Solar stove : आजच्या काळात स्वयंपाक करायचा असल्यास सर्वात आधी आपल्या डोळ्यासमोर गॅस येतो. काही वर्षापूर्वी स्त्रिया चुलीवर स्वयंपाक करत होत्या, पण आता सर्व सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. ओव्हन, इंडक्शन स्टोव्ह इत्यादी बर्याच प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक गोष्टी बाजारात आता उपलब्ध आहेत. पण सर्वाधिक वापरले जाणारे साधन म्हणजे गॅस. आता गॅसच्या किमतीमध्ये भरपूर वाढ झाली आहे. त्यामुळे त्याला ऑप्शनमध्ये सोलर स्टोव्हचा वापर तुम्ही करू शकता. जाणून घ्या सोलर स्टोव्हची किंमत किती?
सोलर स्टोव्हची वैशिष्टे
इंडियन ऑयल कॉरपोरेशन हा सौर स्टोव्ह सुरू केला आहे, जो सौर उर्जेने चालणार आहे, म्हणजेच त्यात गॅस नसून सूर्याच्या किरणांवर स्टोव्ह चालणार आहे. या स्टोव्हचे नाव 'न्युटन चुला' आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या स्टोव्हला रिचार्ज करता येऊ शकते. हिवाळ्यात अनेकदा सूर्यप्रकाश कमी जास्त होतो. त्यामुळे रिचार्ज करून ठेवल्यास कधीही तो वापरता येऊ शकतो.
सोलर स्टोव्ह आपल्या स्वयंपाकघरात ठेवता येऊ शकतो. हा स्टोव्ह केबल वायरद्वारे सोलर प्लेटशी जोडलेला आहे आणि ही सोलर प्लेट छतावर ठेवली आहे. मग ही सौर प्लेट उर्जा तयार करते आणि केबलद्वारे स्टोव्हवर पोहचवते. हा सोलर स्टोव्ह एकदा चार्ज करून तुम्ही 3 वेळा अन्न शिजवण्यासाठी वापरू शकता. आतापर्यंत आलेले सोलर स्टोव्ह हे उन्हात ठेवून काम करत होते. पण, इंडियन ऑइलने हा स्टोव्ह विकसित केला आहे. या सोलर स्टोव्हमुळे देशातील सर्वसामान्य जनतेचे 7 वर्षात 1 लाख कोटी रुपयांची बचत होऊ शकते. या स्टोव्हचे वैशिष्टे म्हणजे रात्रीच्या वेळी सुद्धा तुम्ही यात अन्न शिजवू शकता.
सोलर स्टोव्हची किंमत किती असेल?
हा सोलर स्टोव्ह मार्केटमध्ये तुम्हाला 15 ते 30 हजार रुपयांना मिळेल. मात्र या सौर स्टोव्हवर शासन अनुदानही उपलब्ध करून देत आहे. जर तुम्ही सबसिडीवर सोलर स्टोव्ह घेतला, तर सबसिडीनंतर तुम्हाला हा सोलर स्टोव्ह 10 हजार रुपयांपर्यंत मिळू शकतो. हा सोलर स्टोव्ह बसवल्यानंतर तुम्ही गॅसशिवाय अन्न सहज शिजवू शकता. हा स्टोव्ह हायब्रिड मोडवर देखील काम करतो. म्हणजेच या स्टोव्हमध्ये सौरऊर्जेशिवाय विजेचे इतर स्रोतही वापरता येतात.