Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Deepak Parekh: दिपक पारेख यांच्या 40 वर्षांच्या कारकिर्दीला विराम; HDFC च्या प्रमुख पदावरुन निवृत्तीची घोषणा

HDFC

Image Source : www.livemint.com

एचडीएफसीला मागील चाळीस वर्षांपासून पोटच्या मुलाप्रमाणे वाढवल्यानंतर दिपक पारेख यांनी निवृत्तीची घोषणा केली. शुक्रवारी त्यांनी 78 व्या वर्षी संचालक पदावरुन निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. भावनिक पत्र लिहून त्यांनी समभागधारकांशी शेवटचा संवाद साधला. एकत्रीकरणानंतर एचडीएफसी देशातील दुसऱ्या क्रमांकाची बलाढ्य कंपनी झाली आहे. यात दिपक पारेख यांचा मोलाचा वाटा आहे.

एचडीएफसीला मागील चाळीस वर्षांपासून पोटच्या मुलाप्रमाणे वाढवल्यानंतर दिपक पारेख यांनी संचालक पदाचा राजीनामा दिला. शुक्रवारी त्यांनी 78 व्या वर्षी संचालक पदावरुन निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. भावनिक पत्र लिहून त्यांनी समभागधारकांशी शेवटचा संवाद साधला. आता एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेचे एकत्रीकरण पूर्ण झाल्यामुळे शशी जगदीशन यांच्याकडे बँकेच्या प्रमुखपदाची जबाबदारी आली आहे.

लंडनमधील मोठ्या पगाराची नोकरी सोडून चुलते हसमुखभाई पारेख यांच्या आग्रहाखातर त्यांनी 1978 साली एचडीएफसी हाऊसिंग फायनान्स कंपनीत काम सुरू केले होते. दिपक पारेख यांचे चुलते हसमुखभाई पारेख यांना मुलबाळ नव्हते. दिपक पारेख यांना ते मुलाप्रमाणेच समजत. परदेशातील नोकरी सोडून भारतात येण्याचा आग्रह त्यांनी दिपक पारेख यांच्याकडे धरला होता. तेव्हापासून मागील 40 वर्षात एचडीएफसीला एका बलाढ्य कंपनी बनवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. विशेष म्हणजे एचडीएफसीमध्ये दिपक पारेख त्यांचे शेअर्स 1 टक्क्यांपेक्षा कमी आहे. एक कर्मचारी म्हणून त्यांनी एचडीएफसीमध्ये सचोटीने काम केले.

हाऊसिंग फायनान्सची भारतातील मुहूर्तमेढ

हसमुखभाई पारेख यांनी 1977 साली एचडीएफसी हाऊसिंग फायनान्स कंपनीची स्थापना केली. त्यांचे शिक्षण लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये झाले होते. ICICI बँकेच्या संचालक पदावरुन निवृत्त झाल्यानंतर त्यांनी एचडीएफसीची स्थापना केली होती. लंडनमध्ये शिक्षण घेत असताना हाऊसिंग लोनचा व्यवसाय त्यांच्या लक्षात आला. भारतामध्ये त्या वेळीस गृहकर्ज व्यवसाय अस्तित्वातच नव्हता. मात्र, हसमुखभाई पारेख यांनी या व्यवसायातील संधी ओळखली. HDFC सुरू केल्यानंतर त्यांनी दिपक पारेख त्यांना व्यवसाय सांभाळण्यासाठी भारतात बोलावले होते.

दिपक पारेख यांची कारकीर्द

दिपक पारेख यांची सचोटीने आणि विश्वासाने एचडीएफसीचा कारभार चालवला. व्यावसायिक मूल्य पाळल्याने जागतिक आर्थिक संकटातही एचडीएफसी तगून राहिली. जगात किंवा भारतात मंदी असो किंवा तेजी 20-25% दराने एचडीएफसीने प्रगती केली. 80 च्या दशकात भारतामध्ये मध्यमवर्गच अस्तित्वात नव्हता. तसेच राजकीय अस्थिरताही मोठ्या प्रमाणावर होती. अशा परिस्थितीत त्यांनी एचडीएफसीला मोठे केले. नंतरच्या काळात मध्यमवर्गीयांना मोठ्या प्रमाणात गृहकर्ज दिले. 

दिपक पारखे यांचे शिक्षण

मुंबईतील Sydenham College कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्यानंतर ते लंडनला चार्टंर अकाउंटंटचे शिक्षण घेण्यासाठी गेले. आताची E & Y या कंपनीतही त्यांनी काम केले. त्यानंतर Chase Manhattan Bank मध्येही त्यांनी नोकरी केली. 80 च्या दशकात जगभारत खनिज तेलाचा व्यापार वाढ असताना त्यांना आखाती देशात जाण्याची संधी आली होती. पगारही जास्त मिळत होता. मात्र, चुलते हसमुखभाई पारेख यांच्या आग्रहामुळे ते भारतात आले. निम्म्या पगारावर एचडीएफसीमध्ये जनरल मॅनेजर पदापासून त्यांनी कामास सुरूवात केली. त्यांच्या कारकीर्दीत एचडीएफसी बँक भारतातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी बनली.

गुंतवणुकदारांना भावनिक पत्र

दिपक पारेख यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर समभागधारकांना भावनिक पत्र लिहले. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, "आपल्या पुढ्यात काय वाढून ठेवलंय, हे येत्या काळात कळेल. सध्याच्या काळात व्यवसायात तगून राहणं आव्हानात्मक बनलं आहे. ज्या गोष्टींमुळे भुतकाळात व्यवसायाला फायदा झाला त्याचा फायदा भविष्यातही होईल, अशी आशा करतो. बदल घडवण्यासाठी धाडस लागते. त्यामुळे तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर येता. मात्र, बदलामुळे प्रगती करण्याच्या नव्या संधी मिळतात. एचडीएफसीच्या एकत्रीकरणामुळे भागधारकांवर कोणताही परिणाम होणार नाही".