Ram Charan And Upasana's Baby: अभिनेता रामचरण आणि त्याची पत्नी उपासना यांच्या करीता हे वर्ष फार लकी ठरलं आहे. याचे कारण म्हणजे सर्व प्रथम RRR च्या नाटू चित्रपटाला मिळालेला ऑस्कर पुरस्कार आणि दुसरे कारण म्हणजे 20 जून रोजी या दामपत्याला कन्यारत्न प्राप्त झाले. या दामपत्यावर अनेक सेलिब्रिटी आणि करोडो चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला. तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी रामचरण यांना मुलीसाठी सोन्याचा पाळणा गिफ्ट दिला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
Table of contents [Show]
ट्विटरवर दिली माहिती
अभिनेता राम चरण आणि त्याची पत्नी उपासना कोनिडेला यांनी शुक्रवारी मुलीचे नाव क्लिन कारा कोनिडेला ठेवले आहे. बाळाच्या नामकरण समारंभातील काही कौटुंबिक छायाचित्रे ट्विटरवर शेअर करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अब्जाधीश मुकेश अंबानी यांनी आपल्या कुटुंबासह लहान मुलीला सोन्याचा पाळणा भेट दिला आहे, ज्याची किंमत 1 कोटी रुपये आहे.
रामचरणच्या मुलीच्या नावाचा अर्थ काय?
अभिनेता रामचरणने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, चेंचू आदिवासी देवी - भवरम्मा देवी यांच्या आशीर्वादाने आम्ही आमच्या लाडक्या मुलीची ओळख करून देतो. क्लिन कारा कोनिडेला, ललिता सहस्रनाम यावरून घेतलेले नाव- हे एक परिवर्तनात्मक शुद्धीकरण उर्जेचे प्रतीक आहे, ज्यामुळे आध्यात्मिक जागृति होते.
कुटुंबातील व्यक्तींची हजेरी
अनेक वर्षे एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर राम चरण आणि उपासना यांनी २०१२ मध्ये लग्न केले. 10 वर्षांनंतर मुलीच्या जन्माने कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये राम चरणचे आई-वडील चिरंजीवी आणि सुरेखा तर उपासनाचे आई-वडील शोभना आणि अनिल दिसत आहेत.
पाळण्याची किंमत 1 कोटी रुपये
मुकेश अंबानी हे जगातील 14 वे आणि आशियातील पहिले सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत, ज्यांची नेट वर्थ फोर्ब्सनुसार $91.3 अब्ज आहे. अभिनेता राम चरण आणि त्याची पत्नी उपासना यांच्या मुलीला भेट म्हणून दिलेल्या सोन्याच्या पाळण्याची किंमत 1 कोटी रुपये असल्याचे सांगितल्या जात आहे.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            