Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

DG Loan Scheme : डीजी लोन सुविधेच्या माध्यमातून पोलिसांना मिळणार हक्काच्या घरासाठी कर्ज, जाणून घ्या डिटेल्स

DG Loan Scheme : पोलिसांचे वर्षानुवर्षे स्वस्त घराचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. पोलिसांना लवकरच स्वस्त आणि परवडणाऱ्या दरात घरे मिळतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना एकमताने सांगितले. त्याचबरोबर गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेली डीजी लोन सुविधा सुद्धा सुरू करण्यात आली.

Read More

गॅस इंधन तयार करण्यास आणि इतर गोष्टींवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकारने तयार केले 6000 कोटींचे बजेट

Coal Gasification: देशात कोळश्यापासून गॅस इंधन तयार करण्याच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार 6,000 कोटी रुपयांच्या योजनेचा विचार करत आहे. कोळश्यापासून गॅस इंधन निर्मिती केल्यास नैसर्गिक वायू, मिथेनॉल आणि इतर आवश्यक उत्पादनांच्या आयातीवरील अवलंबित्व कमी होईल आणि कोळसा क्षेत्रात क्रांती होईल अशी भूमिका सरकारने मांडली आहे.

Read More

Air Conditioner price down: पावसाची चाहूल लागताच एसीचे दर गडगडले, ऑफरनंतर आता ग्राहकांची झुंबड

Air Conditioner price down: पावसाची चाहूल लागल्यानंतर आता अनेक ठिकाणी गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे गारवा वाढवणारे एअर कंडिशनर काहीसे मागे पडले. मात्र आगामी उन्हाळा डोळ्यासमोर ठेऊन आताच त्याची खरेदी काही ठिकाणी जोरात सुरू झाली आहे. याला कारण भन्नाट आहे.

Read More

GST on Gaming: रिअल मनी गेम्सवरील 28% GST चा फेरविचार व्हावा; गेमिंग कंपन्यांची सरकारला विनंती

रिअल मनी गेम्सवरील 28% जीएसटी कमी करावा, अशी मागणी या क्षेत्रातील कंपन्यांनी सरकारकडे केली आहे. गेम्स क्राफ्ट, नझारा, MPL, AIGF, मोबाइल प्रिमियर लीग, विन्झो, पोकरबाझी, झुपी, अड्डा, क्रिक पे सह 130 कंपन्यांनी सरकारला पत्र लिहले आहे. सरकारने गेमिंग क्षेत्रातील कंपन्यांवर व्यवहार्य पद्धतीने कर आकारावा, असे पत्रात म्हटले आहे.

Read More

Pen business : पेन बनवण्याचा व्यवसाय कसा सुरू करायचा? किती खर्च येऊ शकतो? जाणून घ्या

Pen business : पेन हे असे प्रॉडक्ट आहे जे प्रत्येकजण वापरतो मग तो विद्यार्थी असो, शिक्षक असो, कार्यालयीन कर्मचारी असो किंवा इतर कोणीही असो, सर्वजण पेन वापरतात. त्यामुळे बाराही महिने पेनाची मागणी कायम असते. पेन बनवण्याच्या व्यवसायाची सुरुवात तुम्ही अगदी कमी पैशात करू शकता आणि चांगले उत्पन्न मिळवू शकता. जाणून घेऊया, पेन बनवण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किती खर्च लागतो?

Read More

Windfall Tax: पेट्रोलियम क्रूडवर केंद्र सरकार लावणार विंडफॉल टॅक्स, तेल कंपन्यांना झटका

भारतात पहिल्यांदा कच्च्या तेलाच्या उत्पादनांवर केंद्र सरकारने जुलै 2022 मध्ये विंडफॉल कर लागू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात पेट्रोल, डिझेल आणि एव्हिएशन टर्बाइन इंधन यांसारख्या उत्पादनांचाही समावेश होता. विंडफॉल प्रॉफिट टॅक्स म्हणजे ज्या तेल उत्पादक कंपन्या भारतात तेलावर प्रक्रिया करून देशाबाहेर विकतात आणि नफा कमावतात, त्या नफ्यावर लावलेला कर होय.

Read More

JSW Energy Q1 Results: वीज निर्माती कंपनी जेएसडब्ल्यु एनर्जीच्या नफ्यात जून तिमाहीत 'इतक्या' टक्क्यांची घट, वाचा सविस्तर

JSW Energy Q1 Results: खासगी क्षेत्रातील वीज उत्पादक कंपनी जेएसडब्ल्यु एनर्जीने शुक्रवारी जून तिमाहीतील कंपनीच्या नफ्याची माहिती जाहीर केली. या तिमाहीत कंपनीच्या नफ्यात घट झाली असून उत्पादन क्षमतेत वाढ झाली आहे. कंपनीच्या नफ्यात घट होण्याचे नेमके कारण काय? आणि ही घट किती झाली आहे, जाणून घेऊयात.

Read More

हे आहेत भारतातील टॉप 10 अब्जाधीश; यांचा व्यवसाय आणि संपत्ती माहित आहे का तुम्हाला?

top 10 richest people in India in 2023: फोर्ब्स द्वारे दरवर्षी श्रीमंत व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली जाते. यावर्षीची म्हणजेच 2023 ची भारतातील टॉप 10 श्रीमंत व्यक्तींची यादी फोर्ब्सने नुकतीच प्रसिद्ध केली आहे. त्याचबरोबर फोर्ब्सकडून रिअल टाईममध्ये जगातील टॉप 10 श्रीमंत व्यक्तींची नावे, त्यांची संपत्ती अपडेट केली जाते.

Read More

अदानी ग्रुप पुन्हा एकदा चर्चेत; मुंबईतील एका मोठ्या प्रोजेक्टला राज्य सरकारकडून मिळाली मंजुरी

भारताची आर्थिक राजधानी म्हणून परिचित असलेल्या मुंबई परिसरातील एका मोक्याच्या ठिकाणाचा पुनर्विकास करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने फायनल मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी अदानी समुहाने 2022 मध्ये बोली लावून त्यात बाजी मारली होती.

Read More

Honda Dio 125: होंडाने लाँच केली डिओ स्कूटर; TVS Ntorq ला देणार टक्कर, अफलातून फिचर्स चेक करा

होंडा कंपनीने 125cc श्रेणीतील तिसरी स्कूटर लाँच केली आहे. ही गाडी TVS Ntorq, हिरो कंपनीची डेस्टिनी आणि सुझुकीची अॅक्सेस 125 ला टक्कर देणार आहे. होंडाच्या Grazia आणि Activa या दोन गाड्या 125 सीसी श्रेणीमध्ये आधीपासून आहेत. होंडा डिओ गाडीची फिचर्सही अफलातून आहेत.

Read More

Ganesh Idols Market: नागपूर जिल्ह्यात साकारल्या जात आहेत दहा लाख गणेशमूर्ती, कोट्यवधी रुपयांची उलाढाल

Nagpur District Ganesh Idols Market: महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या गणरायाचं आगमन दोन महिन्यांवर आलं आहे. यानिमित्त नागपूर शहर तसेच जिल्ह्यातील हजारो मूर्तिकार जवळपास दहा लाख मातीच्या गणेश मूर्ती तयार करण्यासाठी कामाला लागले आहेत.

Read More

F&B Price Cut: सोशल मीडियावरील युजरच्या पोस्टनंतर 'या' सिनेमागृहातील खाद्यपदार्थ झाले स्वस्त; किंमतीत 40 टक्क्यांची घट

Food & Beverages Price Cut: देशात PVR, INOX, CINEMAX यासारखे मल्टीप्लेक्स कार्यरत आहेत. याठिकाणी मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या किंमती अतिशय महाग आहेत. ज्याचा फटका सामान्य प्रेक्षकांच्या खिशाला बसतो. 10 दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एका युजरने खाद्यपदार्थ आणि पेयांच्या किंमतीबाबत पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर आता या सिनेमागृहांनी खाद्यपदार्थांच्या किंमतीत घट केली आहे.

Read More