4 ट्रिलियन डॉलर्सचे कर्ज आहे.वर्ष 2001 पासून अमेरिकेला दरवर्षी किमान 1 ट्रिलियन डॉलर्सची तूट सहन करावी लागत आहे. ज्यामुळे मागील काही वर्षात कर्जाचा डोंगर झपाट्याने वाढला आहे.

Read More

RTO challan Payment: तुमच्या गाडीवर कुठले चलन तर नाही ना? ऑनलाईन चेक करा आणि ऑनलाईनच भरा

खरे तर गाडीचा वापर करणाऱ्या आपण सर्वानीच दर महिन्याला आपण कुठली वाहतुकीचे नियम प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे तोडले तर नाही ना याची खातरजमा केली पाहिजे. पूर्वी, तुमच्या वाहनावरील दंड तपासण्यासाठी वाहतूक पोलिस स्टेशन किंवा प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (RTO) भेट द्यावी लागत असे. परंतु डिजिटल युगा आपल्या कार किंवा बाईकवर असलेला दंड ऑनलाइन तपासणे शक्य झाले आहे.

Read More

Goonj Fellowship : गुंज फेलोशिपच्या माध्यमातून मिळवू शकता, दरमहा 20 हजार रुपयांपर्यंत मानधन

Goonj Fellowship : गुंज फेलोशिप ही 1 वर्षाच्या कालावधीसाठी आहे. यात दोन फेलोशिप आहेत, गुंज अर्बन फेलोशिप आणि ग्रासरूट फेलोशिप. या फेलोशिपसाथी अर्ज करणारा तरूण पदवीधर असणे आवश्यक आहे. ही फेलोशिप फक्त भारतीय नागरिकांना दिली जाते. या फेलोशिपबाबत अधिक माहिती जाणून घेऊया...

Read More

Government E Marketplace: सरकारी कार्यालयातील सामान खरेदी कुठून होते माहितीये? जाणून घ्या

Government E Marketplace ही खास सरकारी ई-कॉमर्स वेबसाईट ऑगस्ट 2016 साली सुरु केली आहे. सरकारी कार्यालयांसाठी आवश्यक असलेले सर्व सामान येथे उपलब्ध आहे. अगदी डिंकापासून कॉम्प्युटरपर्यंत सर्व सामान एका क्लिकवर खरेदी करण्याची सुविधा या ई-कॉमर्स वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Read More

Rajiv Singh Networth: रिअल इस्टेट क्षेत्रातील किंग! DLF चेअरमन राजीव सिंग यांची नेटवर्थ जाणून घ्या

भारतातील रिअल इस्टेट क्षेत्रातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणजे राजीव सिंग. ते डीएलएफ कंपनीचे प्रमुख असून त्यांची नेटवर्थ 59,030 कोटी रुपये आहे. रिअल इस्टेट सोबतच इतरही अनेक क्षेत्रात DLF कंपनीने पाय रोवला आहे. भारतातील टॉप टेन रिअल इस्टेट बिझनेसमन कोण आहेत ते सुद्धा या लेखातून जाणून घ्या.

Read More

Medicine Strip: मेडिकलमधून खरेदी करता येणार हव्या तितक्याच गोळ्या, संपूर्ण स्ट्रिप खरेदीची गरज नाही!

National Consumer Helpline वर टॅब्लेट किंवा कॅप्सूलची संपूर्ण स्ट्रिप खरेदी करण्याचा आग्रह केमिस्ट करत असल्याच्या असंख्य तक्रारी देशभरातून येत आहेत. ग्राहकांचे नुकसान होऊ नये आणि केमिस्ट देखील आश्वस्त राहतील असा तोडगा काढण्याठी सरकार सध्या प्रयत्नशील आहे. यावर प्राथमिक स्वरूपात काही पर्याय उपलब्ध असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनीच सांगितले आहे...

Read More

Meta Layoff: फेसबुकच्या मेटा कंपनीमध्ये तिसऱ्यांदा नोकरकपात; 10,000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात

Meta Layoff: फेसबुक, व्हॉट्स ॲप आणि इंस्टाग्रामची मूळ कंपनी 'मेटा'ने यापूर्वी दोनदा कर्मचारी कपात केली आहे. त्यानंतर आता कंपनीने तिसऱ्यांदा नोकरकपात सुरू केली असून यामुळे 10,000 कर्मचाऱ्यांना नोकऱ्या गमवाव्या लागतील, असे बोलले जाते.

Read More

Shopping bill : शॉपिंग बिलाच्या बाबतीत ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडून नवीन नियम होणार लागू

Mobile number for bill : देशभरात शॉपिंगचे नियम बदलले. आता दुकानदारांना ग्राहकांचा मोबाइल नंबर घेता येणार नाही. ग्राहक गुन्हा दाखल करू शकतात.

Read More

America Economic Crisis: जागतिक महासत्ता अर्थसंकटात; पाकिस्तानच्या अगोदरच अमेरिकेचं दिवाळं निघणार का?

US Debt Ceiling Crisis:अमेरिका सध्या महागाई आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबला असून अमेरिकेवर दिवाळखोरीचं संकट घोंगावत आहे. हे संकट लवकरात लवकर दूर झाले नाही तर येत्या 1 जून पर्यंत अमेरिका दिवाळखोरीत सापडू शकते, असा इशारा अर्थतज्ज्ञांनी दिला आहे.

Read More

UPI payments : लोकांनी एटीएममध्ये जाणं केलं बंद! यूपीआयवरूनच होतायत व्यवहार; एसबीआयच्या अहवालात काय?

UPI payments : पैशांची गरज असताना आता लोक एटीएममध्ये जाणं टाळताना दिसून येत आहेत. यूपीआय हाच सर्वांसाठी आता सोपा पर्याय बनत चाललाय. नोटाबंदीच्या नंतर खऱ्या अर्थानं यूपीआय पेमेंट व्यवहारांना चालना मिळाली. नेमकी काय स्थिती आहे, एसबीआयनं यासंदर्भात एक अहवाल दिलाय.

Read More

Australian Universities: ऑस्ट्रेलियातील आणखी दोन विद्यापीठांत भारतीय विद्यार्थ्यांना प्रवेशास बंदी; काय आहे कारण?

भारतातील काही ठराविक राज्यातील विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियातील दोन नामांकित विद्यापीठांनी प्रवेश घेण्यास बंदी घातली आहे. व्हिक्टोरिया शहरातील फेडरल युनिव्हर्सिटी आणि वेल्स शहरातील वेस्टर्न सिडनी विद्यापीठाने पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. मागील महिन्यातही काही ऑस्ट्रेलियन विद्यापीठांनी बंदी घातली होती.

Read More