MHADA lottery 2023: मुंबईत घर घेण्यासाठी म्हाडाच्या (Maharashtra Housing And Area Development Authority- MHADA) लॉटरीची नागरिक आतुरतेने वाट पाहत असतात. मे महिन्यात निघालेल्या लॉटरीसाठी सुमारे 1 लाख अर्ज जमा झाले आहेत. 4 हजार घरांसाठी ही लॉटरी निघणार आहे. म्हाडाद्वारे बनवण्यात येणाऱ्या घरांपैकी सुमारे 93% घरे आर्थिक कमकुवत आणि कमी उत्पन्न गटातील नागरिकांसाठी असतात.
1 घरासाठी 25 अर्ज
सुमारे एक लाख अर्ज आल्याने एका घरासाठी तब्बल 25 अर्जांचे प्रमाण आहे. त्यामुळे फक्त 4 हजार लकी अर्जदारांचं घराचं स्वप्न पूर्ण होईल. म्हाडाच्या घरांच्या किंमती 24 लाखांपासून पुढे सुरू होतात. 21 मे रोजी लॉटरी जाहीर झाली होती. तेव्हापासून सुमारे 1 लाख अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै आहे. 1 लाखापैकी सुमारे 70 हजार अर्जदारांनी Earnest money deposit (EMD) ठेवी जमा केल्या आहेत.
म्हाडाद्वारे आर्थिकदृष्या दुर्बल घटक (EWS), कमी उत्पन्न घटकांसाठी (LIG) सुमारे 93% घरे बांधण्यात येतात. तर मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गटासाठी उर्वरित घरे बांधण्यात येतात. म्हाडाच्या घरांच्या किंमती 24 लाखांपासून 7.5 कोटीपर्यंत आहेत. तर कार्पेट एरिया 204 स्केअर फूटपासून 1500 स्के. फूटपर्यंत आहे. म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करायचा असल्यास संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला या लिंकवर पाहायला मिळेल.
मुंबईत म्हाडाची घरे कुठे?
विक्रोळी, अॅनटॉप हील, गोरेगाव, दादर, वडाळा, अंधेरी, कांदिवली, मालाड, भायखळा, तारदेव, जुहू, चेंबूर, पवई, चांदिवली आणि सायन या भागात म्हाडाची अपार्टमेंट्स आहेत. मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गटांसाठी अपार्टमेंट्सचे बांधकाम सुरू असून येत्या काळात लॉटरी आणली जाईल, अशी माहिती म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
म्हाडाने दिलेल्या माहितीनुसार, सर्वात स्वस्तात घर 204 स्केअर फूटचे चांदिवली येथे 24.71 लाखांना मिळते. तर दक्षिण मुंबईतील तारदेव येथे 1,500 स्केअर फूटचे घर 7.57 कोटी रुपयांना मिळते.