Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

2000 Note: 30 सप्टेंबरनंतर 2000 च्या नोटांचे काय होईल, RBI गव्हर्नरांनी दिले स्पष्टीकरण...

RBI ने देशभरातील बँकांना पत्र लिहून सामान्य नागरिकांना नोटा बदलण्यासाठी किंवा पैसे भरण्यासाठी कुठलीही अडचण येऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच 30 सप्टेंबर पर्यंत नागरिकांना पैसे बदलता येणार असल्याचे देखील सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी नोटा बदलण्यासाठी घाई करू नये, असे आवाहन आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नागरिकांना केले आहे.

Read More

2000 Note: दोन हजारांच्या नोटा बदलून घेण्यासाठी सोने आणि डॉलरची चढ्यादराने खरेदी; 10 ग्रॅम सोन्यासाठी 70 हजार रुपये दर

2000 Note: ज्यांच्याकडे दोन हजार रुपयांच्या नोटा मोठ्या प्रमाणात आहे; किंवा गैरमार्गाने त्यांनी मोठ्या प्रमाणात त्याचा साठा केला आहे; अशा लोकांना बँकेतून या नोटा बदलून घेताना अडचण येऊ शकते. म्हणून असे ग्राहक बाजारातून रोख पैसे देऊन सोने किंवा डॉलर विकत घेण्याचा पर्याय स्वीकारत आहेत.

Read More

SBI on 2000 Note: एसबीआय बॅंकेतून 2000 रुपयांची नोट बदलून घेताना पॅनकार्ड, आधारकार्ड लागणार का?

SBI on 2000 Note: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी (दि. 19 मे) 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. या नोटा ग्राहकांना मंगळवारपासून बँकांमधून एक्सचेंज करून घेता येणार आहेत. पण 2000 हजार रुपयांच्या नोटा बदलून घेताना बँकांना काही पुरावा द्यावा लागणार का? याबाबत सर्वसामान्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.

Read More

Amravati Market: अमरावतीमधील फळे आणि भाजीपाला मार्केटची वार्षिक उलाढाल 15 कोटींवर

Amravati Market: विदर्भातील अमरावती शहर 'अंबानगरी' म्हणून ओळखले जाते. विदर्भातील सर्वात मोठे कपडा मार्केट इथे आहे. बिझीलँड, सिटीलँड हे इथले सर्वात मोठे कपडा मार्केट आहे. कपडा मार्केटबरोबरच अमरावतीमध्ये भाजीपाला आणि फळ मार्केटसुद्धा आहे. या मार्केटमध्येही कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.

Read More

2000 Notes withdrawn : 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढल्यानंतर अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार का?

2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढण्याचा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) निर्णयाचा अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम होणार नाही कारण अशाप्रकारच्या अनेक भारतीय चलनी नोटा याआधी देखील चलनातून बाद झाल्या आहेत.या बाद झालेल्या नोटांच्या जागी दुसऱ्या नोटा येतील, त्यामुळे थेट अर्थव्यवस्थेवर याचा परिणाम होणार नाही असे स्पष्ट मत नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष अरविंद पनगरिया यांनी नोंदवले आहे.

Read More

Airfare Hike: महाग विमान प्रवासामुळे नागरिक हैराण, भाडे नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारच्या एयरलाईन्सला सूचना

सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु असून अनेक लोक देशांतर्गत प्रवास करत आहेत. ऐन सुट्ट्यांच्या काळात प्रवासखर्च वाढल्याने ग्राहकांनी नागरी उड्डाण मंत्रालयाकडे तक्रारी नोंदवलेल्या होत्या. तसेच अनेकांनी सोशल मिडीयावर देखील याबद्दल लिहून नाराजी व्यक्त केली होती.

Read More

2000 Note: पेट्रोल पंपावर 2000 रुपयांची नोट वापराल तर पॅनकार्ड द्यावे लागेल? पेट्रोल पंप डिलर्सची सावध भूमिका

2000 Note: रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र 30 सप्टेंबर 2023 पर्यंत ही नोट चलनात आर्थिक व्यवहारांसाठी वैध राहणार आहे. यामुळे ज्या नागरिकांकडे 2000 रुपयांची नोट आहे त्यांना बँकेतून बदलून घेता येईल किंवा ती खर्च केली तर ती वैध राहणार आहे.

Read More

Meta Layoff: फेसबुकची मूळ कंपनी मेटा पुन्हा करणार कर्मचारी कपात, 6000 कर्मचारी होणार कमी

Facebooks Parent Company Meta: जागतिक बाजारपेठेतील मंदीमुळे आयटी क्षेत्रातील मोठ मोठ्या कंपनी, गेल्या वर्षभरापासून सातत्याने कर्मचाऱ्यांची संख्या कमी करत आहे. आता फेसबुकची मूळ कंपनी मेटाने पुन्हा 6000 कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याची घोषणा केली आहे.

Read More

RBI Withdrawn 2000 Note: बँकेत एका वेळी 2000 च्या केवळ 10 नोटा एक्सचेंज करून मिळणार!

RBI Withdrawn 2000 Note: रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे 2 हजार रुपयांच्या नोटा आहेत. ते बँकेतून एक्सचेंज करून घेऊ शकतात. पण सध्या आरबीआयच्या निर्णयानुसार, बँकेत एकाचवेळी 2000 रुपयांच्या फक्त 10 नोटा एक्सचेंज करून मिळणार आहेत.

Read More

2000 Note: किती नोटा बदलता येणार? ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त रक्कम झाल्यास काय करावं?

2000 Notes : आरबीआयनं 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. 30 सप्टेंबरपर्यंत या नोटा बँकेत जमा करायच्या आहेत. आता ज्यांच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत, त्यांची मात्र लगबग सुरू झालीय. तुमच्याकडेदेखील 2000 रुपयांची नोट असेल तर ती लवकर बँकेत जमा करावी.

Read More

2000 Note : बँकेने तुमची 2000 रुपयांची नोट घेण्यास नकार दिला तर, 'इथे' करू शकता तक्रार

2000 Note : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की आरबीआयच्या 19 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा इतर मूल्यांच्या चलनात बदलल्या जाऊ शकतात. अशातच जर बँकेने तुमची 2000 रुपयाची नोट घेण्यास नकार दिला तर कराल? जाणून घेऊया, काय सांगतो नियम.

Read More

2000 Note Memes: RBI च्या घोषणेनंतर 2000 च्या नोटेबाबत सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

Reserve Bank of Indian ने 2000 रुपयांच्या नोटा आता चलनातून बाद केल्या जाणार आहेत असे काल जाहीर केले. त्यानंतर या निर्णयानंतर काल रात्रीपासून सोशल मिडीयावर अफलातून अशा मिम्सचा पाऊस पडताना दिसतो आहे. यात सामान्य नागरिक आणि राजकीय पक्ष देखील सामील आहेत हे विशेष. चला तर पाहूयात असेच काही प्रातिनिधिक मिम्स...

Read More